ओ. ........सर, या की.काय रं आवं इमान बनीवलयं . इमान .व्हयं व्हयं इमान.गर्दीतनं वाट काढत सौरभ जवळ पोहोचलो. सगळ्या विज्ञान प्रदर्शनातला हटके प्रयोग सौरभनं केला होता.
आरं पण याला वायर ना सेल कसंकाय रं हे. आव सरं विज्ञानाच्या बी पुढं आपण. म्हंजी आवं सूर्याच्या मदतीने हे इमान उङतयं बगा. आरं पण. ...व्हयं तर .हे बगा सौरऊर्जेची पॅनल प्लेट ह्याच्यावर आपण सूर्याची उष्णता यात एकवटली हाय. आनं ह्यातनं इमान आकाशात उङतयं बगा. हित एक बटाण केलयं.
ते दाबलं की इमान वर जातयं.ग्रामीण शैलीत बोलणारा सौरभ सुर्य ऊर्जेसारखाच तळपता अन् लख्ख करणारा भासला. भविष्यात एरोनाॅटिकल अभियंता व्हायचं त्याच स्वप्न मात्र त्यानं पाचवीतचं पाहिलं अन् तो जिद्दीनं पुर्ण करणार हे मात्र त्याच्या प्रयोगात अन् व्यक्तीमत्वात ओतप्रोत भरलं होतं हे मात्र नक्की. घरची कमालीची गरीबी पण बुध्दीची श्रीमंती मात्र अचंबित करणारी होती.त्याच्या आवडत्या विषयाबद्दल तर हटकेच फार्मुला सर आपल्याला म्हणी, शब्दाच्या जाती, संदर्भासह स्पष्टीकरण फिस्टीकरण जाम सपनात इऊन नाचतयचं बगा.लयं अवगङ मराठी.
इज्ञान झकास लयं बर वाटतयं .आरं पण लेका मराठीत पास झाल्या बगार तु इंजिनिअर तरी कसा व्हणार. .ते काय नाय सर मला इमान उङवण्यापास्न कुणीचं रुकू शकत नाही. त्याच्याकङं आसणार्या दांङग्या आत्मविश्वासाला पाहून मी विचार करू लागलो. की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणार शिक्षण, कौशल्याधिष्ठीत शिक्षण चांगला माणूस नव्हे नव्हे तर. ..एक बलशाली भारताचा उत्पादनक्षम घटक उभे करू शकते. त्याची विज्ञानाची आवङचं त्याचे आयुष्य बनेल.मुलं एखाद्या विषयात आभ्यासक्रमाच्या एखाद्या घटकात किती अभ्यास करून गुणप्राप्त करू शकतात. त्यापेक्षा त्याच्या कल्पनाशक्तीचा विकास होणं मला जास्त गरजेचे वाटते.
विशाल चिपङे
बावी आ. बार्शीवरून
No comments:
Post a Comment