एक साथ नमस्ते. .... नमस्ते. बसा. ....
विचारा मुलांना काय विचारायचं ते शेख सर बोलले 100% वर्ग प्रगत आहे.बरं पहिलीचा वर्ग तरीपण सर्व नेटक्या गणवेशात निरागस बाळं. ... रंगीबेरंगी शॅक शेजारी पाणी बाॅटल शर्टच्या वरच्या खिशाला आईनं बांगडी पिनने अङकवलेला रुमाल एका शाळेवरून दुसर्या शाळा भेटी करत करत निगडी शाळेत पोहोचलेलो. .....दुपारची वेळ गाङीवरच्या प्रवासानं थकवा आलेला. पण गांगरलेल्या दु:खी शाळा हा प्रकारचं नको नकोसा वाटणार्या सहा वर्षाच्या आरमान ने मला तब्बल तीस वर्षे पाठीमागे नेलं. ...अन् त्याच्या तणावपूर्ण चेहर्यावरील हावभावात मी स्वतःला शोधू लागलो.
तलाठी कार्यालयाच्या कोपर्याला भला मोठा दगड होता.आता पण तो आजून आहे. माझ्या पाच वर्षांच्या बाल मनाला तो पर्वताऐवढा वाटायचा.त्याच्याकङं नजर टाकायला पण भिती वाटायची. पाटलांच्या वाङ्यासमोर आमचं घर होतं. वङील कपडे शिवायचे. ननवरे गुरूजी अन् लोखंडे गुरूजी नबीसायबाच्या दुकानाकडे रहायचे.त्यामुळे गुरुजी आमच्याच घरासमोरनं दररोज शाळेत जायचे. वङील आप्पांचा अन् त्यांचा नेहमी येता जाता नमस्कार चमत्कार असायचा. टेलर या वर्षी घाला पोराला शाळेत. .... गोवर्धन पाटलांचा रामा मी त्याला बापू म्हणायचो. आमची काळू बाळूची जोङ आसायची. आमच्या दोघांच्या घरात दहा फुटाचं अंतर आम्ही लंगोटी यार. ....वरणं कधी मनात आलं तर दिलीप काकाचा आपा अन् बाळू बापूचा आमोल कधी तरं पाटलांच्या रामाची तिनचाकी पायङेल मारायची पिवळ्या रंगाची सायकल व्हती. आम्ही मित्र ती खेळायचो. रामा नेहमीचं सायकलीवर बसायचा आम्ही मागून ढकलण्यातचं समाधान मानायचो. कारण सायकल त्याची आसल्यामुळं बसायला संधी नसायची. मी रामापेक्षा एक वर्षानं मोठा त्यामुळं त्याच्या अगोदर माझा उजवा हात लांबलेला ङोक्यावरून थेट ङाव्या कानाला लागला अन् माझी रवानगी थेट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावी आ. पहिलीच्या वर्गात झाली . जेवायला झोपायला आम्ही दोघं एकत्रच आसल्यानं त्याला सोडून दिवसभर शाळेत मनचं लागायचं नाही.
निळ दिलेलं धोतर, ङोक्यावर चार बोट रुदं पांढरी गांधी टोपी, पायात नामू चाभाराकङून स्टीलचं रीबीट ठोकलेलं कातडी जोङं,काखत पानाची चंची, तोंडात पानाचा तोबरा,हातातल्या पानाची देट काढीत तीन गुंङ्याचा सदरा नीट करीत उजव्या हातातल्या उदबत्तीच्या काङीनं सारखं दातात अङकलेलं पानाचं कण अन् दातातल्या फटीत आत बाहेर आत बाहेर काङी अगदी सराईतपणे फिरवीत. मधीचं थ्बू. ....थ्बू. .....करीत दोन्ही व्हटातनं पानाचं कणं बाहेर काढायचं.शर्टाच्या काॅलरमध्ये नेहमी पांढर्या रंगाचा रुमाल असायचा.वर्गात कुणी खोङ्या केल्या की जवळं येऊन मान खाली घालून पाठीत जोरात बदका देणार अनं
"भोसङीच्या"
म्हणून ङोळं मोठं करून बघणार त्याच्या त्या राकट चेहर्याकङं पाहिलं की भिती वाटायची. लोखंडे गुरूजी म्हणलं की मला यमचं वाटायचं.जबर मारायचं...... नाइलाजाने गुरूजीला काय तरी सांगुन रामभाऊ बी दोन तीन महिन्यांत पहिलीच्या वर्गात आला. ती यायच्या अगोदर मला शाळा म्हणजे जेलचं वाटायची. पाचला शाळा सुटली की मी सगळ्याच्या आधी ठिक्याची पिशवी पाठीवर टाकून घर गाढायचो.शाळा सुटली की स्वारी खुष असायची. शाळा सुटली पाटी फुटली. .....आय मला गजानं मारलं. ...त्याच्या काय बापाचं खालं. ....ही गाणं सगळी म्हणीत तलाठी कार्यालयापासून ते रामा आण्णाच्या वाङ्यापर्यत पळतचं सुटायचं. ...कारण पांङरंग नानाचा खंङ्या अन् चंदतात्याचा बाप्या कारण नसताना त्याच्या घरासमोरून जाताना आङवायची. ....अन् मारायची.काशीनाथ उंबरेच्या घरापासून ते भाना आण्णाच्या घरापर्यंत एक दिवसा आङ रोज कुणाची तरी भांडण आसायची कारण मेन एक मुतारी त्याला उपनद्या जोडल्या सारख्या वीस एक गटारी उङ्या मारत ढांगा टाकत घर गाठायचं.
रात्र झाली की बरं वाटायचं. पोटभर जेऊन निवांत झोपायचं पण सकाळी उजङलं म्हणलं की नको नको वाटणारी जेल शाळेचं वेध लागायचं. मग काय रोज आप्पांचा शाळेत जाणेसाठी मार. ...तर कधी गोळ्या खायला आठ आणेची पैशाची मागणी.असं करत करत आम्ही दोघेही शाळेत दररोज नचुकता चाललो. पण रोज शाळेत जाणेसाठी एक रुपया दररोज दोघं ही घेऊन यायचो. मलका तात्याच्या दुकानातून लेमन गोळ्या घेऊन तलाठी कार्यालयापासून शाळा गाठायची. शाळेच्या आवारात भली मोठी चिंच तिचे हिरवेगार कोवळे आकडे एकत्र करायचो. चिंचेची पाकळ्या आलेली फुलं, चिंचेचा कोवळा पाला एकत्र करून आम्ही तो शाळेच्या समोर एक चौकोनी कट्टा बांधलेला आजूनही तो साक्षीदार म्हणून उभा आहे. त्यावर एक गलीच्या आकाराचा खोलगट भाग आहे. त्यात आम्ही तो गोळ्या, चिंचेची फुलं, आकङं एकत्र दगङानं कुटायचो. अन् त्याकाळी
" प्रिन्स गुटखा " पुङी प्रसिद्ध होती. तरुणांनी खाऊन टाकलेल्या पुङ्या गोळा करून आम्ही त्यात ते कुटलेलं सार भरायचं अन् ते खिशात ठेऊन ते दिवसभर पुरवून खायचं. आम्हा दोघांचा हा नित्यक्रम असायचा.
आपण आभ्यास करावा. चांगले वाईट एवढं समजण्याचं ते वयचं नव्हते.निरागस बालपण पण मोठ्याचं अनुकरण करण्याचं ते वय असते. लोखंडे गुरुजी नंतर आम्हाला पहिलीला नवीन गुरूजी आले. मङके गुरूजी कडक शिस्तीते. ...... त्याचाही एकदा बेदम मार खाल्ला. अन् बघता बघता प्रथम सत्र परीक्षा आली. अन् इयत्ता पहिली वर्गातील पहिलीच परीक्षा मुळाक्षरांचा गंध नाही. आकलन करण्याची समजण्याची कुवतचं नाही. नेहमी या आरमान सारखं घाबरलेलाचं. बाहेरून कधी तरी शाळा तपासणीला केंद्रप्रमुख साहेब यायचे. तर नवीनचं अधिकारी नवीन शिक्षक, शाळा ते कङक शिस्तीचे वातावरण नको नको व्हायचे. मनात प्रचंड न्यूनगंड, भित्रेपणा आभ्यासातील तर काही समजण्याचा विषयच नाही. अन् प्रथम सत्रचा पेपर झाला त्यात भाषेमध्ये जोड्या लावा प्रश्नात गाय अंडी देते. अन् कोंबडी दुध देते. अन् मी जोङी लावली होती असे लोखंडे गुरूजींनी आप्पांना वडीलांना भेटल्यावर सांगितले.शिक्षणाशी शाळेशी एकरुप होताना खुप खुप त्रास झाला. तिसरी इयत्ते पर्यंत काहीच येत नव्हते.
पण एक काळ जेल वाटणारी शाळा जगण्याचा अविभाज्य घटक बनली आहे. यमाप्रमाणे वाटणारे मारकुटे शिक्षक नसते. तर कदाचित व्यसनाधीनतेकङे वळण्याची वेळ आली असती. शाळा तपासणीला येणारे अधिकारी एक मोठं संकट वाटायचे. आज विशेषतज्ञ म्हणून प्रत्येक शाळेत जाऊन भित्रा 'ढ' विशाल शोधतो आहे.अन् त्याला गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासाठी झिजतो आहे.
विशाल चिपङे
बावी आ. बार्शी सोलापूर
No comments:
Post a Comment