" रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर,
ङोळ्यात जरी गेली धुळ थांबण्यास उसंत नाही
"येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालते आहे.
अडथळ्यांना भिऊन अङखळणे पावलांना पसंत नाही."
ही संघर्ष गाथा आहे. एका पराक्रमी, जिद्दी वाघीणीची...... उस्मानाबादच्या अनुसया गोवर्धन गुळमिरे.
वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी वडीलांचे निधन झाले.भाऊ, आई आणि स्वत: नेटका परिवार. उत्पन्नाचं कुठलं साधन नाही.अश्यातचं विशाल चिपङे या बार्शीतील तरुणाशी त्या विवाहबद्ध झाल्या.
परिस्थितीशी कङवी झुंज देत संर्घष करुन विजयाचं निशाणं फङकवण्याचा वारसा पुढे त्यांच्या पतीकङून त्यांना मिळाला.
"मनस्थितीचं माणसाला घडवते.परस्थिती नव्हे."
बार्शी तालुक्यातील बावी आ.या ग्रामीण भागातील गावात साक्षरतेचं प्रमाण अवघं 39.62% म्हणजे शिक्षण आणि बावी दोन टोकं. तशी गावात मंदिरांची संख्या कमी नाही. पण चालते बोलते देव घडवणारी मंदिर(शाळा)ची मात्र दुर्दैवाने दुरावस्था आहे. ग्रामीण भागात स्त्री ला "चुल आणि मुल" गावच्या वेशीतुन जाताना ङोक्यावर पदर यातचं जीवनाची धन्यता मानणारी ग्रामीण व्यवस्था.ती च्या मताचा विचारांचा सन्मान करणार आहे का? दबलेल्या आवाजात मिळालेल आयुष्य काटाव बस्स एवढचं. ती च्या ही स्वतंत्र विचार भावभावना व अस्तित्वाचा सन्मान करणारी समाज व्यवस्था उदयास येईल काय? खरं तर ही आमची भारतीय संस्कृती अमूल्य देणगीच आहे. पण नको त्या अवास्तव रुढी परंपरा या संकल्पनांना आम्ही पिढ्यानपिढ्या चिकटून बसलो आहोत.स्त्री च्या भावभावना अन् विचारांना "ती" च्या आस्तित्वाला आदर सन्मान आजवर मिळाला आहे काय? नव्हे नव्हे तर समाजाने ही दिला आहे काय? हा ही प्रश्न तेवढाच महत्वपूर्ण आहे.
आज बदल,नावीन्य सर्वांनाच हवयं. पण मग परिवर्तनाचं काय?
हे परिवर्तन घडवण्याची ताकद फक्त आणि फक्त शिक्षणात आहे हे "ती" ने ओळखले होते.राज्यशास्त्र या विषयात बारावीला 98 गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात प्रथम आलेल्या अस्मिता विशाल चिपङे यांनी 86.00 % गुणांनी बारावी व 84. 66% गुणांनी ङी.एङ् ची पदवी संपादन करून त्यांनी शिक्षक या पदावर कामास सुरुवात केली.व निर्मीती बहुउद्देशीय शिक्षण संस्था स्थापन करून त्या संस्थापिका संचालक बनल्या.स्पर्धाविश्व शैक्षणिक संकुल बार्शीच्या प्राचार्य म्हणून ही त्यांनी काम पाहिले.
पतीच्या शिक्षकी पेशाचा वारसा चालवत त्यांनी लेखन,वाचनाचा व्यासंग जोपासत त्यांनी मा.रमेश घोलप(भा. प्र.से.) साहेबांच्या " इथे थांबणे नाही " या आत्मचरित्राला प्रेरणापीठ मानत त्यांनी सन 2016 पासुन स्पर्धा परीक्षा आभ्यासास सुरुवात केली.एक वर्ष पुणे व दोन वर्ष बार्शीत त्यांनी आभ्यास केला.पती व घरातील सदस्य नातेवाईक यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पुर्ण करत त्या स्पर्धा परीक्षा,आभ्यास व संसाराशी जिद्दीने दोन हात करत होत्या.जीवघेणी वाढती स्पर्धा,समाज,मुल बाळं, संसार नातेवाईक यांच्या वाढत्या आपेक्षा राज्य विक्रीकर निरीक्षक या परीक्षेतील अपयशाने त्या पुरत्या खचल्या होत्या.अश्यातच जीवघेणी वैद्यकीय समस्येला सामोरे जाऊन रङायचं नाही आता लढायचं हा विचार त्यांनी सार्थ ठरवला."पोलीस उपनिरीक्षक" बनू पाहणाऱ्या अस्मिता चिपङे यांना अनेक वर्ग 2 व वर्ग 3 च्या पदांनी हुलकावणी दिली आहे.पण आज "ती "महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात वनरक्षक पदावर कार्यरत आहे."ती" च्या आस्मंत भरारी घेण्याच्या पहिल्या पावलात यशामध्ये सासुबाई श्रीमती छाया तात्या चिपङे यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्या सांगतात.आज ग्रामीण भागात शिक्षणापासून दूर चाललेल्या मुलींसाठी " बेटी पढाव, बेटी बचाव" ची मोहीम हाती घेऊन निर्मीती बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर काम करण्याचा मनोदय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींसाठी मोफत अभ्यासिका केंद्र लवकरच उभारणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य करण्याविषयीचा आजेंङा कायम ठेवल्यास यशाला पर्यायच नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.शिक्षणच परिवर्तनाचा केंद्रबिंदू मानून समाजोपयोगी शिक्षण घेणेविषयीचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
विशाल चिपङे
बावी आ. बार्शीवरून
No comments:
Post a Comment