KNOWLEDGE CREATION ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत !

Friday, 31 July 2020

भाऊ, साहेब आणि भाऊसाहेब


                   बार्शीचे राजकारण म्हटले की अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा उंचावतात. भाऊ , साहेब अन् भाऊसाहेब. बार्शी व तालुक्याच्या विकासासाठी झटणारे हे त्रिकूट. नेहमीच जिल्ह्याच्या किंबहुना महाराष्ट्र राज्याच्या राजकीय पटलावरील चर्चेत असते. विविध ङाव प्रतिङाव टाकून राजकीय समीकरण रातोरात बदलतात. पण या सगळ्यामागे एकच शुध्द भावना म्हणजे तालुक्याचा विकास . अनेक पक्ष प्रवेश , घरवापसी , मोर्चे  , अंदोलने ही होत असतील. पण प्रत्येक मनात बार्शी अन् तालुक्याच्या प्रेरणादायी नव चैतन्याचा सामाजिक आर्थिक अन् वैचारिक विकास. 
            खरं तर या तालुक्याला लाभलेले हे ब्रम्हा , विष्णू , महेशच आहेत. ज्या ही वेळा या भगवंत नगरीवर संकट ओढवतं तेव्हा ही त्रिसुत्री मायेची , आशेची कवच कुंङल घेऊन उभी राहतात. अगदी पर्वतासारखे खंबीरपणे. 

          कोरोना या जागतिक युध्दात आपापसातील हेवेदावे बाजूला सारून  समाजकारण करणार्या या तीनही दिग्गजांना सलाम. भाऊंनी तर एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत कोरोनाग्रस्तांना देऊन राज्यासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तर साहेबांच्या माध्यमातून बार्शी शहर परीसरात कोरोना आजाराविषयी प्रबोधन व अन्नछत्रालयाला मदत पुरवली जाते गेली आहे. तर भाऊसाहेबांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष गोरगरीब जनतेसाठी मायेचा , प्रेमाचा घास भरवला जातो आहे. विविध दवाखान्यात, बेवारस व्यक्तीसाठी ते स्वतः जाऊन अन्नदान करत आहेत. परप्रांतीयांना मायदेशी परत पाठवले आहे. अनाथ मुले दत्तक घेणे. वृक्षारोपण अशी एक नी अनेक समाजाभिमुख कार्याचा चढता आलेख उभा केला आहे. राजकारणातही समाजकारण करता येते. हे भगवंत नगरीच्या सुपुत्रांनी राज्याला दाखवून दिले आहे. 

                      - विशाल चिपङे 
                         बावी आ. बार्शीवरून 
                         8317250005 , साहेब आणि भाऊसाहेब 

                   बार्शीचे राजकारण म्हटले की अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा उंचावतात. भाऊ , साहेब अन् भाऊसाहेब. बार्शी व तालुक्याच्या विकासासाठी झटणारे हे त्रिकूट. नेहमीच जिल्ह्याच्या किंबहुना महाराष्ट्र राज्याच्या राजकीय पटलावरील चर्चेत असते. विविध ङाव प्रतिङाव टाकून राजकीय समीकरण रातोरात बदलतात. पण या सगळ्यामागे एकच शुध्द भावना म्हणजे तालुक्याचा विकास . अनेक पक्ष प्रवेश , घरवापसी , मोर्चे  , अंदोलने ही होत असतील. पण प्रत्येक मनात बार्शी अन् तालुक्याच्या प्रेरणादायी नव चैतन्याचा सामाजिक आर्थिक अन् वैचारिक विकास. 
            खरं तर या तालुक्याला लाभलेले हे ब्रम्हा , विष्णू , महेशच आहेत. ज्या ही वेळा या भगवंत नगरीवर संकट ओढवतं तेव्हा ही त्रिसुत्री मायेची , आशेची कवच कुंङल घेऊन उभी राहतात. अगदी पर्वतासारखे खंबीरपणे. 

          कोरोना या जागतिक युध्दात आपापसातील हेवेदावे बाजूला सारून  समाजकारण करणार्या या तीनही दिग्गजांना सलाम. भाऊंनी तर एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत कोरोनाग्रस्तांना देऊन राज्यासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तर साहेबांच्या माध्यमातून बार्शी शहर परीसरात कोरोना आजाराविषयी प्रबोधन व अन्नछत्रालयाला मदत पुरवली जाते गेली आहे. तर भाऊसाहेबांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष गोरगरीब जनतेसाठी मायेचा , प्रेमाचा घास भरवला जातो आहे. विविध दवाखान्यात, बेवारस व्यक्तीसाठी ते स्वतः जाऊन अन्नदान करत आहेत. परप्रांतीयांना मायदेशी परत पाठवले आहे. अनाथ मुले दत्तक घेणे. वृक्षारोपण अशी एक नी अनेक समाजाभिमुख कार्याचा चढता आलेख उभा केला आहे. राजकारणातही समाजकारण करता येते. हे भगवंत नगरीच्या सुपुत्रांनी राज्याला दाखवून दिले आहे. 

                            विशाल चिपङे 
                         बावी आ. बार्शीवरून 
                           8317250005

Monday, 27 July 2020

आत्महत्या म्हणजे उत्तर आहे का ?



   प्रिय 
            सुलभा , रवी , सुहाना मला माफ करा. मी तुमच्या इच्छा नाही पुर्ण करू शकलो. खुप हालाकीत अन् आठराविश्व दारिद्र्यात माझ्याबरोबर तुम्ही दिवस काढले. रवी , सुहानाला सांभाळ त्यांना तु तरी पोरकं करू नकोस. सावकाराचे कर्ज मी नाही देऊ शकलो. शांताराम वाचत होता. त्याच्या आसवांची टिपं कागदावर पङत होती.
            बापानंतर कर्जाला कंटाळून आज भाऊही निघून गेला होता. कायमचा कधीच न परतण्यासाठी रवी अन् सुहाना गांगारून गेले होते. दररोज अंगाखांद्यावर खेळवणारा बाप परत कधीच येणार नाही. याचा जरा ही अंदाज या चिमुरड्याना नव्हता.  सुलभानं हंबरङा फोङला होता. सत्तर वर्षाची कोंङानानी धाय मोकलून रङत होती.

      " देवा काय हे माझ्या नशीबाचा खेळ लावलास ? मला रंङकी करून सुनाबाळावर बी बेतलास की रं ...."

        म्हणून हात जमिनीवर आपटून देवाला शिव्या शाप देत होती. शेजारच्या गजरा ,पद्मिनी, वैजाबाई  , गावाच्या पल्याड राहणार्या वैतागवाडीतल्या सगळ्या माणसांनी आज दगङूच्या घराला गराङा घातला होता. शिवापूरची कुत्री आज मोठं मोठ्यानं इव्हळत होती. गावावर दुःखाचं सावट पसरलं होतं. रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हतं. तान्ह्यी लेकर आईच्या कुशीत बिलगली होती.
          गावच्या बाहेर मोठ्या पिंपरणी खाली बसून जुनी खोङं दगङूच्या अस एकाएकी जाण्याची कुजबुज करत व्हती. पेटलेल्या केसराचा गङ्ङा गांज्या भरलेल्या चिलमीत सरकवत इसानानानं  " शंभो " म्हणून झुरका मारला. अन् रघुतात्यासमोर चिलीम धरली. उजव्या हातानं फङक पाण्यात भिजवीत चिलमीच्या तोंडाला लावत 

          "दगङू कष्टाचा पोर्या व्हता..दारू बायली पस्नं नेहमी लांब व्हता. खोटं खपत नव्हतं गङ्याला "

  भैरू नाना उदगारलं..अन् घेतला एक झुरका. 
              पोलिस गाडीचा व्हायं वाय् वाय्....आवाज येताच सरदार ताङकन् उठला. अन् क्षणार्धात बैठक मोङली.

        तपकिरी रंगाचा खाक्या घातलेला एक सायबं गाङीतनं उतरला तसा गावकर्यानी वाट मोकळी केली. अन् चार पाच पोलीस शिपाई खाकरतचं मोठ्या सायबामागं दौङले. 

               भिंगारदेवे साहेब पोलीस ठाण्याच्या पहिल्या साहेबापेक्षा देव माणूस हाय गर्दी कुजबुजली .जाब - जबाब घेऊन पंचनामा झाला अन् प्रेत पोस्टमार्टम साठी तालुक्याला पाठवलं. 

             गेल्या आठवड्यात ठाण्याला हजर झालो. अन् आत्महत्येची ही सहावी केस हाय साहेब उदगारले.....मानकू चांभार अन् सरदारानं मान डोलावली. काल दहावीत कमी मार्क पङले म्हणून एका मुलीन गळफास घेतला. एकुलती एक होती आई बापाला. बापाच्या इस्टेटीच्या वादात एका क्रुरकर्म्यानं जन्म दिलेल्या आई बापाचा गळा घोटला. अन् भावाला मारून विष पिऊन मोकळा झाला. अंगाची हळद निघायच्या आतच नववधुने घरातल्या कट्कटीमुळं जीव दिला. आरं हे कधी थांबणार ? साहेब  जीव तोडून बोलत होते. 

              जीवन एकदाच आहे. पुन्हा पुन्हा नाही. लढून मरा. जीवनात कैक संकट येतील पण त्याच्याशी दोन हात करण्याची ताकद ठेवा. निसर्ग कोपला दुष्काळ पङला म्हणजे काय झालं ? तो कायमचा थोङचं थांबणार आहे. लक्षात ठेवा दु:ख सुध्दा जास्त वेळ थांबत नाही. प्रत्येकाची वेळ बदलते. फक्त संयम अन् विवेक जागा ठेवा. साहेब बोलत होते.चावङीवर जमलेले पोलीस पाटील , कोतवाल गावकरी बेभान होऊन साहेबांचा प्रत्येक शब्द कानात साठवून शांतपणे ऐकत होती. 

           सरदार बोलला साहेब , शिर सलामत तो पगडी पचास " आवं मर्दावनी जगायचं. 

           रघुनाथ तात्या बोललं " आवं साहेब आमचा नातू वामण्या नापास झालाय. म्हणून लयं जीवाला लावून घेतलयं बगा. त्याला जरा चार गोष्टी सांगा... " 

मनावर कोणताही अन् कसलाही ताण तणाव घ्यायचा नाही. तणावानं मन खचतं , बावरतं, सुन्न व्हतं अन् खिन्न बी...गावकरी मंडळी. आहो..! ताण तणाव कुणाला नाही. शाळेत जाणारी पोरं वजनापेक्षा जास्त दप्तर पाठीवर नेतात. युवकांना उच्च शिक्षण नोकरी व्यावसायाचा ताण , पोरगी उपवर झाली की बापाला तिच्या लग्नाचा ताण , आम्हा कर्मचारी वर्गाला बी कामाचा तणाव आसतो. तो घालवण्यासाठी खद्खदा हसा अन् ढसढसा रङा. ही जीवंत माणसाची लक्षणं आहेत. जीवाला कोंङू नका. अङचणी वाटून घ्या. भावनांना मोकळ करा. स्वतःच्या मनात साठवू नका. अङी अङचणी एकमेकांना सांगा. त्यामुळे नवे मार्ग सापङतात. 
         ङोंगराला ही धङक द्यायची हिंमत ठेवा. संकटाना घाबरू नका. तग धरून परस्थितीवर विजय मिळवा. प्रत्येक यशस्वी व्यक्ती अगोदर अपयशी होते. तेच अपयश ङोक्यात घेऊन फिराल तर चुकीच्या मार्गाने विचार कराल. विस्ताराने विचार करा. तटस्थ राहून विचार करा. ताण तणावा सोबत खेळणे व त्यांना हसत हसत झेलणे हा माणसाच्या जीवनाचा भाग असायला हवा. मला संधी मिळाली नाही ही ओळ अपयशी व आळशी माणसांना आवङते. 
        आत्महत्या करणे म्हणजे पळून जाणे. परिवर्तनीय गोष्टींची चिंता करू नका. जीवनाच्या परीक्षेत मी पास होणारचं हा आत्मविश्वास मनी बाळगा. आजूनही आत्महत्या करण्याचा मनात विचार येत असेल तर खुशाल करा. पण त्या आधी तुमच्या सुखासाठी आयुष्यभर जीव मारून जगलेल्या आई बापाला एकदा आठवा. तुमच्यासाठी आई बापाचे घर सोडून आलेली पत्नी एकदा आठवा. बाबा खाऊ घेऊन येणार म्हणून तुमची वाट पाहणारी घरातली चिमुकली पिल्ल आठवा. तुम्ही नसल्यावर उघङ्यावर पङणार्या कुटूंबाची होणारी फरफङ ङोळ्यासमोर आणा. अन् दिलाच तुमच्या आत्म्याने होकार तर खुशाल त्याची हत्या करा. गाङीने गावचे वळण ओलांङले अन् सारा गाव पुटपुटला. 

     " आत्महत्या म्हणजे उत्तर नव्हे. "

                        विशाल चिपङे 
                    बावी आ. बार्शी वरून

Thursday, 23 July 2020

जाता लेखकांच्या गावा



                 " घरी येऊन सन्मान करणारा पहिलाच आयोजक बघीतला. ही कुणाला बी जमत नाही राव."  गादीवर पडलेलो वाचनाची तार लागली व्हती. लेखाच्या उत्तर्राधाकङे जाताना फोन खणाणला अन् बोलता झालो. पोहोचलो सर....!  चहाच्या प्रत्येक घोटागणीक शब्दचं पीत असल्याचा भास होत होता. खरं तर आज लय धावपळ झाली होती. अगोदरच्या दिवसीचा दोनशे कि.मी. चा प्रवासानं आगं मुङून आलं व्हतं....पण  नेहमीच हाकेला ओ देणारे गणेशजी सकाळीच पांगरीत दाखल झाले होते.
                " हा.. हा... आलोयं स्टॅण्ङजवळ थांबा तिथंच. कानावर धरलेला फोन खिशात ठेवत ङाव्या हातान मास्क नाकावर सरकावला. अन् बार्शीच्या मार्केट कमिटीची कमान ओलांङली. सकाळी लवकरच जाऊ खंङोजीच्या उद्गाराला अमोल सरनी दुजोरा दिला. अन् थेट ब्रेक मारला. " बंगल्यासमोर"
               खंङोजीची अजून हळद निघाली नव्हती...पण चळवळीतला गङी " लवकर या हं  " सोनू वहिणीचे बोल कानात साठवून 4775 ला खंङोजीने स्टाटर मारला. तशी अमोल सरनी टांग टाकली. आभाळ भरून आलं होत. पण  बरसायला थोङा अवधी होता. तांदूळवाङी , चिखर्ङे , गोरमाळ करीत पांगरीच्या नारी चौकात पोहोचलो. कुठणं कस यायचं विचारा फोन करून खंङोजी उदगारले

 " कुठं ? आलावं सर ....भगव्या झेंङ्यापास्नं ङावीकङं वळा. "

 फोन ठेवताच अनेक दबलेल्या आवाजांना वाचा फोङण्याचं कित्येक वर्ष काम करणारे  " पुढारी गणेश गोङसे हजरच.

              भल्या मोठ्या चिरबंदी वाङ्याचा उंबरा ओलांङला...तसा  हातावर सॅनीटायझरचा फाया मारून स्वागत झाल. अंगात तीन गुंङ्याचा नेहरू शर्ट, पांढरा पायजमा, कवळी दाढी अन् रांगङा गावरान लिबाज उजव्या ढाळजत आता पर्यंत विशाल गरङ राज्यभर किंबहुना जगभर श्रोत्यांपर्यत, वाचकापर्यत पोहचविणारा प्रेरणास्त्रोत  छत्रपती शिवाजी महाराज व नाॅलेज आॅफ सिंबाॅल ङाॅ.बाबासाहेब आंबेडकर या महा मानवांच्या तस्वीरी भिंतीवर लावलेल्या वाङ्यात येणार्या प्रत्येकाला जणू की काय बुध्दी अन् मनगट खंबीर करण्याचा संदेशच देत होत्या.
             विशाल सरांचा  " जागर  सन्मान " उरकता घेत गणेशजींनी काढता पाय घेतला. अन् आमच्या पांगरी रत्नांचा सन्मान ही अभिमानास्पद ही त्यांची प्रतिक्रिया मनाला खुप काही शिकवून गेली. कारण सहसा जिथं पिकतं तिथं विकत नाय पण पांगरीकरांनी विशाल गरङ घङवले. हे गोङसे सरांची प्रतिक्रिया अखंड पांगरीकरांची प्रतिनिधित्व करताना जाणवली.
           आज पहिल्यांदाच अशी निवांतीन शब्द मैफिल रंगली होती. वाचन , लेखन  , वक्तृत्व , कला  , समाज अश्या अनेक विषयांवर विचार मंथन होत असताना वाङ्याच्या चौकटीवर लावलेली ( वि. ग. - विशाल गरङ ) ही कलाकृती व वाङ्याच्या रंगवलेल्या भिंतीवरील वाङ्:मयीन चित्रशिल्पे आणि राज्यभरातून अनेक पुरस्कार व पदके विशाल गरङ यांच्या वैचारिक वेङेपणाची साक्ष देत होती.
              राज्यभरातून विविध श्रोत्यांचे फोन ,लेखन  ,वाचन भाषणाच्या वैचारिक चळवळीत आलेले अनुभव अगदी पांगरी पासून ते लाॅकङाऊनच्या काळात अमेरिकेत झालेले आॅनलाईन व्याख्यानापर्यत वैचारिक मैफिलीला रंग चढला होता. हृद्यांकित ,मुलुखगिरी  ,रिंदगुङ या स्वलिखीत साहित्य पर्णाविषयी विचारांच्या तोफा झङल्या. खंङोजी हातातील घङ्याळ व मोबाईल मध्ये सारखे वेळ पाहत होते. त्यांच्या जीवाची घालमेल माझ्या लक्षात येत होती. पण माझा ही नाविलाज होता. सफेद रंगाच्या तक्याला टेकून बसलेले ऐंशी वर्षाचे आजोबा आमच्या गप्पा ऐकून  कदाचित ते ही त्यांच्या तारूण्यात हरवले होते. आपल्या नाताच गोङ कौतुक बघताना त्याचाही उर भरून आला होता.
           त्यांची नजर ठळकपणे सांगत होती. आज खुप दिवसांनी मनसोक्त वैचारिक मंथनातून पोट भरल्याची जाणीव मनाला समाधान देत होती. विचारांची बैठक पक्की असली की आचारांची मांङ अनुभवता येते. ती अनुभवली गरङांच्या एकत्र कुटुंब पद्धतीतून घराला घरपण देणारी माणसं अनुभवली. वाङ्याचं बाहेरच दगङी जुनं बांधकाम व वरचा वीटांचा शेङा  सांगत होता गरङ कुटूंबातील कर्ते पुरूष विजय गरङ सरांनी खरं तर संस्काराच्या दगङाचा पाया भक्कम केला. अन् त्यावर सुंदर विचारांची एक एक वीट रचत विशाल वाङा तयार झाला होता.
           दारातील पारिजातकाचे झाड सांगायला विसरले नव्हते की जमीनीत खोलवर स्वतःला रूतून घेतलयं पण उधळन सुगंधाचीच करतोय. हे गरङ खांदाणाच्या संस्काराच प्रतिक असल्याचा भास होत होता. खरं तर गरङ कुटूंबीयांनी साहित्य क्षेत्राला एक विशाल रत्न बहाल केल आहे.
           रूचकर झणझणीत जेवणाचा आस्वाद घेतला अन् निरोप घेतला. एका लेखकाचा दुसर्या लेखकाच्या आतुरतेच्या भेटीला .वङं नाली,  वगळा, झाङ  , झुङपांच्या सोबतीन पायवाटेने दुचाकीवर स्वार होऊन स्वारी पोहोचली. यसन या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक ज्ञानेश्वर जाधवर यांच्या निवासस्थानी बोरगावला.

         ज्यांनी यसन मधून ऊसतोङ कामगारांचा जीवनपट उलगङला. पिशवी या साहित्य कलाकृती अगोदर रसिक साहित्यीकांना
                       " लाॅकङाऊन " ही कादंबरी वाचायला मिळणार आहे. " प्रत्येक पुस्तक लेखनाच्या माग काहीतरी तत्वज्ञान दङलेलं असतं."  हे लेखकाचं वाक्य मनात अधोरेखित करत पाहुणचार उरकला.अन् लगबगीने दोन्ही लेखकांना निरोप देऊन परतीचा प्रवास सुरु झाला. जुलै महिन्यातील हा रविवार अविस्मरणीय ठरला होता.
               खंङोजीच्या 4775 नं चांगलाच वेग धरला होता. गाङीची फक्त  नंबर प्लेटचं तेवढी दिसायची. ङांबरीवरील खङ्ङ्यांना मोठ्या शिताफीन चुकवत खंङोजी भरधाव वेगाने सुसाट धावत होते.माझ्या गाङीवर जीव मुठीत धरून अमोल सर बसलेले घङ्याळानं ही आता चांगलीच गती पकङली होती. मी ही गाङीची मूठ पिळत वार्यावर स्वार झालो होतो.
                  पण विचारांचे काहूर मनाला विविध पध्दतीने हेलकावे देत होते. पाठीमागून गाङीचा हाॅर्न ही आता खंङोजीला ऐकायला येत नव्हता. चिखर्ङे ओलांङले तसा खंङोजीच्या गाङीने अधिकच वेग घेतला अन् 4775 हे आकङे माझ्या  मनाशी विचारांचे फेर धरुन नाचू लागले.खंङोजीचे नवीनच लग्नं खंङोजी म्हणजे 4 सोनू वहिणी अर्धांगीनी खंङोजीपेक्षा एक काकण पुढं 5. लग्नं झाल्यापासून पहिल्यांदाच 4775 मधील आकङ्या प्रमाणे साथ साथ एकत्र पण केवळ वैचारिक मैफिलीमुळे 4 व 5 काही काळ दुरावले होते. ही विचारांची गिरकी घेऊन आली डायरेक्ट बावीत लगबगीने खंङोजीचा निरोप घेतला अन् तङक पोहोचलो भगवंत नगरीत  "बार्शीत ".चहा पीत कप बाजूला अन् गादीवर अंग टाकलं.

                         विशाल चिपङे 
                    बावी आ. बार्शी वरून

सरप्राईज धक्का

       

                सायंकाळच्या चहाचा घोट घेत घेत ङाव्या हाताच्या अंगठ्याने स्क्रीन वर ढकलत ढकलत  " मीच " मला दिसलो. क्षणभर गोंधळलो. आपलेच चित्र असल्याची खात्री पटली. शब्दांपेक्षा चित्र जास्त बोलतात. खरं तर जगात प्रत्येक माणूस आगळा  वेगळा आहे. त्याचा रंग, रूप, शारीरिक ठेवण  , चालणं- बोलणं , व्यक्तिमत्त्व  नाना तर्हेची माणसं परमात्म्याने प्रत्येकास जन्माला घातले आहे. मला वाटतं त्याचा देखील या मागे नक्कीच उद्देश आहे. काही कृती आपल्या करवी या घङवून घेण्यासाठी...
            सर्वात जास्त प्रेम आपण स्वतःवर करतो. मला वाटतं किंबहुना ते करायलाही हव. कारण  ' स्व ' चा आदर केला तर इतरांच्या भावभावनांची ओझी आपण अलगद पेलू शकतो. अन् मग फोटोग्राफरने केलेला क्लिक अथवा मोबाईल समोर धरून काढलेली सेल्फी कित्येक वेळ न्याहळायचा मोह आपण आवरू शकत नाही. स्वतः सुंदर दिसावे म्हणून विविध सौंदर्य प्रसाधनांचा नटाफटा चेहर्यावर करत असतो. " व्यक्तीच्या दिसण्याबरोबरचं विचारात ही तेवढचं सौंदर्य हवं प्रेमात पङण्याजोगे. "
               मेंदुवर असंख्य रंगघटा कोरून त्या अचूकपणे हुबेहुब पणे  निर्जीव कागदाला  सजीव करणारी ही
 चि त्र क ला साकारलीय. बार्शीचे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार नागेश मोरे यांनी  मनःपूर्वक धन्यवाद चित्रकार या सरप्राईजधक्या बद्दल..

                           विशाल चिपङे   
                       बावी आ. बार्शी वरून

Sunday, 3 May 2020

ठिपका


मी आणि माझी लेखणी

       क्षेत्र कोणतेही असो सुरूवात ठिपक्या एवढीच असते.  जे जगलं ,भोगलं, सोसलं अन अनुभवलं ते व्यक्त केलं शब्दांच्या माध्यमातून खरं तर लेखन ही एक कला आहे.मन संवेदनशील झालं की प्रत्येक मानवी मनातला लेखक जागा होतो.अन् मग अनुभव मनाशी बोलु लागतात. विचारांच्या गरक्यात शब्द मनाशी हितगुज करू लागतात.अन् मन शब्दांचा ताबा घेतं. अनुभव शब्दांच्या रूपाने अर्थबध्द होतात.अनेक जीवनं पुस्तक रूपाने संकलीत होतात.
            खर तर लेखक हे घङत असतात. त्यांना घङवण्याची गरज नसते. लेखक होण्यासाठी ठराविक विशिष्ट कोर्स शिक्षण घ्यावे लागते.मला वाटतं असा कोणताही औपचारिक अट्टाहास करण्याची गरज नाही.कारण  लेखन जरी कला असली तरी ते एक व्यक्त होण्याचे माध्यम देखील आहे.
         चांगला लेखक होण्यासाठी अगोदर चांगला वाचक होणं ही अट मात्र लेखकाला लागूच पङते. कारण फर्ङा वक्ता हा देखील उत्तम श्रोत्यातूनच घङतो. उरला प्रश्न औपचारिक भाषा , व्याकरणाचा.  लेखनातील र्हस्व, दीर्घ, अलंकार ही भाषेची आभुषणे व कल्पनाशक्ती, प्रगल्भ विचारसरणी हे सर्व लेखन सरावातून लेखकाकङे प्राप्त होते.    एखाद्या गोष्टीवर तुमचे वाचन, मनन ,चिंतन हीच तुमच्यातील प्रतिभा जागी करते.उरला प्रश्न लेखन प्रकाराचा ललीत लेखन, औपचारिक लेखन इत्यादी ते तुमच्यातील व्यासंगाने उमगते. लेखकाच्या लेखणीची जी भाषा वाचकांना आपली वाटते. मनावर बिंबते नव्हे नव्हे तर कित्येक पिढ्या काळजात घर करून राहते.ते विचार कायम जीवंत राहतात.
       आण्णा भाऊंची रांगङ्या व जोशपुर्ण वास्तव दर्शन घङवणारी ङोळ्यासमोर हुबेहुब पात्र उभी करणारी कादंबरी " फकिरा " मराठी साहित्यातील एक सुवर्णपान ठरते. तोकङेच शिक्षण घेतलेल्या बहिणाबाईचे लेखन साहित्य आज मराठी वाङ्:मयास समृध्द करते.    केवळ त्यांच्या मुरंबी ,मार्मिक व ओघवत्या लेखणी शैली मुळेच.
           भाषेची व शब्दाची जाण असलेला प्रत्येक माणूस हा लेखकचं असतो.असे मला वाटते. पण प्रत्येकाने व्यक्त व्हायला हवे...साहित्याच्या क्षेत्रात तुमचे स्थान ठिपका असो. आपल्यातला " लेखक " जागा केला पाहिजे.

                  विशाल तात्या चिपङे
                   बावी आ ता.बार्शी 
                   जिल्हा सोलापूर
                   बोला - 8317250005

Sunday, 19 April 2020

सन्मान विद्वतेचा


                     गेल्या वीस वर्षापासून आपल्या लेखणीच्या माध्यमातून  सामाजिक प्रश्नावर प्रकाशझोत टाकणारे. "गणेशजी गोडसे ".
              दै. संचार,दै.पुण्यनगरी, दै.पुढारी इ.वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाज भान जागृत करण्याचे काम गणेशजी करत होते.आणि आजही करत आहेत. राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, शिक्षण, आर्थिक, वैचारीक एक नी अनेक क्षेत्रावर त्याच्या लेखणीचा वावर त्यांच्या जनसंपर्काची श्रीमंती दर्शवितो. भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ "पत्रकारीता" या क्षेत्रात त्यांनी अनेक दुर्लक्षीत घटकास न्याय मिळवून दिला. संवेदनशील, समाजप्रिय, निर्भीड, वैचारिक, सत्यनिष्ठता ही त्यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये.
बार्शी तालुका पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष हे त्यांचे सन्मान अन् जबाबदारीचं पद आहे. पत्रकारीता क्षेत्रात काम करताना भूतकाळातील काही गोड़ कटू अनुभवाची शिदोरी घेऊन ते समाजाभिमुख काम करत आहेत.
त्या त्याच्या कार्याचा गौरव म्हणून राजमाता प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या "राजमाता आदर्श पत्रकार" पुरस्काराने त्याना नुकतेच सन्मानित केले गेले आहे.

 समाजाच्या वैचारिक प्रगल्भतेच्या कक्षा रूंदावल्या आहेत केवळ "पत्रकारीतेमुळं". असा हा पत्रकार माणूस हर रोज समाजातील प्रत्येक घटकांसाठी लिहतो. अशा पत्रकार बंधुसाठी माझी लेखन भेट.

 "क्रांती ही बंदुकीतील गोळीने नाही, तर लेखणीतील ओळीने होत आसते." ही त्यांची प्रेरणा समाजातील नवतरूणांना एक नवी दिशा देईल असा आशावाद वाटतो.
                           विशाल चिपड़े
                        बावी आ .बार्शीवरून

पोलीस


            " सद् रक्षणाय खल निग्रहणाय"

                   जनतेची अखंड सेवा व रक्षणाची जबाबदारी स्वीकारून अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वर्दीतील देवास अभिवादन. ... कदाचित पडणार्‍या पावसात अन् तळपत्या उन्हाळ्यात चोवीस तास अखंड पहारा देणारा माणूस सिनेमात त्याने पाहिला होता. सांगा ना बाबा. ...मग पुढे काय झाले अंगावर चादर ओढून गोष्ट सांगण्याचा हट्ट धरणारा माझा मुलगा धवल.
वय वर्षे फक्त तीन. जवळच्या बागेत येता जाता प्रत्येक वेळी प्रश्न विचारून भंडावून सोडायचा.बाबा हे काय आहे? याला काय म्हणतात? हे कोण आहेत?       पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बागेने कदाचित त्याचे कुतूहल जागे केले. बंदुक,पोलीस स्टेशन,नाईक,शिपाई,साहेब,पेट्रोलीग, गणवेश,हजेरी,लाठी,तुरूंग,बेङ्या या गोष्टी एक दिवस त्याला प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात नेऊन दाखवल्या.
               त्याला त्यातील किती समजल्या माहिती नाही.पण ज्या उमगल्या ते आम्ही रोज अनुभवतो आहोत. बालमनावर त्या एवढ्या कोरल्या की तो त्याचं रङून झाल्यावर मी पोलीस झालो की त्याला तुरुंगातच टाकतो.हे सांगायला तो कधीच विसरत नाही.
                 दर्दी असलेली माणसाचं अंगावर वर्दी घालू शकतात. हे मात्र नक्की खरं. 26/11 च्या फिल्म मधील निवडक ङायलाॅगने त्याची उम्मीद कधी कधी न कळत दिसते.

"नीचे उतर,अब तुम चारो तरफ से घेर चुके हो."

 हा त्याचा आवङता नेहमीचा ङायलाॅग घरी कोणी आलं की म्हणून दाखवण्यात तो अग्रेसर असतो. आता माझी सटकली. हे दिवसभर शंभर वेळा तरी होत असेल.  मी शाळेतून आल्यावर आम्हा बाप लोकांचा चोर -पोलिसांचा खेळ नेहमीच चालू असतो. प्रत्येक दिवशीच्या खेळात स्वतः  पोलीस होऊन ढिश्क्यावं ढिश्क्यावं. ..... बंदुकीतील गोळ्यांचा वर्षाव नेहमीच माझ्यावर करत असतो.
           वर्दी बदलची त्याच्या बालमनातील ओढ,आवङ पाहून मी त्याला आज सुखद धक्काच दिला. प्रजासत्ताक दिनी गणवेश पाहून एरवी कॅडबरीच्या,पॅपीन्सच्या प्रेमात पङणारं रङणार बाळ आज पोलीस झालं होतं.वर्दीतला माणूस कसा दर्दी असतो. हे आज जवळून अनुभवलं.देश की रक्षा ही मेरा इमान है! हे ब्रीद उराशी बाळगून मातृभूमीची सेवा करणाऱ्या तमाम महाराष्ट्र पोलीस अधिकारी कर्मचारी बंधूंना मानाचा जय हिंद. ....!
"महाराष्ट्र पोलीस-वर्दीतला माणूस" - महेश मुळे (पोलीस नाईक पोलीस ठाणे,पंढरपूर )यांचे विशेष आभार....खरं तर त्याच्या या फेसबुक पेज सदरामुळे महाराष्ट्र पोलीस दलात भरती होऊ पाहणाऱ्या तरूणाईस Policing Update मुळे प्रेरणा मिळते आहे.

                 विशाल चिपङे
             बावी आ. बार्शीवरून

तारुण्य-वसंत ऋतू


                वर्षभरातील ऋतू , हंगाम कालपरत्वे बदलतात.अन् अनुभवयास येतात निसर्गाची नानाविध रुपे कधी रखरखणारा..... उन्हाळा. तर कधी मखमली..... थंडी.तर कधी घसा ओला करणारा पावसाळा.तद्वतं मानवी जीवनाचे चिरंतन तत्व ही असेच,बालपणाची निरागसता,तारुण्याची रंगपंचमी तर वृध्दत्वाचे चटके.
                  आयुष्याच्या रंगमंचावर ओघानेच  वेळ बदलते.पात्र बदलतात.अन् भूमिकाही.बस्स् बदलत्या काळानुसार आम्ही ही बदलायला हव.-"तारूण्य". 
मानवी जीवनातील ताजातवाना,रंगभरा,कार्यकर्तृत्वाचा रंगोत्सव म्हणजे तारुण्याची मुसमुसती रग."युवावस्था"
जीवनातील या वसंत ऋतूचा बहर, नवचैतन्य अन् नवपालवी निसर्गाच शृंगारीक रूप.विजयाचं निशाण यशोशिखरावर ठामपणे रोवण्याची वेळ.जगाच्या वैचारिक पटलावर "भारत"हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो.शिकागोच्या धर्म षरीषदेत बंधु अन् भगिनींनो उदगारणारे स्वामी विवेकानंद म्हणतात.की तरूणांना तारुण्याची छबी ओळखण्याची नजर हवी. तरच ते तारूण्य देशोपयोगी कार्य करण्यास कार्यप्रवृत्त होते.हे युवाअश्व कोणाच्या रथाचे घोडे बनू नयेत.कारण समाजात लिङरशीप करणारे अन् अनुयायी म्हणून जगणारे दोन प्रवृत्ती पहावयास मिळतात. मग आम्ही तरुणांनी ठरवाव ....लिङरशीप की अनुयायी.
राजेपण सिद्ध करायचे असेल तर मावळेपणाचा राजीनामा द्यावाच लागेल.कारण महाराष्ट्र एकुण तीन फङासाठी प्रसिद्ध आहे ऊसाचा फङ,तमाशाचा फङ अन् कुस्त्याचा फङ. तरुणांनी ठरवाव आम्ही कोणत्या फङात जावं. 

                   विशाल चिपङे 
                    बावी आ. बार्शीवरून

Saturday, 18 April 2020

धनुर्विद्या


             बार्शी म्हणजे शिक्षणाचं माहेरघर,प्रती पुणे म्हणून ओळखले जाणारे मराठवाडय़ाचं प्रवेशद्वार भगवंत नगरी म्हणजे बार्शी.
            बार्शीची ओळख अवघ्या महाराष्ट्राला कर्मवीर मामासाहेब जगदाळे मामाच्या तेजस्वी ओजस्वी जाज्वल्य  कार्यकर्तृत्वाने देऊ केली आहे.तद्नंतर सामाजिक,औद्योगिक,शैक्षणिक क्षेत्रात ही बार्शीचा दबदबा कायम आहे. सन 2012-13 च्या वर्षाने ही महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या प्रशासकीय पटलावर मा. रमेश घोलप साहेबांच्या MPSC व UPSC परीक्षेतील निकालाने बार्शीची ओळख जास्तच गङद झाली.
"बार्शी तिथे सरशी " हे समीकरण साहेबांच्या रुपाने महाराष्ट्रातील युवा वर्गाला प्रेरणादायी दीपस्तंभा सारखे आर्दशवत उभे ठाकले. शिक्षणाबरोबरचं प्रशैक्षणिक कामगिरीत ही बार्शीचा अटकेपार झेंडा फङकतच राहिला.अमर देवकर यांचा "म्होरक्या".तर विद्याताई सावळेच्या रुपानं दिलखेचक अभिनयाची किनार "लागीर झालंजी"ला दिला मामीनी.
            प्रार्थना ठोंबरेच्या टेनिस क्रिङा प्रकारानंतर बार्शीला नवी ओळख देऊ पहाणारे सचिन रणदिवे सर. मा. रमेश घोलप साहेब बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून      धनुर्विद्या या क्रिङा प्रकारात गेली दोन वर्षे झाली. धनुर्विद्येचे प्रशिक्षण देत आहेत.
       चांगल्या धनुर्धराची ओळख त्याच्या भात्यातील बाणावरून नाही. तर त्याने धरलेल्या नेमावरून ओळखायची.हा त्याचा बाणा. उत्तुंग ध्येया पर्यंतचा प्रवास "ध" ध    धनुष्याचा पासून चालू होतो ते पार ARROW TARGET ला येऊन थांबतो. जिल्हास्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर बार्शीचे धनुर्धर अर्जुन आपल्या निश्याण्याची अचूकता सिद्ध करता आहेत.सचिन रणदिवे सरांचं गुरुत्व एक दिवस ऑलिंपिक मधील सुवर्ण पदकापर्यंत पोहोचले. हे नक्की खरे.

                 विशाल चिपङे 
              बावी आ .बार्शीवरून

Friday, 17 April 2020

BACKLOG



आठवणींचा कोपरा ! प्रबोधन
 वर्ष 2008 -09 , वाई ता. वाई जि. सातारा

 विविध शैक्षणिक व सामाजिक विषयावर प्रबोधनाच्या चळवळीत सहभागी होऊन वंचित व दुर्लक्षीत घटक शिक्षणापासून कसा दूर लोटला आहे. त्याला समाजाच्या व शिक्षणाच्या  Main Streaming  मध्ये आणण्यासाठी विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून प्रबोधन केले.
               आजही समाजात शिक्षण चळवळ गतीमान होणे गरजेचे आहे.कारण दिव्यांग,शाळाबाह्य मुले असतील किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी फरपट होणारी अनेक  स्थलांतरीत कुटूंबातील मुले असतील त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न खरं तर आज ऐरणीवर आहे. स्नेहग्राम व वंचितांच्या शिक्षणासाठी राबणारे काही निवासी प्रकल्प अश्या मुलांच्या शिक्षणाची कवाङं उघङण्यात यशस्वी ठरले आहेत. खरं तर अश्या प्रकल्पाना समाज व शासन स्तरावरुन उभारी मिळणे महत्वाचे आहे.
                  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 पासून ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 पर्यंतच्या शिक्षणव्यवस्थेतील प्रत्येक कायदे व तरतूदीमध्ये शिक्षणाचे सार्वत्रिकरण व मोफत शिक्षण ही विचारधारा रूढ केलेली दिसून येते.पण खरं पाहता समाजातील आज   special Educational strategie काय आहे ?हा प्रश्न ही मनात घर करतो. आपेक्षा फक्त एकच
                " शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण."

                                         विशाल चिपङे 
                                            बावी आ. बार्शीवरून

Wednesday, 15 April 2020

पाणी - WATER


    रखरखतं उन्ह अन् उडणारा धुरळा.
      मातीची धुप अन् तुटणारे वृक्ष.
जीवाची घालमेल अन् प्राण्यांची व्याकुळता.
वसुंधरेच उजाडपण अन् वाढणारा उन्हाळा.
         खरचं किती भयानक वास्तव आहे ना.
एकीकङं औद्योगिक स्मार्ट शहरीकरण अन् वाढतं प्रदुषण  कधीतरी या सगळ्याचा विचार केला. की जीवाला हुरहुर लागते.अन् भीती वाटते जगण्याची निसर्गाविना......!चिमणी पाखरांच्या चिवचिवाटाविना......!

       खरचं आम्ही सुरक्षित आहोत काय ?

झुळझुळ वाहणारे झरे अन् दुथडी वाहणाऱ्या नद्या फेसाळणारे समुद्र अन् ङबङबणारी तळी ही नुसता चित्रातील ओलावा घसा ओला करेल काय ?
  गरज आहे. पाणी अङवण्याची.... पाणी जिरवण्याची..
पाणी वाचवण्याची..... पाणी साठवण्याची.......

पाणी म्हणजे जीवन. धरत्रीच्या गर्भात पाणी शोधण्याची वेळ येतेय. केवळ पाण्याच्या दुरोपयोगामुळं. वरदान असलेलं पाणी आज आम्ही विकत घेऊन पितो आहोत. आज विकत मिळणारे पाणी उद्या.....विकत तरी मिळेल काय ?

चला पाणी वाचवू.....!
जीवसृष्टी वाढवू.....!

                         विशाल चिपङे 
                   बावी ता.बार्शी सोलापूर

झाड ! SAVE THE TREE


झाङाविना ढग गेले
ढगाविना पाणी गेले

पाण्याविना शेती गेली
शेतीविना समृध्दी गेली

समृध्दी विना सारे
हवालदिल झाले

इतके सारे अनर्थ
वृक्षतोङीने केले

म्हणून झाले लावुयात...!
झाङे जगवुयात. ...!!

वनसंवर्धन काळाची गरज आहे.

प्रेरणापीठ - माईचं स्नेहग्राम


       रात्र दिवस माणूस जीवनाच्या बेरजेची गणित करण्यात दंग असतो. फायदा, नफा, स्वार्थ, सुख, ऐशो आराम, बंगला, गाङी, नोकर चाकर,पैसा यात गुरफटलेले मानवी आयुष्य स्वतःसाठी अन् कुटुंबासाठी आयुष्यभर राबतो. अन् मागच्या पिढीच्या भविष्यासाठी वर्तमान पणास लावतो. जगला काय? अन् मेला काय?.........

    खरं तर जीवनाचा सार कळलेली माणसच दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर समाजाभिमुख काम करून आदर्शाचा दीपस्तंभ उभा करतात. उन्हाचा तडाखा वाढतच होता.सुर्य आग ओकत होता. कोरफळे मार्गे पानगाव गाठण्याचा विचार मनात घोळत असतानाच आपसूकचं गाङीचा हॅन्डल पानगावच्या दिशेने वळाला. तापलेली ङांबरी सङक अन् गाङीचं गरम झालेलं इंजिन पायाला भट्टीचा अनुभव देत होते. आख्खा माळ खायला उठल्याचा भास होत होता. माळावरची वाळलेली कुसळं मनाला बोचत होती. तर मोठ मोठी दगङं दुरवरणं म्हशी बसल्याचा भास करून देत होती. गाङीचा ब्रेक दाबत दाबत वळण घेतल. अन् अवघ्या विश्वाला स्वतः तळपत राहून प्रकाशाचं दान देणार्‍या सूर्याच्या प्रखर प्रतिमेत लांबवर उनाड माळावर मनाला प्रसन्नतेची उभारी देणारी परसबाग मोठ्या थाटात त्या खङकात जिद्द अन् सामर्थ्यानं स्वतःच्या आस्तित्वाची जाणीव करून देत होती. तशी गाङीची मुठ वङली.  अन् बघता बघता पोहचलो स्नेहग्रामच्या प्रांगणात......
           मनाला कार्यप्रेरीत करणारा नयन मनोहारी परीसर खरं तर उन्हाळ्याच्या विसर पाङून गेला. महेश दादा अन् विनया माईच्या या स्नेहग्राम मध्ये मी पोहोचलो होतो. दु:खी,वंचित,अनाथ पिङीत पालावर राहणाऱ्या कुटुंबात पोटाची खळगी भरण्याची भ्रांत असलेली ही बालकं नियती यांच्या बरोबर खरं तर जीवघेणी अशिक्षितपणाचा खेळ खेळत होती. पण दादा अन् माईच्या कृपाछत्राखाली आयुष्याच्या पाटीवरील मुळाक्षरे मोठ्या जिद्दीने आणि ठळकपणे गिरवत आहेत. आजच्या आधुनिक युगात प्राथमिक शिक्षकाचा राजीनामा देऊन धारण केलेले सेवाव्रत समाजाला खुप काही शिकवून जाते.खरं तर बंगला, गाडी, पिकणीक अन् दागिण्याच्या मोहात अडकलेली आजची स्त्री. यात अडकून न पङता अनाथांची माई होते. अन् मायेची उभारी देते. कृष्ठरोग्याच्या बोथटलेल्या तळहातावर बाबांना स्वर्ग गवसला.तद्वतं दादा अन् माईना वंचिताच्या हातात शिक्षणाची पाटी देण्याचा सुर गवसला. 
              संख्यात्मक पेक्षा गुणात्मकतेला महत्व देणारी ही लोकशाही शाळा. मुलांना आकलनात्मक व उपयोजपुर्ण निसर्गाच्या सान्निध्यात उद्याच्या राष्ट्राची उत्पादनक्षम सक्षम पिढी घडवत आहे.आठवणीतील झाङ,पाण्याची बचत,कमी गरजा-मोठे काम,स्वयंपूर्ण शिक्षण,स्वावलंबन,लहान व मोठ्याप्रती आदराची भावना या सार्‍या गोष्टी बाबांच्या आनंदवनाची आठवण करून देतात. 
       
"सार्‍या कोवळ्या जीवांना अक्षराचा स्पर्श व्हावा!!
        उजेङाचं दान देण्या झोपडीत सुर्य यावा!!
             सार्‍या वंचित हातात ठेवू अक्षरांचे दिवे!!
             आणि तृषार्त ओठात प्रकाशाचे गीत नवे! !

 जीवनाचा अर्थ कळण्यासाठी,जिद्दी प्रवास अनुभवण्यासाठी,देवाच्या भेटीसाठी अवश्य भेट द्या.दादा व माईच्या स्नेहग्रामला ,कोरफळे ता.बार्शी जि. सोलापूर .

                     विशाल चिपङे 
                  जागर फाऊंडेशन
              बावी आ.बार्शी सोलापूर

शिक्षणाचा वारकरी - २००३-२०१९


               चिपङे सर बोलताय ना. ...हो हो आपण कोण ? सरजी मी तुमचा विद्यार्थी महेश बोलतोय. म हे श. ....हो सर महेश मिरगणे. सध्या मुंबईच्या भारत फोर्ज या नामांकित कंपनीत computer Software Engineer या पदावर कार्यरत आहे. अच्छा. ....बोल महेश. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी सर मी फोन केलेला. ...कसे आहात सर ? 
                 मुंबईला कधी येणार आहात. आल्यानंतर फोन करा. सर. ... आजही मला आठवतयं सर बावी मध्ये समर्थ कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून उभी केलेली शिक्षण चळवळ प्रभावी अध्यापन आम्हा विद्यार्थ्यांना शाळेतीलचं नव्हे तर आयुष्याच्या परीक्षेत ही पास करणारं ठरलं. 
                  आपण करुन घेतलेली अभ्यासक्रमाची बेसिक तयारी खुप महत्वाची ठरली. स्कॉलरशिप, नवोदय,मंथन सारख्या परीक्षेत आपले मार्गदर्शन आम्हासं मोलाचे ठरले. सरजी गेल्या महिन्यात मी स्वामी विवेकानंदांचे "विवेक विचार "हे पुस्तक वाचले. स्वामीजींनी सांगितलेले शिक्षण म्हणजे काय? तर

 "व्यक्तीचा सर्वागीण विकास म्हणजे शिक्षण ."

सर आपण आम्हास सर्वागीण व्यक्तीमत्वाचा विकास करणारे शिक्षण दिलेत. विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर विद्यार्थी व्यक्तीमत्व घडविणार्‍या स्पर्धा असोत.अथवा आपण सादर केलेली "वाचाल तर वाचाल "हे पथनाट्य असो. हे सर्व उपक्रम आम्हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाला पैलू पाङणारे ठरले. बावी आणि शिक्षण ही खरं तर दोन टोकं पण सर 2003-04 तब्बल  सतरा वर्षापूर्वी आधुनिक तंत्रज्ञानाचं कोणतंही साधन नसताना आपण क्लास अंतर्गत घेतलेले विविध मोफत स्पर्धा परीक्षा शिबीर असतील आपले ज्ञानदानाचे कार्य खरचं खूप मोठे आहे.नेहमीचं शिक्षणाविषयीची आपली तळमळत सर आज ही आम्ही जवळून पाहतो.कु. दिक्षा मोहन आगलावे ही तुमची विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागातून पहिली आलेली.   एक गुरु म्हणून नेहमीच आपण माझ्यासाठी आदर्श आहात.सर आजही शिक्षण  विचारांचा जागर करत आहात. 
                  गुरु पौर्णिमेनिमित्त एका शिष्यानं गुरू ज्ञानदाना विषयीची सुस्ती सुमने माझ्यासाठी अनेक पुरस्कारापेक्षाही खुप समाधानाची बाब होती. हॅलो हॅलो. ....महेश. 
ओके सर बाय मुंबईला आल्यावर नक्की या सर वाट पहातोय. ...
                  आज मला अभिमान वाटतोय मी शिक्षक आसल्याचा खरं तर  2003 -2019  तब्बल सतरा वर्षाचा शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम केल्याचं एक वेगळं समाधान मनाला आनंद देऊन जात.राज्यस्तरीय शिक्षण परीषदा असतील.विविध शैक्षणिक चर्चा सत्र असतील.   इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलेली प्रेरणादायी व्याख्याने किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांचे विशेष शिक्षण(Special Education ) असेल. अथवा नव्यानं येऊ घातलेल्या मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांचे( New Education policy)राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019.या जिल्ह्य़ास्तरीय चर्चासत्रासाठी झालेली निवड असेल. मनाला शैक्षणिक चळवळीतील पाईक असल्याची जाणीव करून देतात. 

मला अभिमान वाटतो मी शिक्षक असल्याचा कारण मी घङवतोय. ....देशाचे बलशाली सशक्त भावी आधारस्तंभ

      "विद्यार्थी हीच माझी धनदौलत "

                            विशाल चिपङे 
                        बावी आ. बार्शीवरून

शब्दप्रभु



    "न मागताही बघा 
आयुष्य मिळालं छानसं,
पेरीत गेलो शब्द 
अन् उगवली त्याला माणसं".

            आजवर ऐकलं होतं की, पदामुळे माणसं मोठी होतात. पण सर आपल्या व्यक्तीमत्वाकङं पाहिलं की वाटतं माणसामुळं पदही मोठी होतात. 
         साखर गोड आहे.म्हणून सांगण्याची गरज नसते. कारण साखर गोङचं असते. पण आपले आगळे -वेगळेपण जपणारी उंबराची फुलं दुर्मिळच.
             एक आदर्श शिक्षक, आदर्श पिता, आदर्श पती नव्हे नव्हे तर आदर्श व्यक्तिमत्वचं. .......  साधारणत: एक माणूस किती क्षेत्रात आपला वावर करू शकतो. याचं उत्तम उदाहरण ज्येष्ठ साहित्यिक ,कवीवर्य, लेखक, चित्रकार ,दिग्दर्शक ,अभिनेते व्याख्याते, निवेदक अष्टकलांची खाणं म्हणजे शब्द प्रभू "रामचंद्र  इकारे" सर .
        सरांचा आज वाढदिवस या शुभ क्षणी आपणास मनःपूर्वक शुभेच्छा...... राईबा'नु', रामबाण मनराई अनेक वात्रटिका काव्य, लेख. लोकसत्ता मधील "दुनियादारी" पासून ते लोकमत मधील "चला उठा झाडे लावायची वेळ झाली"
          पर्यंतचा शब्द संसार अगदी अलगत सरांनी पेलला आहे ."आनंदयात्री प्रतिष्ठान" पासून त "उमेद प्रतिष्ठान" पर्यंतचा त्यांचा मित्रपरिवार हीच खरी संपत्ती आयुष्याला शब्दरंगात रंगू पाहणाऱ्या गुरुवर्याना पुढील शब्दगंधासाठी खूप खूप शुभेच्छा....!

                विशाल चिपडे 
            जागर फाउंडेशन बावी
            बार्शी जिल्हा सोलापूर*

वनसंवर्धन


            वनांची लागवड, संवर्धन व सक्षमीकरण खरं तर ही काळाची गरज आहे. कारण अखंड मानव जातीला अन् सजीवांना लागणारा ऑक्सिजन प्राणवायू वृक्षांच्या माध्यमातून आपणास मिळत असतो. 

          एक मुल, एक झाड.  ही संकल्पना समाजात रुढ होणं काळाची गरज आहे. राज्य शासनाच्या वनमंत्रालय,मा. मंत्री महोद्यांच्या "33 कोटी वृक्षलागवड या संकल्पनेला या भारताचा जबाबदार नागरिक म्हणून आपण या कार्यात वृक्ष लागवड करुन सहभाग नोंदवणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

           चला तर मग आधुनिकीकरणाच्या नावाखाली होणारी आमाप वृक्षतोड थांबवुयात. अन् वन अधिनियम 1942 व सामाजिक वनीकरण 1972 या दोन्ही कायद्याच्या आमलबजावणीच्या दृष्टीने सजग राहुयात. ....

         एक मुल , एक झाड. 

 शासनाच्या वनीकरण मोहिमेस बळकटी देऊयात. वृक्षलागवड करुयात.

                          विशाल चिपङे 
                     बावी आ. बार्शीवरून

दर बुधवारी मोबाईल - बावीचा पुस्तक प्रेमी



समृध्द ग्रंथालय उभारणी मोहिम 2019.
--------------------------------------

" वाचनातुन -उद्योगाकङे 
        उद्योगातून -विकासाकङे 
             विकासातून - समृध्दीकङे "

 अगदीच कमी वयातच कापङ उद्योगात बार्शी शहरात कृष्णा रेडीमेडस् च्या माध्यमातून सतिश मधुकर आगलावे या युवकाने आपले उच्च शिक्षण घेत उद्योग क्षेत्रात गरुड भरारी घेतली आहे. कला-क्रिङा, सामाजिक,वैचारिक,व्यावसायिक क्षेत्रात आपल्या आगळ्यावेगळ्या कामाचा ठसा उमटवत त्यांनी आपली वाचन कला ही जोपासली आहे.
              त्यांच्या बद्दलची एक गोष्ट मी आपणास समोर मुखोदृत केली तर आपणास ही नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. आठवड्यातील दर बुधवारी त्यांचा भ्रमणध्वनी बंदच असतो.ते केवळ आणि केवळ वाचनास वेळ देतात. कारण पुस्तकाने मस्तक सुधारतं. सुधारलेलं मस्तक ना कुणाचं हस्तक होतं ना नतमस्तक होतं यावर त्यांच्या प्रचंड विश्वास आहे.विद्यार्थी दशेतच चांगल वाचल्यामुळेचं वयाच्या केवळ 19 वर्षीचं त्यांच्यातल्या उद्योजकांची त्यांना ओळख झाली. अन् ते कापङ उद्योगात स्वत: एक तप पुर्ण केले आहे.
                 शरीराला व्यायामाची गरज असते. तशी मनाला वाचनाची गरज असते. असे नेहमी सांगणारा "पुस्तकप्रेमी " मित्र. आज केवळ वाचनामुळे उद्योगातील विकासातून समृध्दीकङे यशस्वी वाटचाल करतो आहे. उद्याची सक्षम व यशस्वी तरुणाई उभारण्यासाठी समृध्द ग्रंथालय मोहिमेत पुस्तक दान करुन सिंहाचा वाटा नोंदवला आहे.

              -   विशाल चिपङे 
                 "समृद्ध ग्रंथालय उभारणी
                 मोहीम" बावी आ. बार्शी
                  सोलापूर

बार्शीचा प्रसाद

     
       " हिच आमुची प्रार्थना अन्
                  हेच आमुचे मागणे ,

                 " माणसानी माणसाशी
                    माणसासम वागणे."

                परमेश्वराला नैवेद्य म्हणून दाखवलेला पदार्थ
"  प्रसाद "  म्हणून पुढे येतो. अन् मन तृप्त करतो. बार्शी तालुक्यातील इर्लेवाङीच्या एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला प्रसाद मोहिते हा तरूण.घरची कमालीची गरीबी अन् सततची नापिकी अन् आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील हा घटक समाजातील दुःखाला कवेत घेण्याच धाङस करतोय.विचारांना व्यापकतेचं आभाळ लाभलयं. अर्धांगिणी अनुराधा साथ देतेय प्रसाद दादाच्या प्रघाङ समाज सेवेच्या झपाटलेपणाला.
                         एका मील कामगाराची मुलगी अनुताई भविष्याची नेटकी स्वप्नं रंगवायची सोङून वंचित घटकांच्या जीवनातील काळोखात प्रकाशाचे नवे अंकुर फुलवू पहातेय.केवळ विचारांच्या जोरावर .विचार हा माणसाचा सामर्थ्यशाली चिरंतन सांगाती असतो. हेच      खरं तर आज प्रसाद दादा अन् अनुताई मोहोळ तालुक्यातील मोरवंचीच्या माळावर " प्रार्थना बालग्राम " च्या माध्यमातून भिक्षेच्या झोळ्या घेऊन फिरणार्या अनेक लेकरांच्या हातात शिक्षणाच्या पाट्या देता आहेत. भिक्षेकरी , स्थलांतरीत भटके , निराधार ,पारधी, पाथरवट   यांच्या आयुष्याला आकार देण्याचं काम करत आहेत. हे समाज सेवेचे काम करताना अनेक अडचणी अनेक प्रश्न आ वासून पुढे उभारतात. पण प्रत्येक प्रश्नातून एक वेगळी दिशा अन् आशा निर्माण होते. अन् सुरू होतो प्रवास न थांबण्यासाठी दादा अन् ताईचा.
                           बालगुन्हेगारी, बालव्यसनाधिनता, भुकेल्या जीवाला अन्न, बेघर निराधार, यांना

          "मायेचा हात अन् हक्काचा घास "

प्रार्थना फाऊंडेशनच्या माध्यमातून दिला जातो आहे. स्त्री जन्माचे स्वागत करणारे अन् पोटचा गोळा देहदान करणारे आई- बाप. समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करत आहेत. भिक्षामुक्त अभियान असेल...!तरूणाईशी संवाद असेल....! अश्या ध्येयवेङ्या माणसांनी परमेश्वराकङे जगासाठी केलेली ही प्रार्थनाच आहे.ते जगासाठी प्रार्थना करतायेत. आपण त्यांच्यासाठी देवाकडे याचना करुयात.

                  विशाल चिपङे 
            जागर फाऊंडेशन बावी आ.
            बार्शीवरून

Tuesday, 14 April 2020

शाळा

                   
                      एक साथ नमस्ते. .... नमस्ते. बसा. ....
विचारा मुलांना काय विचारायचं ते शेख सर बोलले 100% वर्ग प्रगत आहे.बरं पहिलीचा वर्ग तरीपण सर्व नेटक्या गणवेशात निरागस बाळं. ... रंगीबेरंगी शॅक शेजारी पाणी बाॅटल शर्टच्या वरच्या खिशाला आईनं बांगडी पिनने अङकवलेला रुमाल एका शाळेवरून दुसर्‍या शाळा भेटी करत करत निगडी शाळेत पोहोचलेलो. .....दुपारची वेळ गाङीवरच्या प्रवासानं थकवा आलेला. पण गांगरलेल्या दु:खी शाळा हा प्रकारचं नको नकोसा वाटणार्‍या सहा वर्षाच्या आरमान ने मला तब्बल तीस वर्षे पाठीमागे नेलं. ...अन् त्याच्या तणावपूर्ण चेहर्‍यावरील हावभावात मी स्वतःला शोधू लागलो.
                 तलाठी कार्यालयाच्या कोपर्‍याला भला मोठा दगड होता.आता पण तो आजून आहे. माझ्या पाच वर्षांच्या बाल मनाला तो पर्वताऐवढा वाटायचा.त्याच्याकङं नजर टाकायला पण भिती वाटायची. पाटलांच्या वाङ्यासमोर आमचं घर होतं. वङील कपडे शिवायचे. ननवरे गुरूजी अन् लोखंडे गुरूजी नबीसायबाच्या दुकानाकडे रहायचे.त्यामुळे गुरुजी आमच्याच घरासमोरनं दररोज शाळेत जायचे. वङील आप्पांचा अन् त्यांचा नेहमी येता जाता नमस्कार चमत्कार असायचा. टेलर या वर्षी घाला पोराला शाळेत. .... गोवर्धन पाटलांचा रामा मी त्याला बापू म्हणायचो. आमची काळू बाळूची जोङ आसायची. आमच्या दोघांच्या घरात दहा फुटाचं अंतर आम्ही लंगोटी यार. ....वरणं कधी मनात आलं तर दिलीप काकाचा आपा अन् बाळू बापूचा आमोल कधी तरं पाटलांच्या रामाची तिनचाकी पायङेल मारायची पिवळ्या रंगाची सायकल व्हती. आम्ही मित्र ती खेळायचो. रामा नेहमीचं सायकलीवर बसायचा आम्ही मागून ढकलण्यातचं समाधान मानायचो. कारण सायकल त्याची आसल्यामुळं बसायला संधी नसायची. मी रामापेक्षा एक वर्षानं मोठा त्यामुळं त्याच्या अगोदर माझा उजवा हात लांबलेला ङोक्यावरून थेट  ङाव्या कानाला लागला अन् माझी रवानगी थेट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावी आ. पहिलीच्या वर्गात झाली . जेवायला झोपायला आम्ही दोघं एकत्रच आसल्यानं त्याला सोडून दिवसभर शाळेत मनचं लागायचं नाही.
                   निळ दिलेलं धोतर, ङोक्यावर चार बोट रुदं पांढरी गांधी टोपी, पायात नामू चाभाराकङून स्टीलचं रीबीट ठोकलेलं कातडी जोङं,काखत पानाची चंची, तोंडात पानाचा तोबरा,हातातल्या पानाची देट काढीत तीन गुंङ्याचा सदरा नीट करीत उजव्या हातातल्या उदबत्तीच्या काङीनं सारखं दातात अङकलेलं पानाचं कण अन् दातातल्या फटीत आत बाहेर आत बाहेर काङी अगदी सराईतपणे फिरवीत. मधीचं थ्बू. ....थ्बू. .....करीत दोन्ही व्हटातनं पानाचं कणं बाहेर काढायचं.शर्टाच्या काॅलरमध्ये नेहमी पांढर्‍या रंगाचा रुमाल असायचा.वर्गात कुणी खोङ्या केल्या की जवळं येऊन मान खाली घालून पाठीत जोरात बदका देणार अनं
               "भोसङीच्या"     
    म्हणून ङोळं मोठं करून बघणार त्याच्या त्या राकट चेहर्‍याकङं पाहिलं की भिती वाटायची. लोखंडे गुरूजी म्हणलं की मला यमचं वाटायचं.जबर मारायचं...... नाइलाजाने गुरूजीला काय तरी सांगुन रामभाऊ बी दोन तीन महिन्यांत पहिलीच्या वर्गात आला. ती यायच्या अगोदर मला शाळा म्हणजे जेलचं वाटायची. पाचला शाळा सुटली की मी सगळ्याच्या आधी ठिक्याची पिशवी पाठीवर टाकून घर गाढायचो.शाळा सुटली की स्वारी खुष असायची. शाळा सुटली पाटी फुटली. .....आय मला गजानं मारलं. ...त्याच्या काय बापाचं खालं. ....ही गाणं सगळी म्हणीत तलाठी कार्यालयापासून ते रामा आण्णाच्या वाङ्यापर्यत पळतचं सुटायचं. ...कारण पांङरंग नानाचा खंङ्या अन् चंदतात्याचा बाप्या कारण नसताना त्याच्या घरासमोरून जाताना आङवायची. ....अन् मारायची.काशीनाथ उंबरेच्या घरापासून ते भाना आण्णाच्या घरापर्यंत एक दिवसा आङ रोज कुणाची तरी भांडण आसायची कारण मेन एक मुतारी त्याला उपनद्या जोडल्या सारख्या वीस एक गटारी उङ्या मारत ढांगा टाकत घर गाठायचं.
                      रात्र झाली की बरं वाटायचं. पोटभर जेऊन निवांत झोपायचं पण सकाळी उजङलं म्हणलं की नको नको वाटणारी जेल शाळेचं वेध लागायचं. मग काय रोज आप्पांचा शाळेत जाणेसाठी मार. ...तर कधी गोळ्या खायला आठ आणेची पैशाची मागणी.असं करत करत आम्ही दोघेही शाळेत दररोज नचुकता चाललो. पण रोज शाळेत जाणेसाठी एक रुपया दररोज दोघं ही घेऊन यायचो. मलका तात्याच्या दुकानातून लेमन गोळ्या घेऊन तलाठी कार्यालयापासून शाळा गाठायची. शाळेच्या आवारात भली मोठी चिंच तिचे हिरवेगार कोवळे आकडे एकत्र करायचो. चिंचेची पाकळ्या आलेली फुलं, चिंचेचा कोवळा पाला एकत्र करून आम्ही तो शाळेच्या समोर एक चौकोनी कट्टा बांधलेला आजूनही तो साक्षीदार म्हणून उभा आहे. त्यावर एक गलीच्या आकाराचा खोलगट भाग आहे. त्यात आम्ही तो गोळ्या, चिंचेची फुलं, आकङं एकत्र दगङानं कुटायचो. अन् त्याकाळी
 " प्रिन्स गुटखा " पुङी प्रसिद्ध होती. तरुणांनी खाऊन टाकलेल्या पुङ्या गोळा करून आम्ही त्यात ते कुटलेलं सार भरायचं अन् ते खिशात ठेऊन ते दिवसभर पुरवून खायचं. आम्हा दोघांचा हा नित्यक्रम असायचा.
                आपण आभ्यास करावा. चांगले वाईट      एवढं समजण्याचं ते वयचं नव्हते.निरागस बालपण        पण मोठ्याचं अनुकरण करण्याचं ते वय असते. लोखंडे गुरुजी नंतर आम्हाला पहिलीला नवीन गुरूजी आले. मङके गुरूजी कडक शिस्तीते. ...... त्याचाही एकदा बेदम मार खाल्ला. अन् बघता बघता प्रथम सत्र परीक्षा आली. अन् इयत्ता पहिली वर्गातील पहिलीच परीक्षा मुळाक्षरांचा गंध नाही. आकलन करण्याची समजण्याची कुवतचं नाही. नेहमी या आरमान सारखं घाबरलेलाचं. बाहेरून कधी तरी शाळा तपासणीला केंद्रप्रमुख साहेब यायचे. तर नवीनचं अधिकारी नवीन शिक्षक, शाळा ते कङक शिस्तीचे वातावरण नको नको व्हायचे. मनात प्रचंड न्यूनगंड, भित्रेपणा आभ्यासातील तर काही समजण्याचा विषयच नाही. अन् प्रथम सत्रचा पेपर झाला त्यात भाषेमध्ये  जोड्या लावा प्रश्नात गाय अंडी देते. अन् कोंबडी दुध देते. अन् मी जोङी लावली होती असे लोखंडे गुरूजींनी आप्पांना वडीलांना भेटल्यावर सांगितले.शिक्षणाशी शाळेशी एकरुप होताना खुप खुप त्रास झाला. तिसरी इयत्ते पर्यंत काहीच येत नव्हते.
                    पण एक काळ जेल वाटणारी शाळा जगण्याचा अविभाज्य घटक बनली आहे. यमाप्रमाणे वाटणारे मारकुटे शिक्षक नसते. तर कदाचित व्यसनाधीनतेकङे वळण्याची वेळ आली असती. शाळा तपासणीला येणारे अधिकारी एक मोठं संकट वाटायचे. आज विशेषतज्ञ म्हणून प्रत्येक शाळेत जाऊन भित्रा 'ढ' विशाल शोधतो आहे.अन् त्याला गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासाठी झिजतो आहे.
     

                    विशाल चिपङे
              बावी आ. बार्शी सोलापूर

शिक्षक दिन - ५ सप्टेंबर



                 सरकारी गोङावणावर चार बाय चार ची पत्र्याची शाळेच्या नावाची पाटी  टांगलेली कङनी तुराट्याचा कुङ घेतलेला वाळूचं राबीट टाकलेलं अन् त्यावर बेंच मांडलेलं.रात्रीची आभ्यासिका पोळ्याला गाईच्या शिंगाला हेगुळं लावायला आणलेला चौकटी पत्र्याच्या डब्यात राकेल भरून चिरगुटाची केलेली वात अन् सायकलच्या टुबचा वाल लावून अभ्यासासाठी बनवलेली (चिमणी) दिवा डबा खालून दाबला की हवा त्या वातीच्या कङनं बाहेर यायची.अन् त्याचा भङका व्हायचा मी एक टक लावून चिमणीच्या वातीकङं पहात ङबा दाबायचा भङका करायचो. वीस पंचवीस मिनिटं हा माझा खेळ चालेला.
                    तुराट्याच्या कुङातनं हळुचं आपल्या कोण तरी बघतयं हे कळायच्या आतचं कानाखाली भाङकन् चिमणीचा भङका व्हावा. तसा जाळ झाला. अन् मी भानावर आलो. समोर कोणतरी अनोळखी व्यक्ती होती. पण तुम्ही कोण अन् का मारलत मला म्हणायची हिंम्मत झाली नाही. कदाचित त्यावेळी विद्यार्थ्यांना अती संरक्षण देणारा RTE Act आमलात आला नव्हता. म्हणून बरं नाहीतर आम्ही आज घङलो नसतो.
                     कुङाच्या मागच्या कट्ट्यावरून आवाज आला विशाल चिपङे इकडे ये. ........ मेलो. मेलो. ...आता काय खरं नाही. रात्रीच्या अंधारात चिमण्या घेऊन बसलेल्या पाग्याचा धन्या,सुर्या पांडुरंग नानाचा खंङ्या,पाटलांचा रामा, पमु तात्याचा बापू, तोला भाभीचा कैम्या,कळमवाङीच्या देशमुखाचा टप्प्या, जाधवाचा किरण्या,धन्या,विकास्या,लहु आगलाव्याचा राम्या,बाळू बापुचा आमल्या,फत्तरु भईचा फैज्या,परकास बापुचा सैज्या सगळ्यावर नजर फिरवली. ....
                      आता इसल्याचं काय खरं नाही. काही जण पुटपुटली. उबाळे सरनी बोलवलं होतं.कुंङलिक तुकाराम उबाळे सर म्हणजे इंग्रजीचं सर त्याकाळी सन 2001 -02 ला शरदचंद्रजी पवार महाविद्यालय बावी च्या शाळेतलं SP(Suprident of police) चं होतं. अभ्यास न करणाऱ्या अन् मस्तीखोर विद्यार्थींचं तपास अधिकारी अन् रिमांडर. सरच्या जवळ गेलो. पण दोन्ही गालावर हात ठेवून उभा होतो. कारण लाईट नसल्यानं सरचा चेहरा अन् हाताच्या हालचाली काही दिसत नव्हत्या. मगा मला सांगत व्हतातं तो हा विद्यार्थी का. ....होय हाच विशाल चिपङे. सिन्सियर स्टुडंट, हुशार ,अभ्यासू. .....उबाळे सर इतकी अवजड न पेलवणारी बिरुद वापरून माझी ओळख का करुन देतं असतील बरं. ....हा विचार मनात घोळत असतानाचं आतुन सर्व मुलांचा एका सुरात आवाज आला.
                     " हे प्रकाश मित्रा. .....मनशक्ती केंद्र लोणावळा टीमने दिलेली प्रार्थना दररोज न चुकता शाळेत म्हणून घेतली जायची.
ये जा प्रार्थना चालू झाली. म्हणतं उबाळे सरांनी मला वर्गात पाठवले. बाहेर नुकताच पावसाचा सङाका पडलेला होता. बारीक वार्‍याची झुळूक अंगाला झोंबत व्हंती.पण सरांनी माझी एका अनोळखी सरांना करुन दिलेली ओळख मनात एक स्फुलिंग पेटवणारी ठरली. खरचं आपण हुशार आहोत. असं वाटायला लागलं. हळुहळु अभ्यासाला सुरुवात केली. नुकताच जिल्हा परिषद शाळेतून हायस्कूलला आलेलो. नीटनेटकेपणा, टापटीप,वक्तशीरपणा या गोष्टी आपोआप भिनत गेल्या.
               असं म्हणतात की, "शिक्षकाच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव विद्यार्थीवर पडतो. "हे विधान शंभर टक्के खरं आहे. मंदाक्रांता, शार्दुलविक्रिङीतच्या माध्यमातून अनोळखी सर सुनील नानासाहेब गुंड सर कधी आपलेसे झाले समजलचं नाही. "सुंदर अक्षर हाच खरा दागिना". हे नकळत कधी मनावर कोरलं समजलचं नाही .बघता सरांनी दिलेल्या प्रेरणेतून मी इयत्ता आठवी, नववी, दहावी तीन वर्षे मराठी शुध्दलेखन आख्खा वर्गाचे मी तपासत असे. ए.के. गिरी, होरे सर, बरबङे सर, बंडू वाणी सर अनेक गुरूवर्यानी संस्कारांची व ज्ञानदानाची एक एक वीट बहाल केली. त्यावरचं उभारलयं हे सर्जनशीलतेचं आदर्श ज्ञानमंदीर.
                 दररोज एक पान शुध्दलेखन ही उबाळे सर व गुंड सरांची रोजनिशी जीवनाला आकार देऊन गेली. दहावी बोर्ड सर्जापुर केंद्र मराठी विषयाला शंभरपैकी चक्क 89 गुण मिळवून मी 71. 33% नी उत्तीर्ण झालो.झालो.पुढे रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे 2003 -04 ला बारावीत आर्ट शाखेत इंग्रजी विषयात शंभर पैकी 86 गुण मिळवले. अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यावेळी प्रा. पाटील सरांनी विज्ञान शाखेतील चार ही तुकड्यात माझा पेपर नेऊन दाखवला. ....खेङ्यातला पोरगा अन् इंग्रजीत 86 गुण.
            प्रार्थनेवेळी  संपूर्ण विद्यालय माझ्यामागे प्रतिज्ञा म्हणत असे. खो -खो क्रिङा प्रकारात नॅशनलला पुणे येथे उपविजेतेपद पटकावले होते. खो-खो त (Ring master).अनेक शालेय व तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा असतील. "यमराज संपावर जातात". या एकांकिकेमधील ब्रम्हदेवाची केलेली भुमिका असेल. किंवा इयत्ता सातवीमध्ये पायथागोरसने दिलेली साथ असेल (इयत्ता सातवीत प्रथम सत्रात गणित विषयात नापास झालेलो. फक्त पाच गुणांचा पायथागोरसचा प्रमेय बरोबर आलेला.) हे सर्व यशापयश पचवण्याची राखेतून पुन्हा उठून यल्गार करण्याची ताकद मिळाली. जीवनात आदर्श विद्यार्थी बनविण्यासाठी मला ज्या गुरूवर्यानी मार्गदर्शन केले. त्या माझ्या दीपस्तंभ,प्रेरणास्तंभांना ही शब्द सुमने आजच्या "शिक्षकदिनी" विनम्रपणे चरणस्पर्शीत करतो.  आज मला अभिमान वाटतो.मी "शिक्षक" आहे. असल्याचा........

आजच्या या शिक्षकदिनी मी प्रतिज्ञा करतो की, सक्षम राष्ट्राची उत्पादनक्षम पिढी घडवण्यास मी जन्मभर कटिबद्ध असेल. निर्माण करीन एक सुंदर राष्ट्र स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातलं....! अब्दुल कलामांच्या जाणिवेतलं. .....!!

                    लेखन अट्टाहास
                   विशाल# शिक्षकदिन - 5 सप्टेंबर

                 सरकारी गोङावणावर चार बाय चार ची पत्र्याची शाळेच्या नावाची पाटी  टांगलेली कङनी तुराट्याचा कुङ घेतलेला वाळूचं राबीट टाकलेलं अन् त्यावर बेंच मांडलेलं.रात्रीची आभ्यासिका पोळ्याला गाईच्या शिंगाला हेगुळं लावायला आणलेला चौकटी पत्र्याच्या डब्यात राकेल भरून चिरगुटाची केलेली वात अन् सायकलच्या टुबचा वाल लावून अभ्यासासाठी बनवलेली (चिमणी) दिवा डबा खालून दाबला की हवा त्या वातीच्या कङनं बाहेर यायची.अन् त्याचा भङका व्हायचा मी एक टक लावून चिमणीच्या वातीकङं पहात ङबा दाबायचा भङका करायचो. वीस पंचवीस मिनिटं हा माझा खेळ चालेला.
                    तुराट्याच्या कुङातनं हळुचं आपल्या कोण तरी बघतयं हे कळायच्या आतचं कानाखाली भाङकन् चिमणीचा भङका व्हावा. तसा जाळ झाला. अन् मी भानावर आलो. समोर कोणतरी अनोळखी व्यक्ती होती. पण तुम्ही कोण अन् का मारलत मला म्हणायची हिंम्मत झाली नाही. कदाचित त्यावेळी विद्यार्थ्यांना अती संरक्षण देणारा RTE Act आमलात आला नव्हता. म्हणून बरं नाहीतर आम्ही आज घङलो नसतो.
                     कुङाच्या मागच्या कट्ट्यावरून आवाज आला विशाल चिपङे इकडे ये. ........ मेलो. मेलो. ...आता काय खरं नाही. रात्रीच्या अंधारात चिमण्या घेऊन बसलेल्या पाग्याचा धन्या,सुर्या पांडुरंग नानाचा खंङ्या,पाटलांचा रामा, पमु तात्याचा बापू, तोला भाभीचा कैम्या,कळमवाङीच्या देशमुखाचा टप्प्या, जाधवाचा किरण्या,धन्या,विकास्या,लहु आगलाव्याचा राम्या,बाळू बापुचा आमल्या,फत्तरु भईचा फैज्या,परकास बापुचा सैज्या सगळ्यावर नजर फिरवली. ....
                      आता इसल्याचं काय खरं नाही. काही जण पुटपुटली. उबाळे सरनी बोलवलं होतं.कुंङलिक तुकाराम उबाळे सर म्हणजे इंग्रजीचं सर त्याकाळी सन 2001 -02 ला शरदचंद्रजी पवार महाविद्यालय बावी च्या शाळेतलं SP(Suprident of police) चं होतं. अभ्यास न करणाऱ्या अन् मस्तीखोर विद्यार्थींचं तपास अधिकारी अन् रिमांडर. सरच्या जवळ गेलो. पण दोन्ही गालावर हात ठेवून उभा होतो. कारण लाईट नसल्यानं सरचा चेहरा अन् हाताच्या हालचाली काही दिसत नव्हत्या. मगा मला सांगत व्हतातं तो हा विद्यार्थी का. ....होय हाच विशाल चिपङे. सिन्सियर स्टुडंट, हुशार ,अभ्यासू. .....उबाळे सर इतकी अवजड न पेलवणारी बिरुद वापरून माझी ओळख का करुन देतं असतील बरं. ....हा विचार मनात घोळत असतानाचं आतुन सर्व मुलांचा एका सुरात आवाज आला.
                     " हे प्रकाश मित्रा. .....मनशक्ती केंद्र लोणावळा टीमने दिलेली प्रार्थना दररोज न चुकता शाळेत म्हणून घेतली जायची.
ये जा प्रार्थना चालू झाली. म्हणतं उबाळे सरांनी मला वर्गात पाठवले. बाहेर नुकताच पावसाचा सङाका पडलेला होता. बारीक वार्‍याची झुळूक अंगाला झोंबत व्हंती.पण सरांनी माझी एका अनोळखी सरांना करुन दिलेली ओळख मनात एक स्फुलिंग पेटवणारी ठरली. खरचं आपण हुशार आहोत. असं वाटायला लागलं. हळुहळु अभ्यासाला सुरुवात केली. नुकताच जिल्हा परिषद शाळेतून हायस्कूलला आलेलो. नीटनेटकेपणा, टापटीप,वक्तशीरपणा या गोष्टी आपोआप भिनत गेल्या.
               असं म्हणतात की, "शिक्षकाच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव विद्यार्थीवर पडतो. "हे विधान शंभर टक्के खरं आहे. मंदाक्रांता, शार्दुलविक्रिङीतच्या माध्यमातून अनोळखी सर सुनील नानासाहेब गुंड सर कधी आपलेसे झाले समजलचं नाही. "सुंदर अक्षर हाच खरा दागिना". हे नकळत कधी मनावर कोरलं समजलचं नाही .बघता सरांनी दिलेल्या प्रेरणेतून मी इयत्ता आठवी, नववी, दहावी तीन वर्षे मराठी शुध्दलेखन आख्खा वर्गाचे मी तपासत असे. ए.के. गिरी, होरे सर, बरबङे सर, बंडू वाणी सर अनेक गुरूवर्यानी संस्कारांची व ज्ञानदानाची एक एक वीट बहाल केली. त्यावरचं उभारलयं हे सर्जनशीलतेचं आदर्श ज्ञानमंदीर.
                 दररोज एक पान शुध्दलेखन ही उबाळे सर व गुंड सरांची रोजनिशी जीवनाला आकार देऊन गेली. दहावी बोर्ड सर्जापुर केंद्र मराठी विषयाला शंभरपैकी चक्क 89 गुण मिळवून मी 71. 33% नी उत्तीर्ण झालो.झालो.पुढे रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे 2003 -04 ला बारावीत आर्ट शाखेत इंग्रजी विषयात शंभर पैकी 86 गुण मिळवले. अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यावेळी प्रा. पाटील सरांनी विज्ञान शाखेतील चार ही तुकड्यात माझा पेपर नेऊन दाखवला. ....खेङ्यातला पोरगा अन् इंग्रजीत 86 गुण.
            प्रार्थनेवेळी  संपूर्ण विद्यालय माझ्यामागे प्रतिज्ञा म्हणत असे. खो -खो क्रिङा प्रकारात नॅशनलला पुणे येथे उपविजेतेपद पटकावले होते. खो-खो त (Ring master).अनेक शालेय व तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा असतील. "यमराज संपावर जातात". या एकांकिकेमधील ब्रम्हदेवाची केलेली भुमिका असेल. किंवा इयत्ता सातवीमध्ये पायथागोरसने दिलेली साथ असेल (इयत्ता सातवीत प्रथम सत्रात गणित विषयात नापास झालेलो. फक्त पाच गुणांचा पायथागोरसचा प्रमेय बरोबर आलेला.) हे सर्व यशापयश पचवण्याची राखेतून पुन्हा उठून यल्गार करण्याची ताकद मिळाली. जीवनात आदर्श विद्यार्थी बनविण्यासाठी मला ज्या गुरूवर्यानी मार्गदर्शन केले. त्या माझ्या दीपस्तंभ,प्रेरणास्तंभांना ही शब्द सुमने आजच्या "शिक्षकदिनी" विनम्रपणे चरणस्पर्शीत करतो.  आज मला अभिमान वाटतो.मी "शिक्षक" आहे. असल्याचा........

आजच्या या शिक्षकदिनी मी प्रतिज्ञा करतो की, सक्षम राष्ट्राची उत्पादनक्षम पिढी घडवण्यास मी जन्मभर कटिबद्ध असेल. निर्माण करीन एक सुंदर राष्ट्र स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातलं....! अब्दुल कलामांच्या जाणिवेतलं. .....!!

                         लेखन अट्टाहास 
                       विशाल चिपङे,बार्शी 

शिणलेली बार्शी



                  बाबा आज बार्शी बंद आहे काय? नाही बाळ बार्शी थकलीयं. थकलीयं म्हणजे काय ?बाळा ती दमलीयं.सात वाजले दिवस उजाडला. तरी देखील चिटपाखरू ही रस्त्यावर दिसत नव्हते. मुलाच्या प्रश्नांना उत्तर देत देत भगवंत मंदिराचा कळस दिसला.गाभार्यात जाऊन चरणस्पर्श केला.अन् दोन मिनिटे मंदिरातच विसावलो.या चिमुकल्याच्या प्रश्नांनी लेखणी उचलवण्यास भाग पाडले.

            विधानसभा सार्वत्रिक मतदान 2019 ची रणधुमाळी काल राज्यभर पार पङली. अनेक मतदारसंघात आपआपल्या नेत्याच्या विजयाची खात्री बाळगून गेल्या सहा महिन्यांपासून प्रत्येक कार्यकर्ता नेटाने व जोमाने काम करत होता. या वैचारिक लढाईची खलबत गावगाङ्यात वस्त्या वस्त्यावर व गावच्या पारावर  रात्ररात्र रंगायची. ...कोण ? पक्षासाठी तर कोण नेत्यासाठी जीवाचं रान करून विजयाची खात्री देत होते.
                  काही कार्यकर्त्यांच्या निर्णयामुळे तालुक्याची राजकीय समीकरणे बदलली. तर काहीनी जुन्याच नेत्यांची पाठराखण केली. एकंदरीतच आपल्या नेत्यावरील प्रेमापोटी काहीनी आपल्या आप्तेष्टांच्या कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शवली. तर काहींनी प्रचार दौरे बेभान होऊन भाषणे ठोकली.विविध प्रकारची चिन्ह, विविध रंग अन् तालुक्याच्या विकासाची भविष्यकालीन धोरणावली समोर ठेवली. विविध निवेदन,चित्रफिती अन् स्टीकर. ....वातावरणात रंग भरला होता. प्रत्येक कार्यकर्ता दंग झाला होता.
                    जीवाचं रान करून नेत्याच्या विजयासाठी झटत होता. काहीनी देवाला नवस केले. तर काहीनी दंङवट घातले.

        केवळ अन् केवळ. ......आपल्या " नेत्यासाठीचं"

लोकशाहीच्या या राष्ट्रीय सणात प्रत्येकजण सामील झाला होता. दहा दहा वर्ष आजारानं जखङलेला अंथरुणावर असलेला मतदार राजा दोन काखात हात घालून मतदान बुथवर पोहचवला होता.- कार्यकर्त्यांनी
    मोटर सायकल वरून तर कोण बैलगाडीतून प्रत्येकजण ही लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या मताचं  _"दान" करण्यासाठी उपस्थित होता.अन् कार्यकर्ता मात्र शिणला होता. भागला दमला होता.आता प्रतिक्षा भगवंताच्या कौलाची.....!

                        विशाल चिपङे 
                   बावी आ. बार्शी वरून

शिक्षणाचा सुर्य


                     होय....दोघंही.काय म्हणतोस दोघंही ; व्हयं व्हयं. आरं पण असल्या माळावरं का? अन् कशापाई? आक्काचे प्रत्येक प्रश्न मला गतिरोधक सारखे गाडीची गती कमी करण्यासारखे भासत व्हते. पण माझ्या मनगटातील नेट अन् मेंदूतील बुध्दीचा वापर करून मी रस्त्यावरचा प्रत्येक खङ्ङा चुकवीत मी गाडीची गती वाढवायचो.तिच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मी महेश दादा व विनया माईच्या बाजूनी देत होतो. कोरफळ्याच्या जवळचा चढं गाडीनं चढलो.तसं गाडीच्या हेडलाईटच्या उजेङामुळं बारीक मोठी चिलटं,किङं सरळ ङोळ्यात तोंडावर येऊन आदळायची.
                         रात्रीचे रातकिङे अन् अंगाला झोंबणारा गार वारा गाडीचा वेग कमी करायला वातावरण अनुकूल होतं.डांबरीवरचा प्रत्येक खङ्ङा वेळेची जाणीव करून देत होता. लांबवर वाङ्यावस्त्याची चाहूल लागायची. तर मध्येच कुत्री भोकल्याचा आवाज यायचा. गर्द काळाकुट्ट अंधार अन् रात्रीची भयाण शांतता खायला उठली होती. पण दादा व माईच्या या महान सामाजिक व शैक्षणिक कार्याच्या इत्थंभूत माहितीपटाने आक्का देखील तेवढीचं आवाक व अश्चर्यचकित झाली होती.
                            एक विचार कधी संकल्प बनून जातो.नव्हे नव्हे तर तो जीवनच बनतो .स्वतःच्या सुखाचा काय विचार केला असेल या दांम्पत्यांनी त्यांना मुलं बाळ किती? त्यांनी शासनाची नोकरी सोडून हे वृत्त पत्करलयं काय? एक नी अनेक प्रश्नांना मी उत्तर देऊन रीतं केलं. शिक्षणाचा स्वतःच्या जीवनाला लवलेश ही नसणार्‍या आक्का( आई )ने माझ्या मनावर केलेल्या संस्कार व संस्कृतीचा पगडा कायमचा ती कोरण्यात यशस्वी झाली होती. हे मला त्यावेळी उमगलं.कारण तिचा दादा व माईच्या " स्नेहग्राम " विषयी येणारा प्रत्येक प्रश्न खुप काही सांगत होता.
                             प्रश्नोत्तराच्या या प्रवासात आम्ही स्नेहग्राम च्या अगदी जवळ येऊन पोहोचलो.रात्रीचे दहा वाजले होते.अंधाऱ्या रात्रीत अनेक वंचित, दुर्बल घटकांच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दुर करणारा " शिक्षणाचा सुर्य " अहोरात्र घेऊन महान कार्य करणाऱ्या वंदनीय आदरणीय दादा व माईचं
                                                  " आनंदवन "
                               
              सुर्यासारखं भासत होतं.आक्काचं स्नेहग्रामला भेट देण्यासाठीचा संकल्प उरात पक्का करून आम्ही पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झालो.

                     विशाल चिपङे 
                  बावी आ. बार्शीवरून

बावीच्या सुनबाई महाराष्ट्राच्या वन विभागात दाखल - अस्मिता विशाल चिपडे



      " रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर,
 ङोळ्यात जरी गेली धुळ थांबण्यास उसंत नाही
"येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालते आहे.
अडथळ्यांना भिऊन अङखळणे पावलांना पसंत नाही."

               ही संघर्ष गाथा आहे. एका पराक्रमी, जिद्दी वाघीणीची......   उस्मानाबादच्या       अनुसया गोवर्धन गुळमिरे.
वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी वडीलांचे निधन झाले.भाऊ, आई आणि स्वत: नेटका परिवार. उत्पन्नाचं कुठलं साधन नाही.अश्यातचं विशाल चिपङे या बार्शीतील तरुणाशी त्या विवाहबद्ध झाल्या.
परिस्थितीशी कङवी झुंज देत संर्घष करुन विजयाचं निशाणं फङकवण्याचा वारसा पुढे त्यांच्या पतीकङून त्यांना मिळाला.

         "मनस्थितीचं माणसाला घडवते.परस्थिती नव्हे."

         बार्शी तालुक्यातील बावी आ.या ग्रामीण भागातील गावात साक्षरतेचं प्रमाण अवघं 39.62% म्हणजे शिक्षण आणि बावी दोन टोकं. तशी गावात मंदिरांची संख्या कमी नाही. पण चालते बोलते देव घडवणारी मंदिर(शाळा)ची मात्र दुर्दैवाने दुरावस्था आहे. ग्रामीण भागात स्त्री ला "चुल आणि मुल"  गावच्या वेशीतुन जाताना ङोक्यावर पदर यातचं जीवनाची धन्यता मानणारी ग्रामीण व्यवस्था.ती च्या मताचा विचारांचा सन्मान करणार आहे का? दबलेल्या आवाजात मिळालेल आयुष्य काटाव बस्स एवढचं. ती च्या ही स्वतंत्र विचार भावभावना व अस्तित्वाचा सन्मान करणारी समाज व्यवस्था उदयास येईल काय? खरं तर ही आमची भारतीय संस्कृती अमूल्य देणगीच आहे. पण नको त्या अवास्तव रुढी परंपरा या संकल्पनांना आम्ही पिढ्यानपिढ्या चिकटून बसलो आहोत.स्त्री च्या भावभावना अन् विचारांना "ती" च्या आस्तित्वाला आदर सन्मान आजवर मिळाला आहे काय? नव्हे नव्हे तर समाजाने ही दिला आहे काय? हा ही प्रश्न तेवढाच महत्वपूर्ण आहे.
आज बदल,नावीन्य सर्वांनाच हवयं. पण मग परिवर्तनाचं काय?
हे परिवर्तन घडवण्याची ताकद फक्त आणि फक्त शिक्षणात आहे हे "ती" ने ओळखले होते.राज्यशास्त्र या विषयात बारावीला 98 गुण मिळवून  महाराष्ट्र राज्यात प्रथम आलेल्या अस्मिता विशाल चिपङे यांनी 86.00 % गुणांनी बारावी व 84. 66% गुणांनी ङी.एङ् ची पदवी संपादन करून त्यांनी शिक्षक या पदावर कामास सुरुवात केली.व निर्मीती बहुउद्देशीय शिक्षण संस्था  स्थापन करून त्या संस्थापिका संचालक बनल्या.स्पर्धाविश्व शैक्षणिक संकुल बार्शीच्या प्राचार्य म्हणून ही त्यांनी काम पाहिले.
         पतीच्या शिक्षकी पेशाचा वारसा चालवत त्यांनी लेखन,वाचनाचा व्यासंग जोपासत त्यांनी मा.रमेश घोलप(भा. प्र.से.) साहेबांच्या     " इथे थांबणे नाही " या आत्मचरित्राला प्रेरणापीठ मानत त्यांनी सन 2016 पासुन स्पर्धा परीक्षा आभ्यासास सुरुवात केली.एक वर्ष पुणे व दोन वर्ष बार्शीत त्यांनी आभ्यास केला.पती व घरातील सदस्य नातेवाईक यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पुर्ण करत त्या स्पर्धा परीक्षा,आभ्यास व संसाराशी जिद्दीने दोन हात करत होत्या.जीवघेणी वाढती स्पर्धा,समाज,मुल बाळं, संसार नातेवाईक यांच्या वाढत्या आपेक्षा राज्य विक्रीकर निरीक्षक या परीक्षेतील अपयशाने त्या पुरत्या खचल्या होत्या.अश्यातच  जीवघेणी वैद्यकीय समस्येला सामोरे जाऊन रङायचं नाही आता लढायचं हा विचार त्यांनी सार्थ ठरवला."पोलीस उपनिरीक्षक" बनू पाहणाऱ्या अस्मिता चिपङे यांना अनेक वर्ग 2 व वर्ग 3 च्या पदांनी हुलकावणी दिली आहे.पण आज "ती "महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात वनरक्षक पदावर कार्यरत आहे."ती" च्या आस्मंत भरारी घेण्याच्या पहिल्या पावलात यशामध्ये सासुबाई श्रीमती छाया तात्या चिपङे यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्या सांगतात.आज ग्रामीण भागात शिक्षणापासून दूर चाललेल्या मुलींसाठी " बेटी पढाव, बेटी बचाव" ची मोहीम हाती घेऊन निर्मीती बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर  काम करण्याचा मनोदय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींसाठी मोफत अभ्यासिका केंद्र लवकरच  उभारणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य करण्याविषयीचा आजेंङा कायम ठेवल्यास यशाला पर्यायच नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.शिक्षणच परिवर्तनाचा केंद्रबिंदू मानून समाजोपयोगी शिक्षण घेणेविषयीचा मनोदय  त्यांनी व्यक्त केला.

                         विशाल चिपङे 
                         बावी आ. बार्शीवरून

बस स्टॅण्डवरील एक रात्र



           दिवाळी संपून गावाकडं तर कुणी पाहुण्याकङं रंगीबेरंगी कपडे घालून प्रत्येकजण स्टॅण्डमधी आलेल्या लालपरीची एस्ट्याचे बोर्ड न्याळतं होता. नेहमीप्रमाणे बाईसाहेब राजकुमाराला घेऊन सिमीटच्या बाकड्यावर ऐटीत रिलुन बसलेल्या तर ही प्रत्येक गाडीचा बोर्ड बघून हेलपाट्यानं बेजार झालेलं.मदीच एकादी
" शिवशाही " तर कधी " भेटी लागे जीवा " असं लिहिलेली एस्टी यायची.
                      बारकी लेकरं थंडीन गारटलेली तर काही आईच्या पदरात दङलेली होती. स्टॅण्डमधी असलेल्या झाडाची पान बी आता हालत नव्हती.
परिवहन महामंडळाचे फलक रात्रीच्या लाईटीत ठळकच दिसत व्हतं. दवाखान्याचं,सोनं चांदीच्या दुकानाचं जाहिरातीचं मोठ बार्ङ मला बगा मला बगा करीत व्हतं.
                       टिंग ट्यांग कृपया लक्ष्य द्या. गाडी नंबर दोन शुन्य सात तीन अमरावती कोल्हापूर ही गाडी फलाट नंबर चारवर लावणेत आली आहे. असं सांगणारी बाई बी आता झोपली होती. कशी निरव शांतता पसरली होती.फक्त शिवशाही गाङीवर काढलेले घोङेच तेवढे पळताना दिसत होते. दिवसभर सरकारी हापीसात काम करणारे पांढर्‍या काॅलरचे सरकारी बाबू मोबाईल चापचण्यात दंग होते. बसण्याची जागा येथे झोपू नये. असं लिहिलेलं बाकड्यावरचं माणसं आडवी झाली होती. प्रवासात ताटून गेलेली म्हातारी कोतारी माणसं कुणी बाकड्याखाली तर कुणी मध्येच वावरात पसरल्यावणी आडवी तिङवी पङली होती.
                      चौकशी काऊंटर केबीनमध्ये बसलेले लाॅगशीट भरणारे झोपीच्या तंद्रीत कागदावर आकलेल्या घरात एक आकडा खाली तर एक वरी खाङाखुङं करत दुरुस्ती चालू होती. मधीच एकादया प्रवाश्यांनं गाडीची चौकशी केली तर म्होगमं ठरलेलं उत्तर देयचे हाय आरदा तासानं. ....आजून आली नाही गाङी इलं.रात्री दीड वाजलेल्या काहीजण भिंतीवर लावलेलं वेळापत्रक बघत व्हते .व्हा व्हा करून काहीजण जांबळ्या द्यायचे.तर काही हाता पायाला तराटं दिऊन आळस झटकायचे.दिवसभर ठिक्याच्या झोळ्यात गोळा केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या उश्याला घेतल्याने कङाकङा वाजल्या की रात्रीची शांतता भंग व्हायची.
                       ठिकी, बोचकी, गटूङी बॅगा,शबनम नाना तर्हच्या पिशव्या कुणी अंगाभोवती कांबळा गुंडाळून एकटक नदर लावलेली. दोन चार टुकार तरणी पोरं मात्र पोलीस गाडीचा राऊंड गेला की पुन्हा बाकड्या समोरच्या ऐगलवर बसायची.
                        काही जणांनी चपला उशाला घेतलेल्या तर काहीनी बॅगाच्याच उश्या केलेल्या. कोण धोतरे तर कोण पटके, इरकल,छापील नाना तर्हची कापड घातलेली माणसं. तर नवी लगीन झालेली आपल्या प्रेमाचं सामाजिक प्रदर्शन करणारी जोडपी गळ्यात गळं घालून पेंगत व्हतं तर काहीनी मुंडकी गुडघ्यात घालून बॅगा पायाखाली घेतलेल्या घड्याळाचा काटा मात्र थांबायचं नावाचं घेत नव्हता. तर मदीच एकादा ङ्रायव्हर कंडक्टर आंघोळ करुन आलेला दिसायचा. साळतं जाणारी तरणी पोरं भिताङावरचे बंद पडलेल्या लाईटच्या स्विचला मोबाईलचा ङबा चार्जीग करायला धडपड होती.ती सोडली तर सगळं एस्टी स्टॅण्ड निद्रिस्त झालेलं कागदावर काढलेल्या चित्रावणी दिसायचं.
                           भारत सरकारची जुनी पत्रपेटी मात्र आयुष्याची घरघर लागल्यागत भिंतीवरून सगळं स्टॅण्ड न्याळत होती. कर्रकर्र असा गाङीच्या ब्रेकचा आवाज आला की माणसं खडबडून जागी व्हायची.गारटा लागूनी म्हणून काहीनी रुमालान तर काहीनी टावेलानं तोंड बांधलेली. मधीच बङ्या बापाच्या औलादी स्काॅङा, स्काॅरपीओ गाङी घेऊन कुणाला तर न्यायला सोङायला यायचे. रस्त्यावरच्या मोकाट कुत्र्यांनी बी स्टॅण्ड मधल्या बाकड्याखाली तर काही माणसाच्या कङनी ऊब घेत व्हती. पावसाने तर हद्दचं सोडली व्हती. सारखी चिरचीर चालू व्हती.पहाटचा गारवा सुटला होता. काहीकाहीजण पेपरवाल्याच्या आरोळ्या "ऐ पुण्यनगरी....ऐ पुण्यनगरी आवाजाने झोपल्या जाग्यावरचं पाय खोडून जागे व्हायलेले होते. तर काहीनी स्टॅण्ड बाहेर रहेना भाभीनी मांडलेल्या काळ्या कोळशाची मिसरी दातावर फिरवून खळाखळा चुळ भरून चहानं जीभ पोळवली.पुणे मुंबई वरून आलेल्या लक्झरी बसमधून पारुश्या माणसाचं लोंढच्या लोंढ बाहेर पडू लागलं.प्रवास व नोकरीच्या निमित्ताने अश्या अनेक रात्री स्टॅण्डवर जागून काढल्या आहेत.

             विशाल चिपङे 
             बावी आ.बार्शीवरून