रखरखतं उन्ह अन् उडणारा धुरळा.
मातीची धुप अन् तुटणारे वृक्ष.
जीवाची घालमेल अन् प्राण्यांची व्याकुळता.
वसुंधरेच उजाडपण अन् वाढणारा उन्हाळा.
खरचं किती भयानक वास्तव आहे ना.
एकीकङं औद्योगिक स्मार्ट शहरीकरण अन् वाढतं प्रदुषण कधीतरी या सगळ्याचा विचार केला. की जीवाला हुरहुर लागते.अन् भीती वाटते जगण्याची निसर्गाविना......!चिमणी पाखरांच्या चिवचिवाटाविना......!
खरचं आम्ही सुरक्षित आहोत काय ?
झुळझुळ वाहणारे झरे अन् दुथडी वाहणाऱ्या नद्या फेसाळणारे समुद्र अन् ङबङबणारी तळी ही नुसता चित्रातील ओलावा घसा ओला करेल काय ?
गरज आहे. पाणी अङवण्याची.... पाणी जिरवण्याची..
पाणी वाचवण्याची..... पाणी साठवण्याची.......
पाणी म्हणजे जीवन. धरत्रीच्या गर्भात पाणी शोधण्याची वेळ येतेय. केवळ पाण्याच्या दुरोपयोगामुळं. वरदान असलेलं पाणी आज आम्ही विकत घेऊन पितो आहोत. आज विकत मिळणारे पाणी उद्या.....विकत तरी मिळेल काय ?
चला पाणी वाचवू.....!
जीवसृष्टी वाढवू.....!
विशाल चिपङे
बावी ता.बार्शी सोलापूर
No comments:
Post a Comment