KNOWLEDGE CREATION ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत !

Tuesday, 14 April 2020

म्हंम्हंईची लोकल


  ये मध्य रेल का छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स है!यहाॅ पर हम यात्रियो का हार्दिक स्वागत करते है! एवढ्या गोङ आवाजाची कोण बाई बोलतीय ही कळायच्या आतचं. ...धो धो धो माणसांचा लोंङा आला. वारूळातनं जसं मुंगळं बाहेर पडावं तशी माणसं रेल्वेत आत बी तिवढीचं बाहेर बी तिवढीचं सगळ्या माणसाच्या अरबी समुद्रात मी मलाच हुङकायला लागलो. बाबा. ..बाबा. ..बा...काय ही मुंबई.सगळा माणसांचाच महापूरचं ढकला ढकली रेटा रेटा कोण वरङतयं तर कोण पुढं सरकतयं तर कोण मागून ढकलतयं सगळ्या गर्दीचा विचार फक्त एकचं म्हम्हईची लोकल पकडायची.मी या सगळ्या धरावङीत पुरता घामाघूम झालेलो.माझ्या एका बुटाची लेस सुटलेली शर्टाचं एक बटण तुटलेलं बॅग पोटाला धरलेली मागून माणसांच्या गर्दीनं एकसारखा ढकलायला रेटा लावून धरलेला. ..
             विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा....म्हणल्यावनी सगळ्या रेल्वेच्या अंगाखांद्यावर माणसचं माणसं दाराच्या तोंङाला बी तिवढीचं लटकल्याली आतल्या शेकडो लोखंडी कङ्या बी कर्र कर्र आवाज करीत कुर्र कुर्रत होत्या.  हा सगळा प्रकार मी नव्यानचं अनुभवत होतो. हजारो माणसांच्या गर्दीत श्वास गुदमरल्याचा भास होत होता. जीव पुरा बैचेन झाला होता. मधीच एखाद्या स्टेशनावर गाडी थांबल्याचा भास व्हायचा. क्षणात् शेकङोजण आतपण तेवढेच अन् बाहेरपण तेवढेच पङायचे. धक्का  धक्कीच्या अन् धावत्या मुंबई जीवनाचं वर्णन आजवर नुसतं वाचलेलं पण आज प्रत्यक्षात ते अनुभवत होतो.
            पण संकरीत खाणं, व्यसनं,दुषित वातावरणात अकाली वृध्दत आलेली माणसं ढकला ढकलीत लागली आपला पिझ्झा, बर्गर अन् स्वास खालेला ....जोर लावायला लागली .पण मी शंबर नंबरी गावरान अस्सल सोलापूरी ज्वारीची खालेली भाकर तिथं उपयोगी पडली. एकच रेटा दिला अशी दहा पंधराजण ङब्याच्या तोंडाची माणसं ङायरेक्ट कोपर्‍यातचं शेजारी पोपटावनी चोच रंगिवलेल्या पाच सहा मरक्या पोरी कङीला लटकत व्हत्या. त्याचा पेहराव बघितला अन् त्याच्याकङं बघायची मलाच लाज वाटायला लागली.हातात वीस वीस हजाराचं मोबाईल पण मानसिक दारिद्र्यामुळं अंगावर फॅशनच्या नावाखाली थोटकी कपडे हा सगळा प्रकार बघून मी भारतीय संस्कृतीचं प्रतिक असलेली नऊवारीतली स्त्री शोधायला लागलो.पण छ्या. ...
            ते दृश्य फक्त गावच्या मातीतच पहायला मिळणार हा सगळा विचार मनात घोळत असतानाच शेजारी उभी असलेली अंगावर कीटकनाशक फवारल्यावणी स्प्रे चा फाया केलेली एक मुलगी म्हणाली
  "वा व्. ...व्हेरी हॅन्डसम् पर्सनॅलिटी."
मी मात्र पुरता गङबङलो होतो.  ङोक्यावर केसाचा ठेवलेला पुंजका साईङ कटींग,आम्ही सुधारलोच्या नावाखाली महागङ्या दारूचे पेले व सिगारेटचा झुरका घेऊन तारुण्याची वाट लावणार्‍या आपल्या बॉयफ्रेंडपेक्षा कदाचित मी तीला आवङलो असेल माझ्या  रांगड्या लिबाज अन् रांगड्या झुपकेदार मिशामुळे ती माझ्यावर इम्प्रेस झाली असेल.चेहर्यावरच्या गोङ खळीने तीने मला निरोप दिला.अन् ती विरार स्टेशनला उतरली.अन् मी भानावर आलो.
                जगण्याची स्पर्धा करणाऱ्या मुंबईकरांचे जीवन,शंभर शंभर मजली इमारतीतलं त्याच वास्तव्य घड्याळाच्या काट्यापेक्षाही फास्ट असलेलं त्याच जीवन.यंत्र मानवासारखंच वाटलं. त्या लोकलच्या गर्दीच्या लोटानं मी ङायरेक्ट प्लॅटफॉर्मवरचं येऊन उभारलो. स्टेशन होत "चर्चगेट "
 लोकलने क्षणार्धात स्टेशन सोडून निघून गेली होती. तिच्या सुसाट वाऱ्याच्या वेगाकङे अन् दाराच्या तोंङाला लोंबकळणार्या मुंबईकराकङं बघतच राहिलो. अन् मनात पुटपुटलो. ....
    " गङ्या आपला गावचं बरा".

                    - विशाल चिपङे
                      बावी आ. बार्शीवरून

No comments:

Post a Comment