होय....दोघंही.काय म्हणतोस दोघंही ; व्हयं व्हयं. आरं पण असल्या माळावरं का? अन् कशापाई? आक्काचे प्रत्येक प्रश्न मला गतिरोधक सारखे गाडीची गती कमी करण्यासारखे भासत व्हते. पण माझ्या मनगटातील नेट अन् मेंदूतील बुध्दीचा वापर करून मी रस्त्यावरचा प्रत्येक खङ्ङा चुकवीत मी गाडीची गती वाढवायचो.तिच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मी महेश दादा व विनया माईच्या बाजूनी देत होतो. कोरफळ्याच्या जवळचा चढं गाडीनं चढलो.तसं गाडीच्या हेडलाईटच्या उजेङामुळं बारीक मोठी चिलटं,किङं सरळ ङोळ्यात तोंडावर येऊन आदळायची.
रात्रीचे रातकिङे अन् अंगाला झोंबणारा गार वारा गाडीचा वेग कमी करायला वातावरण अनुकूल होतं.डांबरीवरचा प्रत्येक खङ्ङा वेळेची जाणीव करून देत होता. लांबवर वाङ्यावस्त्याची चाहूल लागायची. तर मध्येच कुत्री भोकल्याचा आवाज यायचा. गर्द काळाकुट्ट अंधार अन् रात्रीची भयाण शांतता खायला उठली होती. पण दादा व माईच्या या महान सामाजिक व शैक्षणिक कार्याच्या इत्थंभूत माहितीपटाने आक्का देखील तेवढीचं आवाक व अश्चर्यचकित झाली होती.
एक विचार कधी संकल्प बनून जातो.नव्हे नव्हे तर तो जीवनच बनतो .स्वतःच्या सुखाचा काय विचार केला असेल या दांम्पत्यांनी त्यांना मुलं बाळ किती? त्यांनी शासनाची नोकरी सोडून हे वृत्त पत्करलयं काय? एक नी अनेक प्रश्नांना मी उत्तर देऊन रीतं केलं. शिक्षणाचा स्वतःच्या जीवनाला लवलेश ही नसणार्या आक्का( आई )ने माझ्या मनावर केलेल्या संस्कार व संस्कृतीचा पगडा कायमचा ती कोरण्यात यशस्वी झाली होती. हे मला त्यावेळी उमगलं.कारण तिचा दादा व माईच्या " स्नेहग्राम " विषयी येणारा प्रत्येक प्रश्न खुप काही सांगत होता.
प्रश्नोत्तराच्या या प्रवासात आम्ही स्नेहग्राम च्या अगदी जवळ येऊन पोहोचलो.रात्रीचे दहा वाजले होते.अंधाऱ्या रात्रीत अनेक वंचित, दुर्बल घटकांच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दुर करणारा " शिक्षणाचा सुर्य " अहोरात्र घेऊन महान कार्य करणाऱ्या वंदनीय आदरणीय दादा व माईचं
" आनंदवन "
सुर्यासारखं भासत होतं.आक्काचं स्नेहग्रामला भेट देण्यासाठीचा संकल्प उरात पक्का करून आम्ही पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झालो.
विशाल चिपङे
बावी आ. बार्शीवरून
No comments:
Post a Comment