KNOWLEDGE CREATION ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत !

Thursday, 29 March 2018

सांगावा




  •                गणेशजी आपली उमद्या दौलती वरची छबी पाहिली अन् अंग शहारलं. महाराष्ट्राच्या कड़ेकपारी अन् दगड मातीतून इथला इतिहास दरवळतो आहे. आपल्या तलवारीच्या बळावर इतिहास घडविणारी पोलादी मनगटाची नररत्ने जन्माला आली. तशीच आपल्या अनुभव विश्वाच्या अन् शिकवणूकीच्या बळावर पोलादी समाजमन घडवणार्‍या संत विभुतीनी या भूमीला पावन केले. साहित्य, कला,संगीत अष्टकलांची खाण असलेल्या शिवरायांच्या भूमीत आमचा जन्म झाला हे आमचे महत भाग्यचं.....



                  कवड़्याची माळ हा सह्याद्रीच्या कड़ेकपारीत घोंघावणार्या वादळाचा दागिना म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या कुळाचा मान. विविध धर्माची लाखो माणसं "मावळा"नावाच्या छत्राखाली एकत्र करत नर्मदेच्या खोर्‍यापासून तुंगभद्रेच्या किनार्‍यापर्यत विशाल असं हिंदवी स्वराज्य उभारलं. ते जीवाशी जीव देण्यार्या "स्वामीनिष्ठता "रक्तात भिणलेल्या मावळ्यांच्या जिगरबाज पराक्रमानं.
               मावळतीच्या कळीला लागलेल्या सूर्याने आभाळाला पोटला फोडला होता.क्षितीजाची कड़ा लालभडक झाली होती.
              कुम्मैत जातीच्या तपकिरी उमद्या जनावरावर मांड़बुलंद बैठक जमवून बसलेले. घोड्याचे भगवे, रेशमी कायदे त्यांनी आपल्या अंगठीधारी सड़क बोटांनी आखड़ून धरले होते. कपाळीचे दोन दलाचे आडवे शिवगंध धारधार नाकाचा तरतरीत शेंड़ा, दोन्ही ड़ोळ्यात दोन सुर्य वागवणारे लांब ड़ोळे, उभट शंखाकृती सतेज मुद्रा.मानेवर रूळणारी केसांची झुपकेदार बट अंगातील सळसळत्या रक्ताची अन् शौर्याची साक्ष देत होती.  मेघसरीनी ओलाचिंब झालेले" विश्वासराव "आपल्या कित्येक मैलांची घौडदौड करत आले होते. सांगावा घेऊन. ......
     विश्वासरावांना बघताच राजांच्या रक्त जागल्या रसरशीत ओठातून सोनेरी बोलाची चलाख कबुतरे क्षणात उडाली. बोला विश्वासराव काय सांगावा धाड़लाय माॅसाहेबांनी.
             लय खुषीची खबर हाय धनी. .....थोरल्या राणी सायबास्नी बाळकिसन झालं धाकलं धनी आलं.
"शंभुराजे" 
विश्वासरावांनी शिवरायांच राजयोगरूप निहाळलं अन् स्वराज्याचे धनी प्राजक्ताच्या सुगंधात बुडाले. त्याची  हास्यमुद्रा ह्रदयात साठवली. हा सांगावा आपणास देण्याचं महतं भाग्य मला लाभलं धन्य झालो राजे. ..म्हणतं मुजरा झाड़ला.
   
लेखन अट्टहास : श्री. विशाल चिपड़े
                  बावी(आ)बार्शी सोलापूर.

No comments:

Post a Comment