मराठी साहित्यातील एक सोनेरी पान राज्यशासनाने प्रथम पारितोषिक देऊन गौरवलेली आण्णाभाऊ साठेंची 145 पानांची एक जिवंत साहित्य कलाकृती.
"फकिरा"
कोण रं तू.
साहेब....फकिरा राणोजी मांग हजर व्हायला आलोय.
तब्बल 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकाच बैठकीत अनुभवली.फकिराच्या उभ्या आयुष्यातील कारकिर्दीचा झंझावाती रणसंग्राम. त्यांच्या लेखणीतील प्रतिभा म्हणजे वाचकांना कल्पना विश्वात रममाण करणारी नव्हे.अतिशयोक्ती नाही. तर जे त्यांनी अनुभवले, भोगले, सोसले त्या जीवनालाच अर्थपूर्ण करून शब्दबद्ध केले आहे. शब्दफेक, एखाद्या प्रसंग हुबेहुब वाचकांसमोर उभा करणे.परस्थितीमधील जीवंतपणा अगदी साध्या सोप्या शब्दात वाचकांच्या ह्रदयाचा ठाव घेणारी अस्सल ग्रामीण लेखणी वाचकांना कथेचा नायक बनवून टाकते.आणि कथा जगायला भाग पाङते. खरं तर हीच त्यांच्या शब्दांची ताकद आहे.
कथेतील फकिरा हा प्रस्थापित( इंग्रजी) यंत्रणेविरूध्द बंङ करून पिढ्यांनपिढ्या जुलमाच्या अन् अन्यायाच्या शृंखला तोङून स्वतःच्या समाजाचं शौर्यत्व सिध्द करतो.अन् कथेचा नायक बनतो.कथेचा हा प्रवास आण्णा भाऊनी उपेक्षितांच्या जीवनाची करून कहाणी अन् जिगरबाज जीवाला जीव देणारी माणसं सावळा मांग , मुरा मांग , तायनू मांग, पिरा मांग , बळी मांग , भिवा मांग ही या कथेतील अष्टपैलू पात्र कथेवरील नजर हटू देत नाहीत.
गावकुसाबाहेरील निवङूंगातलं कोपटातलं जीणं आलेल्या संकटाला मनाच्या श्रीमंतीनं तोंङ देणारी माणसं अन् आख्खा मांगवङा जगायची नवी उमेद देतो.घोङा गबर्यानं राणोजी व फकिरा या बापलेकाला दिलेली साथ कथेत जीवंतपणा आणते. फकिराच्या अंगी असलेल धैर्य ,शौर्य,रग अन् बंङ करण्याची हिंमत वाचकाला नवी उभारी देते. ग्रामीण भागात जत्रा भरवण्यासाठी केलेला जोगणीचा पाठलाग दोन गावात पिढ्यानं पिढ्यांच वैर निर्माण करतो.आणि मग संर्घष, ईष्या, बदला , झटापट ,चढाओढ कुठली कुठं नेऊन पोहचवते. अन् अख्खं आयुष्य जीवमुठीत ठेऊनचं जगावं लागतं.फकिराच्या कुटूंबाचा संघर्ष हे कसं सगळं विचार करायला भाग पाडतं.
एखाद्या चित्रपटातील कामाप्रमाणेच पंत आणि पाटलांनी गाव हाकण्याची भुमिका आण्णाभाऊंनी हुबेहुब रंगवली आहे. पण महामारी, अन्याय अत्याचार या प्रस्थापित यंत्रणेच्या विरोधात उगारलेला आसूङ कथानकाच्या शेवटी वाचकाला आपण जिंकल्याचा वेगळाच आनंद देतो.
वंदनीय महामानव आण्णा भाऊ साठे यांच्या लेखनीतील ताकतीला शतशः प्रणाम.
( हे या महामानवाच्या कादंबरीची ही समीक्षा नव्हे मी वाचक म्हणून मनोगत व्यक्त केले आहे. )
विशाल चिपङे
बावी आ. बार्शीवरून
Fabulous work sir
ReplyDeleteKhup chhan analysis kel aahe sir short but sweet...
ReplyDelete