च्याचं आन् नाष्ट्याचं गाड़ माणसांनी फुलून गेलं व्हतं.ऊन मी म्हणीत व्हतं.वातावरणातल्या गरमीनं जीव हैराण झाला व्हता. लांबवर बगितल्यावर उन्हाच्या झळा ड़ोळं दिपवीत व्हत्या. कदी एकदाचं सावलीला जाईलं आसं झाल्तं. मागूनं आवाज कानावर पडला. "ये बाबू हातलाव जरा घागरीला"मागं वळलो तरं. ....... पिवळ्या रंगाची साडी घातल्याली सत्तरीतली डोक्यावरचा पदर सावरीत उबी व्हती " *आज्जी* "
हातातल्या कागदाची नेळवाटी ड़ाव्या हाताच्या खाली काखात दाबली. आन् उजव्या हातानं पाण्याची भरलेली घागरं जोरं लावून उचलली ड़ोस्क्यावर दी ड़ोस्क्यावर आजीचा आवाज कानात घुमला.
आन् मी जाग्यावरचं उबारलो. आनवाणी पायानं जड़ पावलं टाकत ही आजी आयुष्याशी झुंजत व्हती. उन्हानं तापलेल्या डांबरीवरनं मागं -पुढं बगत रस्त्याच्या पल्याड़च्या च्याच्या गाड़ीवाल्याला पाणी वाड़लं.तशी दुसरी घागर भरायला वळली. मी पूरा आंतरमूक झालेलो.न राहून मी आजीला इच्यारलं ."आसल्या उनात ........"
आविष्यभर लई कष्ट उपसलं. आखं आयुष्य चटक्यातचं गेलं. बाबू. ...... खानदेश,कर्नाटक, मुलूक, पर मुलूक सगळा पालता घातला ऊसतोडीच्या निमतानं. पण कदी दमले भागले नाही. बाबा......कष्ट करायला कशाची लाज. मस्त दोनं पोरं हायती.सुनाबाळा लिकीवनी हायत्या.पणं बसूनं खायचं मनचं करीत नाही बाबू. आम्ही मूळचं इंड़ीचं. कामाच्या निमतानं हीतचं इऊन राह्यलो. इटलनगरमंदी.
पंदरा वरसं झाली बाबू सगळ्या च्या गाड़्यावर पाणी वाड़ते.भांड़ी घासते. पड़ल ती काम करून चार पैसं मिळवत्ये.व्हतयं तवर करीत रहायचं. कपातलं च्याच दोन घोट पिऊन आजी उटली.आन् मला माझी आजी आठवली.
"कष्टाची बरी भाजी भाकरी.
तुप साखरेची चोरी नको."
लई वाईट वाटलं. ....आयुष्याच्या शेवटा पातूर कष्टचं.तिच्या चेहर्यावरल्या सुरकुत्या तिच्या कष्टाची साक्ष देत व्हत्या. मी न राहून खिशाकड़ं हात घातला. नकं बाबा...देवानं मला सुखात ठिवलयं. "घरात बसवत नाही म्हणून मीच येते हिकड़ं."आसं बोलून आजीचं पानावलेलं ड़ोळं बरचं काही सांगून गेलं व्हतं. माझ्या हातातल्या कपातल्या च्याचा घोट घेत मी आजीच्या पाटमोर्या मूर्तीला नमस्कारचं केला.
तो नमस्कार व्हता तिच्या *जिद्दीला* ....
*प्रामाणिकपणाला* ..... सकारात्मक *वृत्तीला* ....
आयुष्यभर जपलेल्या *तत्त्वाला* . ..
कष्ट करण्याच्या *हिमतीला* .....
सत्तरीतल्या त्या *उमेदीला* .......
दु:खातही सुखी राहणाऱ्या *मनाला* .. ........
आम्ही तुझ्या प्रत्येक पावलामध्ये
आमचं हरवलेलं स्वप्न बघू....!
आम्ही तुझ्या जिद्दीमध्ये
आमचं निसटून गेलेलं आयुष्य जगू.....!
लेखन अट्टाहास:
श्री. विशाल चिपड़े
बावी(आ) बार्शी
सोलापूर
📞9422033819
Very inspirational
ReplyDelete