संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय असणारे बार्शीचे लोकशाहीर अमर शेख (महेबूब हुसेन पटेल )हे महाराष्ट्राच्या तत्कालीन कला क्षेत्रातील बार्शीचे मुकुट मणीच. ओघवत्या जीवंत अन् ज्वलंत लेखणी, चढता बुलंद पहाङी आवाज ही त्याच्या व्यक्तीमत्वाची खास वैशिष्ट्ये. लावणी, पवाङे, लोकगीते,स्वरचित कवणे यांच्या माध्यमातून उपेक्षित उध्दारासाठी वाणी अन् लेखणीचा यज्ञ मांडला.रंगभुमीच्या या सेवेसाठी त्यांनी परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी गिरणी कामगार म्हणून ही काम केले. पण आपल्या अनोख्या अदाकारी अन् दिलखेचक अभिनयाने माय बाप रसिकांच्या मनावर राज्य केले. "मी महात्मा फुले "या चित्रपटातील त्यांचा अभिनय खूप गाजला. "झगडा " या रंगभूमीवरील त्यांच्या अभिनयाची जादू कित्येक पिढ्यांच्या मनावर कोरली होती.
लोककलांचे जतन अन् संवर्धन संशोधन या उद्देशाने मुंबई विद्यापीठाने अमर शेख यांच्या सन्मानार्थ लोकशाहीर हा विभाग चालू केला आहे. खरं तर आम्हा बार्शीकरांसाठी ती एक अभिमानाची गोष्ट आहे. असा हा सुर एका वादळाचा वारसा आजच्या ङिजीटल युगात ही हे अभिनयाचे शिवधनुष्य टिकवून ठेवण्याचे कार्य अभिनयाचे नवे तारे कलाप्रेमीनी ठेवला आहे. प्राजक्ता माळी, विद्या सावळे, नीता देव, राहुल जगदाळे, सचिन नलावडे, रामचंद्र इकारे, मोहित वायकुळे, सचिन वायकुळे,विशाल गरङ अशा अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर बार्शीचा नावलौकिक वाढवला.
अमर देवकर हे देखील त्यातलचं एक नाव वेङे इतिहास घडवतात अन् शहाणे पहातात. असचं आपल्या ध्येयासाठी वेङा झालेला नट. ..रंगभूमीची अन् रसिकांची अभिनयाच्या माध्यमातून सेवा करता आहेत.चित्रपट निर्मितीचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन "मुद्रा भद्राय राजते". या नाट्य कलाकृतीनंतर धर्मनिरपेक्षता अन् मानवतावाद शिकवणारा लघुपट "आयडेंटिटी "हा माय बाप रसिकांनी ङोक्यावर घेतला. या अभूतपूर्व यशानंतर अमर यांनी एक हटके ग्रामीण भागातील गोष्टीवर भाष्य करणारी अफलातून कलाकृती रुपेरी पडद्यावर साकारली दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त
" म्होरक्या "
प्रत्येक रसिकांना अंतर्मुख करायला लावणारी मराठी कलाकृती चित्रपट म्होरक्या. अनेक संघर्षांतून पुढे जाऊन तो म्होरक्या ठरतो. प्रत्येकात म्होरक्या शोधायला लावणारा म्होरक्या अवघा महाराष्ट्र अनुभवतोय. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक (अमर देवकर) म्होरक्या बार्शीचा आहे. याचा आम्हा बार्शीकरांना अभिमान वाटतो. अमर शेख ते अमर देवकर पर्यंतचा सीने दुनियेतील प्रवास रंगभूमी व रुपेरी पडद्यावर "अमर " राहिल.
विशाल चिपङे
बावी आ. बार्शीवरून
हॅलो -8317250005
No comments:
Post a Comment