KNOWLEDGE CREATION ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत !

Tuesday, 14 April 2020

बोलका देव



          भारतीय संविधान म्हणजे लोकशाहीचा आत्मा त्याचे पावित्र्य राखणे. हे प्रत्येक भारतीय नागरीकाचे परमकर्तव्य आहे. राज्य घटनेने देऊ केलेले हक्क अधिकार प्रत्येकास समान आहेत. तो गरीब असो वा श्रीमंत.लोकशाही देशात प्रत्येकास कायदा समान संधी समान. ....स्वतंत्र विचारांची चौकट उभी करण्याची मुभा आहे. वाचन भाषणाबरोबर स्व चे विचार लिहण्याचे स्वतंत्र दिले आहे. राज्यघटनेने काही fundamental Rights देऊ केले आहेत.
           आमची भारतीय संस्कृती विचारांचा अमूल्य ठेवाच आहे.पण वास्तववादी संत महात्म्यांना लोकांनी कमी प्रमाणात स्वीकारले. तेहतीस कोटी देवाची रुप रंगवली कोणी? माणसानीच ना. ...त्यांचा रंग रुप मूर्त्या त्याची प्रतिष्ठाना भंगलेल्या मूर्तीचे विसर्जन, कर्मकांड हे सर्व माणसान आत्मिक समाधानासाठी बाजार मांडला.

       " कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी 
          लसुण मिरची कोथिंबीरी अवघा झाला माझा हरी "

हे संत सावता माळी. बापहो....! देव देवळात नाही. माणसात आहे असे सांगणारे गाडगेबाबा आम्हाला खुप कमी आठवतात. " भक्तीची अराधना केल्याशिवाय शक्तीची प्रतिष्ठाना होऊ शकत नाही."हे जरी खरे असले तरी भक्तीत किती वेळ पैसा श्रम खर्च करावा . खरं तर माणसांनी देवळातल्या दगडात देव शोधण्यापेक्षा चालत्या बोलत्या माणसात देव शोधणे काळाची गरज आहे.एखाद्या गरीब होतकरू

 "शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी देऊ केलेली मदत कुलदैवताच्या मंदिरावर सोन्याचा कळस लावण्या इतपत पुण्याची आहे."

          गरीबाच्या झोपडीत दोन वेळची चुल पेटण मुश्कील आहे. पोटात भुकेचा ङोंब उसळून कितीतरी बालक मृत्यूच्या शय्येवर जात आहेत.घरात चटणीवर ओतायला तेलाचा थेंब नाही. अन् एका बाजूला दगडाला तेलाने अंघोळ घातली जाते. श्रध्दा जरूर असावी पण अंधश्रद्धा काय कामाची. न्यायव्यवस्थेचे न्यायाधीशच जर भविष्य पहायला एखाद्या साधूकङे जात असतील.तर मग सामान्य माणसानी न्याय मागायचा तरी कोणाकडे आजकाल शिकलेल्या लोकांनीच आपली ङोकी गहाण टाकल्याचा प्रकार पहायला मिळतो आहे.
            देवळासमोरील दानपेटीत लाखो रुपये गुप्त दान टाकण्यापेक्षा एखाद्या शाळेतील गरूब होतकरू विद्यार्थ्यांच्या ज्ञानपेटीत चार पै टाकले तर त्या राष्ट्राचा आधारस्तंभ आपण उभा केल्याच वेगळं समाधान लाभल्याशिवाय रहाणार नाही.राजा शिवछत्रपतींना तोरणा गडावर सापडलेले गुप्त धन राजांनी स्वराज्याच्या कामी लावले. देवळ बांधण्यात अन् मूर्त्या उभारण्यात नाही लावले.
           मुक्या देवाची भली मोठी मंदिर उभारून अन् सोन्याचे कळस चढवण्यापेक्षा बोलक्या देवाच्या गळक्या  शाळा दुरूस्त करूयात.राष्ट्र उन्नतीसाठी एकत्र येऊयात. ....कर्मवीरांचे स्वप्न पूर्ण करुयात.

                         विशाल चिपङे 
                   बावी आ. बार्शी सोलापूर

No comments:

Post a Comment