KNOWLEDGE CREATION ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत !

Thursday, 29 March 2018

शब्दांचे पुजारी

 
                   दोन मध्ये चार.भई. ...... सकाळचा प्रहर.पोलीस स्टेशनमध्ये गर्दी दिसत होती. रस्त्यावरील वाटसरूची ये जा सुरू होती. काचच्या लाकडी कपाटात जिलेबीच्या परातीवर अड़कलेली माशी गुंग्ग् गगगगगगग असा आवाज करत लक्ष वेधत होती.  वीस वर्षापासून आपल्या लेखणीच्या माध्यमातून  सामाजिक प्रश्नावर प्रकाशझोत टाकणारे. "गणेशजी".

       
  महाराष्ट्र टी हाऊस मधील "लेमन टी" च्या गोड़  घोटागणीस गोडसे सरांचा अनुभव विश्व कानाला गोड़ लागत होत.  दै. संचार,दै.पुण्यनगरी, दै.पुढारी इ.वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाज भान जागृत करण्याचे काम गणेशजी करत होते.आणि आजही करत आहेत. राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, शिक्षण, आर्थिक, वैचारीक एक नी अनेक क्षेत्रावर त्याच्या लेखणीचा वावर त्यांच्या जनसंपर्काची श्रीमंती दर्शवितो. भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ "पत्रकारीता" या क्षेत्रात त्यांनी अनेक दुर्लक्षीत घटकास न्याय मिळवून दिला. संवेदनशील, समाजप्रिय, निर्भीड, वैचारिक, सत्यनिष्ठता ही त्यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये.
बार्शी तालुका पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष हे त्यांचे सन्मान अन् जबाबदारीचं पद आहे. पत्रकारीता क्षेत्रात काम करताना भूतकाळातील काही गोड़ कटू अनुभवाविषयी बोलताना तरूणाईस ते सांगू इच्छितात. .

"ख्याब भले टूटते रहे,मगर हौसले फिर भी जिंदा हो...!
हौसला आपना ऐसा रखो, जहाॅ मुश्किले भी शर्मिंदा हो "

खरचं आज ही प्रसारमाध्यमे, व्हाॅट्सअॅप,फेसबुक,ट्विटर,ईमेल, वृत्तपत्रे नसती तरररररर.नवलचं. आज एका क्लिकवर जगातला प्रत्येक माणूस माणसाशी जोडला गेला आहे. समाजाच्या वैचारिक प्रगल्भतेच्या कक्षा रूंदावल्या आहेत केवळ "पत्रकारीतेमुळं". असा हा पत्रकार माणूस हर रोज समाजातील प्रत्येक घटकांसाठी लिहतो. अशा पत्रकार बंधुसाठी माझी लेखन भेट.

 "क्रांती ही बंदुकीतील गोळीने नाही, तर लेखणीतील ओळीने होत आसते. "
       
लेखन अट्टाहास 
                           श्री. विशाल चिपड़े(सर)
                           बावी(आ)बार्शी सोलापूर 
                            📱 9422 033 819.

1 comment:

  1. धन्यवाद सर. आपले शब्दरूपी शुभेच्छा खुपच छान आहे.

    ReplyDelete