" हिच आमुची प्रार्थना अन्
हेच आमुचे मागणे ,
" माणसानी माणसाशी
माणसासम वागणे."
परमेश्वराला नैवेद्य म्हणून दाखवलेला पदार्थ
" प्रसाद " म्हणून पुढे येतो. अन् मन तृप्त करतो. बार्शी तालुक्यातील इर्लेवाङीच्या एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला प्रसाद मोहिते हा तरूण.घरची कमालीची गरीबी अन् सततची नापिकी अन् आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील हा घटक समाजातील दुःखाला कवेत घेण्याच धाङस करतोय.विचारांना व्यापकतेचं आभाळ लाभलयं. अर्धांगिणी अनुराधा साथ देतेय प्रसाद दादाच्या प्रघाङ समाज सेवेच्या झपाटलेपणाला.
एका मील कामगाराची मुलगी अनुताई भविष्याची नेटकी स्वप्नं रंगवायची सोङून वंचित घटकांच्या जीवनातील काळोखात प्रकाशाचे नवे अंकुर फुलवू पहातेय.केवळ विचारांच्या जोरावर .विचार हा माणसाचा सामर्थ्यशाली चिरंतन सांगाती असतो. हेच खरं तर आज प्रसाद दादा अन् अनुताई मोहोळ तालुक्यातील मोरवंचीच्या माळावर " प्रार्थना बालग्राम " च्या माध्यमातून भिक्षेच्या झोळ्या घेऊन फिरणार्या अनेक लेकरांच्या हातात शिक्षणाच्या पाट्या देता आहेत. भिक्षेकरी , स्थलांतरीत भटके , निराधार ,पारधी, पाथरवट यांच्या आयुष्याला आकार देण्याचं काम करत आहेत. हे समाज सेवेचे काम करताना अनेक अडचणी अनेक प्रश्न आ वासून पुढे उभारतात. पण प्रत्येक प्रश्नातून एक वेगळी दिशा अन् आशा निर्माण होते. अन् सुरू होतो प्रवास न थांबण्यासाठी दादा अन् ताईचा.
बालगुन्हेगारी, बालव्यसनाधिनता, भुकेल्या जीवाला अन्न, बेघर निराधार, यांना
"मायेचा हात अन् हक्काचा घास "
प्रार्थना फाऊंडेशनच्या माध्यमातून दिला जातो आहे. स्त्री जन्माचे स्वागत करणारे अन् पोटचा गोळा देहदान करणारे आई- बाप. समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करत आहेत. भिक्षामुक्त अभियान असेल...!तरूणाईशी संवाद असेल....! अश्या ध्येयवेङ्या माणसांनी परमेश्वराकङे जगासाठी केलेली ही प्रार्थनाच आहे.ते जगासाठी प्रार्थना करतायेत. आपण त्यांच्यासाठी देवाकडे याचना करुयात.
विशाल चिपङे
जागर फाऊंडेशन बावी आ.
बार्शीवरून
No comments:
Post a Comment