विधानसभेची रणधुमाळी राज्यभर पार पङली. कार्यकर्ते नेत्यांच्या करीयरसाठी अहोरात्र झटले आता सत्ता स्थापनेचा मुहूर्त पहाण्याची वेळ आली आहे. लोक मतासाठी थेट पैसे मागू लागले आहेत. शिकलेले लोक इमारतीला रंगकाम करून मागतात. शहराचा वार्ङाचा विकास नाही झाला तरी चालेल पण आमची बिल्डिंग सोसायटीच्या विकासापुरती मर्यादित भुमिका लोकशाहीला एक दिवस मोङीत काढणार आहे. सामुहिक विकासासाठी लोकशाहीत म त दा न असताना लोकांनी आता मत विक्री सुरू केली आहे. राजकारण्यांना भष्ट्राचारी म्हणणार्या लोकांनी जरा स्वतःकडे पहाण्याची गरज आहे. नेता निवङून देणारे तुम्हीच भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहात. तुम्हीच लोकशाहीला बुङवणारे लोक आता छाताङ बदङण्याची नाटक करू नका.कारण आता सत्तेपुढं शहाणपण चालत नसते .
नामदेवराव जाधव लिखीत "सत्ता " पुस्तकात राजकारणातील काही मूलमंत्र तुम्हाला नेता बनवून सत्ता स्थापन करण्यात उपयोगी पडतील असे आहेत. राजकारणात पैसा नाव कमवायचे तर पङायला घाबरू नका.आपल्यापेक्षा वयाने मोठ्या आसणार्या लोकांशी मैत्री करा. नेत्याचा व मतदारांचा विश्वास संपादन करा. राजकारणात कार्यकर्ता म्हणून रहायचे असेल तर अन्याय सहन करा. अन् नेता व्हायचे असेल तर बंङ करा. रात्रीत नेता व्हायची इच्छा असेल तर आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून काम करण्याची तयारी ठेवा. इतिहास नेहमी नेत्याचा लिहिला जातो कार्यकर्त्यांचा नाही. कारण नेता नेहमी भविष्यकाळासाठी जगतो. कार्यकर्ता भूतकाळातच रमतो. अशक्य काम शक्य करतो तो नेता अन् शक्य काम अशक्य करतो तो कार्यकर्ता.
यशस्वी कार्यकर्ता आपल्या पक्षाचे मुखपत्र वाचतो. तर यशस्वी नेता विरोधी पक्षाचे मुखपत्र वाचतो. जर राजकारणात आपला पराभव होऊ नये असे वाटत असेल तर विरोधी पक्षातील बित्तंबातमी सांगणारा एखादा नाराज बंडखोर हकालपट्टी केलेला बिभीषण सोबत ठेवा. युध्दात आणि निवडणुकीत अचूक माहिती मिळवणे म्हणजे विजयाची हमी. राजकारणात नवख्यांनी प्रस्थापितांच्या हाताला धरण्यात मजा नसते. नवख्या फुरफुरणार्या घोड्याची साथ मिळवणे फायद्याचे ठरेल.
रामाची बायको सीता रावणाने पळवली. तेव्हा राम आयोध्येचा राजकुमार असुन ही एक ही राजा मदतीसाठी आला नाही. रामाने ठरवले. नर नाहीत तर "वानर".
वानरांचा राजा सुग्रीव रामाच्या मदतीला उपकार म्हणून आला नाही. तर सुग्रीवाची ही बायको सत्ताधाऱ्यांनी पळवून नेली होती. त्यालाही अन्यायाविरुद्ध मदत करणारे कोणी नव्हते. मग दोघांनी "समान मुद्दा कार्यक्रम " बनविला. अन् दोन्ही समदुःखी एकत्र आले अन् विजयी झाले. राजा झाले. राजकर्ते झाले. तुमची तिकीटं हीच तुमची बायको.ती जर कोणी सत्ताधाऱ्यांनी पळवून नेली. तर एकत्र या युती करा. "सत्तेत "याल.
कार्यकर्त्यांचा नेता बनू पहाणार्यानी व नेत्याचा कार्यकर्ता न बनू इच्छिणाऱ्या नेत्यानी नक्की अवलोकनी घ्यावे अशीच विचार संपत्ती _"सत्ता "
# विशाल चिपङे
जागर फाऊंडेशन बावी
आ. सोलापूर वरून
No comments:
Post a Comment