KNOWLEDGE CREATION ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत !

Thursday, 29 March 2018

"शुध्द बीजापोटी, फळे रसाळ गोमटी."




      श्री. शिवाजी गोपीनाथ   आगलावे. गाव त्यांना आदराने बप्पा म्हणतं. आयुष्याच्या चाळीशीत बप्पांनी शेती, मजूरीचा सहारा घेत जीवन "कष्ट अन् संघर्षाच्या"लपंड़ावातचं अनुभवलं. कधीकाळी बार्शीतील चौकातलं काम असो वा किराणा दुकानदारी सत्याची पाठराखण कधीच सोडली नाही. ज्याचा आहार सात्विक, त्याचे विचार सात्विक.अश्या विचारांच्या बप्पांच्या आयुष्याला हरिनामाची जोड़ अखंड जोडलेली आहे.
   आज ज्यावेळी आपला मुलगा शासनाच्या कर विभागात साहेब आहे.हे सांगताना त्याची छाती अभिमानाने फुलून येते.ऊर भरून येतो. "संकल्प आणि सिध्दी  यांच्यामध्ये परमेश्वरी इच्छेचा डोंगर उभा असतो."असा प्रचंड आत्मविश्वास असणाऱ्या             बप्पांनी जगाला पसायदान देणार्‍या ज्ञानेश्वरांच्या नामस्मरण करत करत ....................एक "ज्ञानेश्वर "घडविला.



श्री. ज्ञानेश्वर शिवाजी आगलावे  (विक्रीकर निरीक्षक,कर विभाग महाराष्ट्र शासन. )

 आजपर्यंत ऐकलं होत पदामुळं माणसं मोठी होतात. पण मित्रा तुझ्याकडे पाहिलं की प्रत्यय येतो की, माणसांन मुळं पदही मोठी होतात.
वैचारीक,शांत, मितभाषी,व प्रचंड आत्मविश्वास आणणारे आभ्यासू व्यक्तिमत्त्व. ......मित्रा, आज एवढा मोठा झालास. तरी मातृभूमीसाठी काही तरी करण्याची तुझी धडपड. तुझं या मातीवरील प्रेम आम्हास कार्य करण्याची प्रेरणा देते.
"माणसात येण्यासाठी अगोदर माणसांच्या बाहेर रहावं लागतं मग माणूस माणसात येतो."
"ग्रंथ हीच माझी धनदौलत"या विचारांनी प्रभावित झालेल तुझं व्यक्तिमत्त्व पाहिलं की, सुभाषित मुखोद्गत होतं.

"विव्दत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन!
स्वदेशे पूज्यते राजा,विव्दान् सर्वत्र पूज्यते! !'


राजा व विद्वान यांची तुलना होऊ शकत नाही. राजा फक्त स्वतःच्या राज्यातच आदरणीय असतो. तर विद्वान मात्र सर्व जगात आदरणीय असतो.
 बावी सारख्या ग्रामीण भागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून निवडलेला पहिला अधिकारी. .....अनेकांचा मार्गदर्शक बनलास.अल्पसंतुष्टी राहणार्‍या,धावत्या व स्पर्धेच्या युगाचा विसर पडलेल्या,प्रस्थापितांच्या स्वाभिमानासाठी आपले तारुण्य वाया घालविणार्या, दुसर्‍याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या आई वडिलांची स्वप्न धुळीस मिळवू पाहणाऱ्या बेमालूम बेधुंद तरूणांईस दिशादर्शक प्रेरणा बनलास. अभिमान वाटतो आम्हाला तू "बावीकर "असल्याचा. आज या "जागर"च्या शिलेदाराचा वाढदिवस. ........या सोनेरी क्षणात "ज्ञानेश्वर "आम्ही बावीकर सहभागी आहोत. तुझे आयुष्य इच्छित यशाची शिखरे पादाक्रांत करो. याच शुभेच्छा. ...
    लेखन अट्टाहास : श्री. विशाल चिपड़े बावी(आ)

प्रसिद्धी प्रमुख :        मा.श्री.अमोल कुलकर्णी (सर)
मा. श्री.  बाबासाहेब काळे(धनश्री सर्व्हिसेस, पुणे )

-------------------
शुभेच्छूक :जागर फाऊंडेशन बावी(आ)ता.बार्शी जि. सोलापूर 

No comments:

Post a Comment