" सद् रक्षणाय खल निग्रहणाय"
जनतेची अखंड सेवा व रक्षणाची जबाबदारी स्वीकारून अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वर्दीतील देवास अभिवादन. ... कदाचित पडणार्या पावसात अन् तळपत्या उन्हाळ्यात चोवीस तास अखंड पहारा देणारा माणूस सिनेमात त्याने पाहिला होता. सांगा ना बाबा. ...मग पुढे काय झाले अंगावर चादर ओढून गोष्ट सांगण्याचा हट्ट धरणारा माझा मुलगा धवल.
वय वर्षे फक्त तीन. जवळच्या बागेत येता जाता प्रत्येक वेळी प्रश्न विचारून भंडावून सोडायचा.बाबा हे काय आहे? याला काय म्हणतात? हे कोण आहेत? पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बागेने कदाचित त्याचे कुतूहल जागे केले. बंदुक,पोलीस स्टेशन,नाईक,शिपाई,साहेब,पेट्रोलीग, गणवेश,हजेरी,लाठी,तुरूंग,बेङ्या या गोष्टी एक दिवस त्याला प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात नेऊन दाखवल्या.
त्याला त्यातील किती समजल्या माहिती नाही.पण ज्या उमगल्या ते आम्ही रोज अनुभवतो आहोत. बालमनावर त्या एवढ्या कोरल्या की तो त्याचं रङून झाल्यावर मी पोलीस झालो की त्याला तुरुंगातच टाकतो.हे सांगायला तो कधीच विसरत नाही.
दर्दी असलेली माणसाचं अंगावर वर्दी घालू शकतात. हे मात्र नक्की खरं. 26/11 च्या फिल्म मधील निवडक ङायलाॅगने त्याची उम्मीद कधी कधी न कळत दिसते.
"नीचे उतर,अब तुम चारो तरफ से घेर चुके हो."
हा त्याचा आवङता नेहमीचा ङायलाॅग घरी कोणी आलं की म्हणून दाखवण्यात तो अग्रेसर असतो. आता माझी सटकली. हे दिवसभर शंभर वेळा तरी होत असेल. मी शाळेतून आल्यावर आम्हा बाप लोकांचा चोर -पोलिसांचा खेळ नेहमीच चालू असतो. प्रत्येक दिवशीच्या खेळात स्वतः पोलीस होऊन ढिश्क्यावं ढिश्क्यावं. ..... बंदुकीतील गोळ्यांचा वर्षाव नेहमीच माझ्यावर करत असतो.
वर्दी बदलची त्याच्या बालमनातील ओढ,आवङ पाहून मी त्याला आज सुखद धक्काच दिला. प्रजासत्ताक दिनी गणवेश पाहून एरवी कॅडबरीच्या,पॅपीन्सच्या प्रेमात पङणारं रङणार बाळ आज पोलीस झालं होतं.वर्दीतला माणूस कसा दर्दी असतो. हे आज जवळून अनुभवलं.देश की रक्षा ही मेरा इमान है! हे ब्रीद उराशी बाळगून मातृभूमीची सेवा करणाऱ्या तमाम महाराष्ट्र पोलीस अधिकारी कर्मचारी बंधूंना मानाचा जय हिंद. ....!
"महाराष्ट्र पोलीस-वर्दीतला माणूस" - महेश मुळे (पोलीस नाईक पोलीस ठाणे,पंढरपूर )यांचे विशेष आभार....खरं तर त्याच्या या फेसबुक पेज सदरामुळे महाराष्ट्र पोलीस दलात भरती होऊ पाहणाऱ्या तरूणाईस Policing Update मुळे प्रेरणा मिळते आहे.
विशाल चिपङे
बावी आ. बार्शीवरून
No comments:
Post a Comment