बाबा आज बार्शी बंद आहे काय? नाही बाळ बार्शी थकलीयं. थकलीयं म्हणजे काय ?बाळा ती दमलीयं.सात वाजले दिवस उजाडला. तरी देखील चिटपाखरू ही रस्त्यावर दिसत नव्हते. मुलाच्या प्रश्नांना उत्तर देत देत भगवंत मंदिराचा कळस दिसला.गाभार्यात जाऊन चरणस्पर्श केला.अन् दोन मिनिटे मंदिरातच विसावलो.या चिमुकल्याच्या प्रश्नांनी लेखणी उचलवण्यास भाग पाडले.
विधानसभा सार्वत्रिक मतदान 2019 ची रणधुमाळी काल राज्यभर पार पङली. अनेक मतदारसंघात आपआपल्या नेत्याच्या विजयाची खात्री बाळगून गेल्या सहा महिन्यांपासून प्रत्येक कार्यकर्ता नेटाने व जोमाने काम करत होता. या वैचारिक लढाईची खलबत गावगाङ्यात वस्त्या वस्त्यावर व गावच्या पारावर रात्ररात्र रंगायची. ...कोण ? पक्षासाठी तर कोण नेत्यासाठी जीवाचं रान करून विजयाची खात्री देत होते.
काही कार्यकर्त्यांच्या निर्णयामुळे तालुक्याची राजकीय समीकरणे बदलली. तर काहीनी जुन्याच नेत्यांची पाठराखण केली. एकंदरीतच आपल्या नेत्यावरील प्रेमापोटी काहीनी आपल्या आप्तेष्टांच्या कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शवली. तर काहींनी प्रचार दौरे बेभान होऊन भाषणे ठोकली.विविध प्रकारची चिन्ह, विविध रंग अन् तालुक्याच्या विकासाची भविष्यकालीन धोरणावली समोर ठेवली. विविध निवेदन,चित्रफिती अन् स्टीकर. ....वातावरणात रंग भरला होता. प्रत्येक कार्यकर्ता दंग झाला होता.
जीवाचं रान करून नेत्याच्या विजयासाठी झटत होता. काहीनी देवाला नवस केले. तर काहीनी दंङवट घातले.
केवळ अन् केवळ. ......आपल्या " नेत्यासाठीचं"
लोकशाहीच्या या राष्ट्रीय सणात प्रत्येकजण सामील झाला होता. दहा दहा वर्ष आजारानं जखङलेला अंथरुणावर असलेला मतदार राजा दोन काखात हात घालून मतदान बुथवर पोहचवला होता.- कार्यकर्त्यांनी
मोटर सायकल वरून तर कोण बैलगाडीतून प्रत्येकजण ही लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या मताचं _"दान" करण्यासाठी उपस्थित होता.अन् कार्यकर्ता मात्र शिणला होता. भागला दमला होता.आता प्रतिक्षा भगवंताच्या कौलाची.....!
विशाल चिपङे
बावी आ. बार्शी वरून
No comments:
Post a Comment