चिपङे सर बोलताय ना. ...हो हो आपण कोण ? सरजी मी तुमचा विद्यार्थी महेश बोलतोय. म हे श. ....हो सर महेश मिरगणे. सध्या मुंबईच्या भारत फोर्ज या नामांकित कंपनीत computer Software Engineer या पदावर कार्यरत आहे. अच्छा. ....बोल महेश. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी सर मी फोन केलेला. ...कसे आहात सर ?
मुंबईला कधी येणार आहात. आल्यानंतर फोन करा. सर. ... आजही मला आठवतयं सर बावी मध्ये समर्थ कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून उभी केलेली शिक्षण चळवळ प्रभावी अध्यापन आम्हा विद्यार्थ्यांना शाळेतीलचं नव्हे तर आयुष्याच्या परीक्षेत ही पास करणारं ठरलं.
आपण करुन घेतलेली अभ्यासक्रमाची बेसिक तयारी खुप महत्वाची ठरली. स्कॉलरशिप, नवोदय,मंथन सारख्या परीक्षेत आपले मार्गदर्शन आम्हासं मोलाचे ठरले. सरजी गेल्या महिन्यात मी स्वामी विवेकानंदांचे "विवेक विचार "हे पुस्तक वाचले. स्वामीजींनी सांगितलेले शिक्षण म्हणजे काय? तर
"व्यक्तीचा सर्वागीण विकास म्हणजे शिक्षण ."
सर आपण आम्हास सर्वागीण व्यक्तीमत्वाचा विकास करणारे शिक्षण दिलेत. विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर विद्यार्थी व्यक्तीमत्व घडविणार्या स्पर्धा असोत.अथवा आपण सादर केलेली "वाचाल तर वाचाल "हे पथनाट्य असो. हे सर्व उपक्रम आम्हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाला पैलू पाङणारे ठरले. बावी आणि शिक्षण ही खरं तर दोन टोकं पण सर 2003-04 तब्बल सतरा वर्षापूर्वी आधुनिक तंत्रज्ञानाचं कोणतंही साधन नसताना आपण क्लास अंतर्गत घेतलेले विविध मोफत स्पर्धा परीक्षा शिबीर असतील आपले ज्ञानदानाचे कार्य खरचं खूप मोठे आहे.नेहमीचं शिक्षणाविषयीची आपली तळमळत सर आज ही आम्ही जवळून पाहतो.कु. दिक्षा मोहन आगलावे ही तुमची विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागातून पहिली आलेली. एक गुरु म्हणून नेहमीच आपण माझ्यासाठी आदर्श आहात.सर आजही शिक्षण विचारांचा जागर करत आहात.
गुरु पौर्णिमेनिमित्त एका शिष्यानं गुरू ज्ञानदाना विषयीची सुस्ती सुमने माझ्यासाठी अनेक पुरस्कारापेक्षाही खुप समाधानाची बाब होती. हॅलो हॅलो. ....महेश.
ओके सर बाय मुंबईला आल्यावर नक्की या सर वाट पहातोय. ...
आज मला अभिमान वाटतोय मी शिक्षक आसल्याचा खरं तर 2003 -2019 तब्बल सतरा वर्षाचा शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम केल्याचं एक वेगळं समाधान मनाला आनंद देऊन जात.राज्यस्तरीय शिक्षण परीषदा असतील.विविध शैक्षणिक चर्चा सत्र असतील. इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलेली प्रेरणादायी व्याख्याने किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांचे विशेष शिक्षण(Special Education ) असेल. अथवा नव्यानं येऊ घातलेल्या मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांचे( New Education policy)राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019.या जिल्ह्य़ास्तरीय चर्चासत्रासाठी झालेली निवड असेल. मनाला शैक्षणिक चळवळीतील पाईक असल्याची जाणीव करून देतात.
मला अभिमान वाटतो मी शिक्षक असल्याचा कारण मी घङवतोय. ....देशाचे बलशाली सशक्त भावी आधारस्तंभ
"विद्यार्थी हीच माझी धनदौलत "
विशाल चिपङे
बावी आ. बार्शीवरून
No comments:
Post a Comment