"न मागताही बघा
आयुष्य मिळालं छानसं,
पेरीत गेलो शब्द
अन् उगवली त्याला माणसं".
आजवर ऐकलं होतं की, पदामुळे माणसं मोठी होतात. पण सर आपल्या व्यक्तीमत्वाकङं पाहिलं की वाटतं माणसामुळं पदही मोठी होतात.
साखर गोड आहे.म्हणून सांगण्याची गरज नसते. कारण साखर गोङचं असते. पण आपले आगळे -वेगळेपण जपणारी उंबराची फुलं दुर्मिळच.
एक आदर्श शिक्षक, आदर्श पिता, आदर्श पती नव्हे नव्हे तर आदर्श व्यक्तिमत्वचं. ....... साधारणत: एक माणूस किती क्षेत्रात आपला वावर करू शकतो. याचं उत्तम उदाहरण ज्येष्ठ साहित्यिक ,कवीवर्य, लेखक, चित्रकार ,दिग्दर्शक ,अभिनेते व्याख्याते, निवेदक अष्टकलांची खाणं म्हणजे शब्द प्रभू "रामचंद्र इकारे" सर .
सरांचा आज वाढदिवस या शुभ क्षणी आपणास मनःपूर्वक शुभेच्छा...... राईबा'नु', रामबाण मनराई अनेक वात्रटिका काव्य, लेख. लोकसत्ता मधील "दुनियादारी" पासून ते लोकमत मधील "चला उठा झाडे लावायची वेळ झाली"
पर्यंतचा शब्द संसार अगदी अलगत सरांनी पेलला आहे ."आनंदयात्री प्रतिष्ठान" पासून त "उमेद प्रतिष्ठान" पर्यंतचा त्यांचा मित्रपरिवार हीच खरी संपत्ती आयुष्याला शब्दरंगात रंगू पाहणाऱ्या गुरुवर्याना पुढील शब्दगंधासाठी खूप खूप शुभेच्छा....!
विशाल चिपडे
जागर फाउंडेशन बावी
बार्शी जिल्हा सोलापूर*
No comments:
Post a Comment