विलिंग्ड़न काॅलेज फाटकाच्या बाहेर पडलो. दिवसभर ऐकलेल्या डाक्टर सायबाच्या तत्वज्ञानाची झिंग डोक्यातून आजून उतरलेली नव्हती. त्या तंद्रीतच मी सांगली कड़ून मिरज कड़ं जाणाऱ्या वाहनाची ये-जा न्याळत प्रत्येक गाडीला हात करीत होतो.रस्त्यापलीकड़ं लागलेला महाराजा सेल पाहण्याची इच्छा मनाला सारखी भुरळं घालायची. रस्त्या मधोमध लावलेल्या रूट ड़िव्हायड़रचे दिवे वेळ झाल्याची जणू आठवण करून देत होते. तरी पण महाराजा खुणावतो आहे असं वाटलं अन् गेलो तड़क्. ......
विविध कला कुसरीच्या वस्तू,कपडे, पुस्तके, संसाराची भांडी कुंड़ी लय पसारा. ..माणसाची गर्दी. प्रत्येकजण आपापल्या खिशाचा अंदाज घेऊन खरेदी करायचा. कुणी नऊवारी तर कुणी छापील तर कुणी कुर्ता पायजमा, झबलं नाना तर्हेची माणसं एवढ्या सार्या गर्दीत ती सारखी मला न्याहाळत होती. मी नजर चुकवली तरी सारखं माझा कानोसा घ्यायची. मी-मी म्हणारे तिच्यासाठी आयुष्य पनाला लावतात.मला पण तिच्या सौंदर्यानं पक्क घेरलं होतं. सारा सेल पाहिला शेवटी तिच्या जवळ जाऊन तिला न्याहाळायचा अन् स्पर्श करायचा मोह मी आवरू शकलो नाही.
चार पायाची अन् दोन हाताची बाकदार रूबाबी सागवानी *खुर्ची*
थकून भागून आल्यावर शिकार करणारा अश्मयुगीन मानव दगडावर विसावत असेल.दगदगीतून शांत अन् निवांत बसण्याचं साधन याची विविध रूप आहेत. खेडोपाडी घरात कुणी धान्याच्या चुंगड़्यावर, झाडाच्या बुंद्यावर तर कुणी पारावर बसतं.
प्राचीन भारताचा मागोवा घेतल्यास राजे रजवाड़े खुर्ची सदृश्य बैठकीचा वापर करीत असे.खाली चार लाकडी पाय किंवा हस्तीदंत, नानाविध धातूनी बनविलेली कापडी आच्छादने असलेली मंचके असायची. सतराव्या शतकात सन्मानित व्यक्तीना बसण्याची जागा उंचावर असे. "राजसिंहासन"
राजे,ऋषीमुनी चारपायी वर व्याघ्रचर्म अंथरूण बसायचे. हळूहळू हे साधन उच्चपदस्था दर्शवू लागले.बदललेल्या खुर्ची रंग रूप बदलले. दगड़ाच्या खुर्चीनं पोलाद, वेत,बांबू,प्लास्टिक, वेत,फोम,रबर,रेक्झिन,लॅमिनेटड़् आकर्षक रूप धारण केले. आराम खुर्ची, घडीची खुर्ची, फिरती खुर्ची, स्प्रिंगची खुर्ची, हाताची खुर्ची, बिन हाताची खुर्ची, वेताची खुर्ची, गादीची खुर्ची, प्लास्टिकची खुर्ची,कुशनची खुर्ची,हवेची खुर्ची,लाकडी खुर्ची . .....माध्यम, रचना,आकार,सौंदर्य सारचं बदललं नव्हे नव्हे
"खुर्चीच बदलली." ब्रिटीश जाताना भारतात " *चेअर"मन* "सोडून गेले. खुर्चीवर बसणारा माणूस.आणि आणखी काय. ....?
तो जमिनीवर असेपर्यंत खुर्ची वाईट होती.तो खुर्चीवर जाऊन बसल्यावर जमीन वाईट झाली. सत्ताकारण, राजकारण एकाच गोष्टी भोवती फिरतं. "खुर्ची "
"फायली दाबल्या जातात.
न्याय टाळला जातो.भुकेल्या पर्यंत भाकरी पोहचत नाही. रूग्णापर्यत औषधं. निरापराध्याला फाशी मिळते. या सर्वाच्या मध्ये "खुर्चीच आहे. ती लाच आणि लोकशाहीचा हिशोब ठेवते. " खुर्चीमुळं मान सन्मान प्राप्त झालेले अनेक भेटतील पण खुर्चीला मान सन्मान प्राप्त करून देणारी उंबराची फुलं शोधावी लागतात. मिळाली तर त्याच्या सुगंधाचा दरवळं एका प्रांतात तीन वर्षांपेक्षा जास्त दरवळू दिली जात नाहीत. नियमापेक्षा मर्जीवर चालणाऱ्या खुर्च्यांची कमी नाही.
पण आश्या खुर्च्याचे पाय खुप दिवस दम धरत नाहीत. मरणाची अन् बदलीची भिती नसलेल्या खुर्च्याच अभिनंदनास पात्र ठरतात. बदललेल्या खुर्च्याना मुळ "वजन"प्राप्त करून देऊया. चला खुर्च्या वाचवू.
लेखन अट्टाहास
विशाल चिपड़े.
बार्शी, सोलापूर
📞 83 172 50005
No comments:
Post a Comment