बार्शीचे राजकारण म्हटले की अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा उंचावतात. भाऊ , साहेब अन् भाऊसाहेब. बार्शी व तालुक्याच्या विकासासाठी झटणारे हे त्रिकूट. नेहमीच जिल्ह्याच्या किंबहुना महाराष्ट्र राज्याच्या राजकीय पटलावरील चर्चेत असते. विविध ङाव प्रतिङाव टाकून राजकीय समीकरण रातोरात बदलतात. पण या सगळ्यामागे एकच शुध्द भावना म्हणजे तालुक्याचा विकास . अनेक पक्ष प्रवेश , घरवापसी , मोर्चे , अंदोलने ही होत असतील. पण प्रत्येक मनात बार्शी अन् तालुक्याच्या प्रेरणादायी नव चैतन्याचा सामाजिक आर्थिक अन् वैचारिक विकास.
खरं तर या तालुक्याला लाभलेले हे ब्रम्हा , विष्णू , महेशच आहेत. ज्या ही वेळा या भगवंत नगरीवर संकट ओढवतं तेव्हा ही त्रिसुत्री मायेची , आशेची कवच कुंङल घेऊन उभी राहतात. अगदी पर्वतासारखे खंबीरपणे.
कोरोना या जागतिक युध्दात आपापसातील हेवेदावे बाजूला सारून समाजकारण करणार्या या तीनही दिग्गजांना सलाम. भाऊंनी तर एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत कोरोनाग्रस्तांना देऊन राज्यासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तर साहेबांच्या माध्यमातून बार्शी शहर परीसरात कोरोना आजाराविषयी प्रबोधन व अन्नछत्रालयाला मदत पुरवली जाते गेली आहे. तर भाऊसाहेबांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष गोरगरीब जनतेसाठी मायेचा , प्रेमाचा घास भरवला जातो आहे. विविध दवाखान्यात, बेवारस व्यक्तीसाठी ते स्वतः जाऊन अन्नदान करत आहेत. परप्रांतीयांना मायदेशी परत पाठवले आहे. अनाथ मुले दत्तक घेणे. वृक्षारोपण अशी एक नी अनेक समाजाभिमुख कार्याचा चढता आलेख उभा केला आहे. राजकारणातही समाजकारण करता येते. हे भगवंत नगरीच्या सुपुत्रांनी राज्याला दाखवून दिले आहे.
- विशाल चिपङे
बावी आ. बार्शीवरून
8317250005 , साहेब आणि भाऊसाहेब

विशाल चिपङे
बावी आ. बार्शीवरून
8317250005