तंत्रज्ञानाच्या एकविसाव्या शतकाच्या विसाव्या पायरीवर आम्ही सुधारलो.पुढारलो खरे कोट्यावधी किलोमीटर अंतरावरील मैलांचा प्रवास एका क्लिकवर संपवला.चुटकी सरशी जगाच्या एका कोपर्यातून दुसर्या कोपर्यात पोहोचलो.घङ्याळाच्या काट्याशी स्पर्धा करू लागलो.एकमेकांना ऑनलाईन पाहू शकलो. पण आम्ही मनानी मात्र ऑफलाईन झालो.
नात्यातला प्रेम, जिव्हाळा, आपलेपण संपले. माणूस माणसांपासून विलग झाला. बोलणं संपल. संवाद संपला अन् वाद वाढला.सेकंदाच्या तालावर नाचणारा माणूस एकमेकांशी तुलना करू लागला.स्पर्धा करू लागला. अन् सुधारलेलोच्या गप्पा करू लागला.आवर्जून पाहुण्यांच्या घरी बिनधास्त वेळी अवेळी जाणारा माणूस संकोच बाळगू लागला. मी अचानक गेलो तर त्यांना आवडेल का? दरवाजा नाॅक करून जाऊ. त्यांची अपॅमेंट घेऊन जाऊ. विचारून जाऊ असे प्रगत झाल्याचे पतंग उडवून आपण सुधारलोचा मेकअप करून समाजात वावरू लागला.
सोशल नेटवर्किंगने जगाची टोक जोडली पण माणसं मात्र दुरावली.शब्द आटले.माणसं मुकी झाली. चित्रातनं एकमेकांना समजून घ्यायला लागली.शिळूप्याच्या गप्पा मारणारी माणसं शिळूपाचं विसरली.आवङणारी गोष्ट तोंड भरून कौतुकावरून लाईक वर आली. कुणाला किती लाईक्स् मिळाल्या यावरून लायकी ठरवू लागली.आनंद व्यक्त करताना हासरी तोंड अन् फुलाचं गुच्छ पाठवू लागली. शब्द मुके झाले. माणसं स्वमग्न झाली.प्रत्येकजण सोयीनुसार चित्राचे वेगवेगळे अर्थ काढू लागले. त्यातून वादाच्या ठिणग्या उडाल्या. तर कधी कधी गैरसमज निर्माण झाले. वेळेची बचत म्हणून सांकेतिक चिन्ह वापरली. पण माणूस अबोल झाला.विचारांची साखळी थांबली.
अन् एकमेकांना समजून घेण्याच्या गैरसमजात माणसं अङकली.चित्र चित्र बोलू लागली. मनाची घालमेल अन् भावनांचे दमन करू लागली.अन् मग अचानकच भावनांचा उद्रेक करू लागली.
" समझनेवालो को इशारे भी काफी होते है! " या ङायलाॅग वर येऊन थांबलो. पण खरं सांगू का माणसं मुकी झाली अन् चित्र बोलू लागली.
विशाल चिपङे
बावी आ.बार्शीवरून
No comments:
Post a Comment