"तन की हिस्सो में सिर्फ दो आॅखे,मन के हिस्सो में हजार होती है,तन की ऑखो तो सो भी जाती है!
मन की आॅखे कभी ना सोती है, चाॅद सुरज के जो हो खुद मोहताज भीक मांगो ना उन उजालो की!
बंद आॅखो से ऐसे काम करो आॅख खुल जाए ऑखवालो की!
संकल्प आणि सिद्धी या दोन्हीमध्ये संघर्षाचा डोंगर असतो. त्या संघर्षाशी दोन हात करतात तेच सिद्धीच्या डोंगरावर विराजमान होतात. बार्शी म्हणजे अष्टकलांची खाण असलेला हा तालुका संगीत, नृत्य,साहित्य, कला,अध्यात्म,शिक्षण एक ना अनेक क्षेत्रात स्वतः जवळ असणाऱ्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अटकेपार झेंडा लावणे हा बार्शीच्या मातीत गुणच.
पेन्सिल रेषांच्या माध्यमातून हुबेहूब प्रतिकृती साकारणारा बार्शी तालुक्यातील जामगावचा शिल्पचित्रकार *श्री.महेश मस्के* यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर डोळस चित्रकारही फिक्की पडेल अशी अफलातून हुबेहूब चित्र कला जोपासली. आणि तिचा छंदातून विकासाकडे......अन् विकासातून समृद्धीकडे........ हा त्यांचा संघर्षमय जीवन प्रवास त्यांच्या पोर्टल पेंटिंगच्या कार्यातूनच त्यांचं नाव आदबीनं घेण्यास भाग पडतो. योग्यवेळी योग्य गुरू लाभणं हेही खूप महत्त्वाचे असते.
अशी कृतज्ञता व्यक्त करताना महेश त्यांचे चित्रकारिता क्षेत्रातील गुरु श्री पांडुरंग फपाळ व सचिन बुरांडे यांचा तो आवर्जून नामोल्लेख करतो.महेशच्या घरची परिस्थिती अतिशय जेमतेम गरीब कुटुंबातील पण त्याची जिद्द फार श्रीमंत आहे. इतर चित्रांपेक्षा व्यक्तिरेखा रेखाटने फार अवघड गोष्ट. राजकारण-समाजकारण,प्रशासन, सिनेदुनियेतील अनेक दिग्गजांची चित्रे महेशने रेखाटलेली आहेत. ज्या वेळी तो एखादे चित्र रेखाटतो त्यावेळी ते चित्र त्याच्या स्मृतीपटलावर ठळकपणे रेखाटलेले असते. मगच त्याच्या जादुई बोटातून ते चित्र जन्म घेते. समाजातील त्यांचे आजचे स्थान या व्यक्तिरेखेने केलेला संघर्ष जणू की काय तो त्या चित्रात ओतत असतो. "नियोजनाप्रमाणे काम व कामाप्रमाणे नियोजन" हे त्याच्या चित्रकारीतेचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे .कला ही माणसाला जगायला अन् जगावायला शिकवते. हीच कला जेव्हा जगणे बनते तेव्हा जीवनाचा खरा आनंद उपभोगता येतो. संवेदनशील माणूसच समाजातील सुखदुःखांचा हिशेब ठेवतात. तरुणांना प्रेरणादायी व माणुसकी जपणारी विचार करायला लावणारी त्याची लेखन कौशल्याची कला त्याच्यातील जिवंतपणाची साक्ष देते. अशा या जिद्दी परींद्याची कलानगरी प्रत्येक कलाप्रेमींनी पहावी अशीच आहे.
सामाजिक संस्था व शासन दरबारी या कलाकारांच्या कलेचा यथोचित सन्मान व्हावा व दखल घेतली जावी असा कला जगतातील कलंदर कलाकार ......
लेखन अट्टाहास :
©प्रा.विशाल चिपङे
बावी,बार्शी सोलापूर
📞 8317250005
KNOWLEDGE CREATION
No comments:
Post a Comment