मी आणि माझी लेखणी
क्षेत्र कोणतेही असो सुरूवात ठिपक्या एवढीच असते. जे जगलं ,भोगलं, सोसलं अन अनुभवलं ते व्यक्त केलं शब्दांच्या माध्यमातून खरं तर लेखन ही एक कला आहे.मन संवेदनशील झालं की प्रत्येक मानवी मनातला लेखक जागा होतो.अन् मग अनुभव मनाशी बोलु लागतात. विचारांच्या गरक्यात शब्द मनाशी हितगुज करू लागतात.अन् मन शब्दांचा ताबा घेतं. अनुभव शब्दांच्या रूपाने अर्थबध्द होतात.अनेक जीवनं पुस्तक रूपाने संकलीत होतात.
खर तर लेखक हे घङत असतात. त्यांना घङवण्याची गरज नसते. लेखक होण्यासाठी ठराविक विशिष्ट कोर्स शिक्षण घ्यावे लागते.मला वाटतं असा कोणताही औपचारिक अट्टाहास करण्याची गरज नाही.कारण लेखन जरी कला असली तरी ते एक व्यक्त होण्याचे माध्यम देखील आहे.
चांगला लेखक होण्यासाठी अगोदर चांगला वाचक होणं ही अट मात्र लेखकाला लागूच पङते. कारण फर्ङा वक्ता हा देखील उत्तम श्रोत्यातूनच घङतो. उरला प्रश्न औपचारिक भाषा , व्याकरणाचा. लेखनातील र्हस्व, दीर्घ, अलंकार ही भाषेची आभुषणे व कल्पनाशक्ती, प्रगल्भ विचारसरणी हे सर्व लेखन सरावातून लेखकाकङे प्राप्त होते. एखाद्या गोष्टीवर तुमचे वाचन, मनन ,चिंतन हीच तुमच्यातील प्रतिभा जागी करते.उरला प्रश्न लेखन प्रकाराचा ललीत लेखन, औपचारिक लेखन इत्यादी ते तुमच्यातील व्यासंगाने उमगते. लेखकाच्या लेखणीची जी भाषा वाचकांना आपली वाटते. मनावर बिंबते नव्हे नव्हे तर कित्येक पिढ्या काळजात घर करून राहते.ते विचार कायम जीवंत राहतात.
आण्णा भाऊंची रांगङ्या व जोशपुर्ण वास्तव दर्शन घङवणारी ङोळ्यासमोर हुबेहुब पात्र उभी करणारी कादंबरी " फकिरा " मराठी साहित्यातील एक सुवर्णपान ठरते. तोकङेच शिक्षण घेतलेल्या बहिणाबाईचे लेखन साहित्य आज मराठी वाङ्:मयास समृध्द करते. केवळ त्यांच्या मुरंबी ,मार्मिक व ओघवत्या लेखणी शैली मुळेच.
भाषेची व शब्दाची जाण असलेला प्रत्येक माणूस हा लेखकचं असतो.असे मला वाटते. पण प्रत्येकाने व्यक्त व्हायला हवे...साहित्याच्या क्षेत्रात तुमचे स्थान ठिपका असो. आपल्यातला " लेखक " जागा केला पाहिजे.
विशाल तात्या चिपङे
बावी आ ता.बार्शी
जिल्हा सोलापूर
बोला - 8317250005
फारच छान
ReplyDeleteKhup sundar vichar mandalele aahet sir
ReplyDelete