KNOWLEDGE CREATION ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत !

Thursday, 29 March 2018

सांगावा




  •                गणेशजी आपली उमद्या दौलती वरची छबी पाहिली अन् अंग शहारलं. महाराष्ट्राच्या कड़ेकपारी अन् दगड मातीतून इथला इतिहास दरवळतो आहे. आपल्या तलवारीच्या बळावर इतिहास घडविणारी पोलादी मनगटाची नररत्ने जन्माला आली. तशीच आपल्या अनुभव विश्वाच्या अन् शिकवणूकीच्या बळावर पोलादी समाजमन घडवणार्‍या संत विभुतीनी या भूमीला पावन केले. साहित्य, कला,संगीत अष्टकलांची खाण असलेल्या शिवरायांच्या भूमीत आमचा जन्म झाला हे आमचे महत भाग्यचं.....

"शुध्द बीजापोटी, फळे रसाळ गोमटी."




      श्री. शिवाजी गोपीनाथ   आगलावे. गाव त्यांना आदराने बप्पा म्हणतं. आयुष्याच्या चाळीशीत बप्पांनी शेती, मजूरीचा सहारा घेत जीवन "कष्ट अन् संघर्षाच्या"लपंड़ावातचं अनुभवलं. कधीकाळी बार्शीतील चौकातलं काम असो वा किराणा दुकानदारी सत्याची पाठराखण कधीच सोडली नाही. ज्याचा आहार सात्विक, त्याचे विचार सात्विक.अश्या विचारांच्या बप्पांच्या आयुष्याला हरिनामाची जोड़ अखंड जोडलेली आहे.
   आज ज्यावेळी आपला मुलगा शासनाच्या कर विभागात साहेब आहे.हे सांगताना त्याची छाती अभिमानाने फुलून येते.ऊर भरून येतो. "संकल्प आणि सिध्दी  यांच्यामध्ये परमेश्वरी इच्छेचा डोंगर उभा असतो."असा प्रचंड आत्मविश्वास असणाऱ्या             बप्पांनी जगाला पसायदान देणार्‍या ज्ञानेश्वरांच्या नामस्मरण करत करत ....................एक "ज्ञानेश्वर "घडविला.

भैय्यासाहेब



   "प्रयत्नांच्या मुशीत साकार होते स्वप्नशील्प आयुष्याचे"
आकाशात भरारी घेण्यास पंख हवेत भगीरथ प्रयत्नांचे"
     मा.श्री.    नागेश(भैय्या )पाटील हे तरूण तडफदार अन् उमदं नेतृत्व .दारिद्र्याच्या रखरखत्या उन्हाळ्यात करपून जाणाऱ्या जनसामान्यांच्या जीवनात आनंदाची मांगल्याची प्रखर पहाट  आणू पाहणारे नेते........ (भैय्या. )
आपुलकीच्या ओलाव्यातून सतत निरपेक्ष भावनेने सेवाव्रत घेतलेले पितृतुल्य व्यक्तिमत्त्व मा.श्री. सतिश लक्ष्मण पाटील(आण्णा )यांनी घडविला नीलकंठेच्या काठावर एक "कोहिनूर हिरा"

भामाई



      भड़ा भड़ा आवाज येत हुता.रांजून वरन वसांड़ून वाह्त व्हता.भामाईनं पहाट्चं उटून सगळा आड़ उपसीला व्हता.जशी वार्‍याची झुळूक इल.तस लय गार वाटायचं.जात्याच्या पाळीला बांधल्यालं शिळीचं कुकरू थड़ीनं गाराटलं व्हतं. एकाच दोरखंड़ाला बांधलेल्या दोन शेळ्या भामाईनं पहाटचं पिळल्या व्हत्या.          पोतरा दिलेल्या वाकलेल्या कुड़ाच्या भितीवर पवरा अन् दावं आड़कीवल्याल.पाच सहा लाकडाच्या मिड़ी रवून चार पत्र्याच्या दोन वड़ी.बाबळच्या लाकड़ाची चौकट.
   

शब्दांचे पुजारी

 
                   दोन मध्ये चार.भई. ...... सकाळचा प्रहर.पोलीस स्टेशनमध्ये गर्दी दिसत होती. रस्त्यावरील वाटसरूची ये जा सुरू होती. काचच्या लाकडी कपाटात जिलेबीच्या परातीवर अड़कलेली माशी गुंग्ग् गगगगगगग असा आवाज करत लक्ष वेधत होती.  वीस वर्षापासून आपल्या लेखणीच्या माध्यमातून  सामाजिक प्रश्नावर प्रकाशझोत टाकणारे. "गणेशजी".

सुखी आजी


               मंगळवारचा दिवस जतचा बाजार. माणसांची ये जा. साळंला जाणाऱी पोरांच्या झुंड़ीवर झुंडी जायच्या. मोटरसायकली बायका पोरं,टरका जिपा वाहनांची वरदळं.पानटपरया कवाच्या उगड़लेल्या तैशिल हापीस अन् तालुका पंचायतीतले सरकारी बाबूंची ये-जा चालूच व्हती.

खुर्ची


         विलिंग्ड़न काॅलेज फाटकाच्या बाहेर पडलो. दिवसभर ऐकलेल्या डाक्टर सायबाच्या तत्वज्ञानाची झिंग डोक्यातून आजून उतरलेली नव्हती. त्या तंद्रीतच मी सांगली कड़ून मिरज कड़ं जाणाऱ्या वाहनाची ये-जा न्याळत प्रत्येक गाडीला हात करीत होतो.रस्त्यापलीकड़ं लागलेला महाराजा सेल पाहण्याची इच्छा  मनाला सारखी भुरळं घालायची. रस्त्या मधोमध लावलेल्या रूट ड़िव्हायड़रचे दिवे वेळ झाल्याची जणू आठवण करून देत होते. तरी पण महाराजा खुणावतो आहे  असं वाटलं अन् गेलो तड़क्. ......

Wednesday, 28 March 2018

रामकट

             
          माळावर रस्त्याकड़ला वाळलेली कुसळं,अन् पानगळ झालेली झाड़ं. *दुस्काळ*लांबवर चिटपाकरू बी दिसत नव्हतं. दिवस दुपारीला आलेला सुर्य आग वकतं व्हता.घामानं पुरता भिजलेलो,घसा कोरडा पडला होता. ईसावा घ्यावा ह्या इचारानं बसलो. बगतोयं तर वर
                    " *रामकट*"  शेताच्या बांधावर बाबळीचं झाड आसतचं की  इथलं मातीचं बांध,एकाद्या गारपीटीनं नायतर अवकाळी पावसानं धुवून गेलं की, मग
शेताचं बाध वळकायला अश्या रामकाटी,बाबळाचा उपयोग होतो, असे आजोबा सांगत व्हतं.

युवा अश्व

बंधुतूल्य मित्रांनो,   
            कर्तृत्व,नेतृत्व आणि वक्तृत्व असलेला तरूणचं राष्ट्राची खरी संपत्ती आहे. वाचनानं माणूस घड़तो मेंदूत बुध्दी अन् मनगटात नेट आसलेली माणसं कधी कोणासमोर निष्ठा वाहत नाहीत. ड़िजीटल युगातला माणूस  वाड़्:मय व वाचनापासून दूरावतो आहे. KNOWLEDGE CREATION BLOCK SPOT च्या माध्यमातून आम्ही आपणास  "करिअर गाईड लाईन्स आणि संस्कार व संस्कृती "ची अस्सल पर्वणीच देणार आहोत. 
 "नवे विचार. ..! नवे पर्व. ...!युवा सर्व. ....!"
                
            प्रा.विशाल चिपड़े(सर)
             बावी(आ)ता.बार्शी जिल्हा सोलापूर .
            📞  83 172 50005