KNOWLEDGE CREATION ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत !

Thursday, 29 March 2018

भैय्यासाहेब



   "प्रयत्नांच्या मुशीत साकार होते स्वप्नशील्प आयुष्याचे"
आकाशात भरारी घेण्यास पंख हवेत भगीरथ प्रयत्नांचे"
     मा.श्री.    नागेश(भैय्या )पाटील हे तरूण तडफदार अन् उमदं नेतृत्व .दारिद्र्याच्या रखरखत्या उन्हाळ्यात करपून जाणाऱ्या जनसामान्यांच्या जीवनात आनंदाची मांगल्याची प्रखर पहाट  आणू पाहणारे नेते........ (भैय्या. )
आपुलकीच्या ओलाव्यातून सतत निरपेक्ष भावनेने सेवाव्रत घेतलेले पितृतुल्य व्यक्तिमत्त्व मा.श्री. सतिश लक्ष्मण पाटील(आण्णा )यांनी घडविला नीलकंठेच्या काठावर एक "कोहिनूर हिरा"



आज या शब्दांना किंमत अन् वजन आहे केवळ आण्णांनमुळे कडक शिस्त, कमालीचा दूरदृष्टीपणा,अन् परीस्थितीचा अंदाज घेऊन भविष्याची गणिते सोडवताना व्यवहारापेक्षा नात्याना खुप महत्व दिलं आण्णांनी.
     रक्तातचं जनसेवा अन् हरिनामाचा वसा असलेलं हे पाटील घराणं .
ज्याच्या ह्रदयात मानवतेचा नंदादीप अखंड तेवत आहे. जीवनात अनेक संकट अन् संघर्ष  पेलला पण पराभूत झालो नाही. चालतच राहिलो " पराभवांचाही पराभव करणाऱ्या आण्णांच्या मार्गदर्शनाखाली आजही चालतो आहे.
"रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती किती श्रेष्ठ असतात."हे मी आण्णांनकड़ून शिकलो.
        "यमुनाई"उद्योग समूहाच्या माध्यमातून आण्णांनच्या मार्गदर्शनाखाली भैय्यानं उभं केलं उद्योगविश्व.
 अन् अनेक कुटुंबाचा आधारवड़ बनले. सामाजिक व राजकीय कार्यात स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून समाजकारणात धडाकेबाज सुरूवात केली. ग्रामपंचायत सदस्य म्हणून राजकीय वाटचाल करू पाहणारे "भैय्या". नावाप्रमाणेच सबंध जनतेच्या पाठीमागे मोठ्या भावाप्रमाणेच उभे असतात. "शिवतेज" प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी एक सच्चा व जीवाला जीव देणार्‍या मावळ्यांची फळी निर्माण केली आहे. नुकतीचं भैय्याची "बार्शी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या "तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. त्यांना जी पदे मिळाली.त्या पदाची उंची व महत्त्व त्याच्या कार्यपद्धतीमुळेच वाढली आहे.सामाजिक बांधिलकी शिरोधार्य मानून विकासाचा ड़ोंगर उभा केला आहे. यमुनाई"उद्योग समूहाच्या प्रगतीची गती वेगाने चालू असून आण्णांचा संस्कारक्षम वारसा "भैय्या पुढे चालवत आहेत.
     खरोखरचं नीलकंठेच्या काठावरील मातीचा सुगंध काही औरचं आहे. भैय्यासारखं उमदं नेतृत्व बावीला नवी ओळख देईल असा आशावाद वाटतो.
     
लेखन अट्टाहास: श्री.विशाल चिपड़े,बावी(आ.)

No comments:

Post a Comment