" आरं आङीच रुपयाच्या रीळावर पाचशे रुपये शिलाई कमवून निवांत राहशील. अन् स्वतः मालक म्हणून गावात राहून शेतीकङं पण बघता येईल. ऐकं माझं. ...आप्पा बोलत व्हतं पण सळसळतं रक्त, परिवर्तनवादी विचार, समाजाशी जोडलेली नाळ, शिक्षणाशी मनानं केलेला घरोबा हे सर्व काही अस्वस्थ करणार होतं. कपडे शिवणे हा आमच्या घराचा व्यावसाय ही आमची तिसरी पिढी...घराच्या पङक्या भिंतीवरचं फाटकं चवाळं अन् गंजलेले पत्रे आयुष्याची कित्येक वर्षे कुडकुडत जगावी.पाहुणे रावळे आले तर कित्येकदा छटाक साखर अन् चार आण्याची चहा पुङी आणण्याचा प्रसंग अनुभवला आहे.निसर्गाने दिलेला दगा अन् ज्वारीला आलेला कमी भाव ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली कुंङलीवरची भविष्य मनाला चटका देत व्हंती.आठराविश्व दारिद्र्याचं आयुष्याला लागलेलं ग्रहण सुटणार कधी? मन चिंतेत असायचं अन् अंथरुणावर कित्येक रात्रीचं रुपांतर दिवसात व्हायचं.कित्येक वेळा शेजारच्या मित्राने आणलेली नवीन कपडे पाहून आपल्यालाही मिळावीत हा हट्ट तुणलेल्या कपङ्यावरचं समाधान मानावं लागायचं.साधारणं माझं वय असेल 17 -18 वर्ष मौजमस्ती अन् उनाङक्या करण्याच्या वयातचं परिस्थितीचे चटके अन् विचारांची प्रगल्भता त्यावर विजय मिळवायची. जनरेशन गॅप आप्पांबरोबर झालेल्या चर्चेतून अनेक वेळा वैचारिक खटके उङायचे.वर्षातील कित्येक महिने आमचा चंद्र -सुर्याचा खेळ चालायचा.अन् आम्हा दोघात गळचेपी होणारी आक्का मात्र आमचा सामंजस्याचा करार घङवून आणायला व्याकूळ असायची.कदाचित मी एकुलता एक असल्याने आपल्या मुलाने आपल्या जवळचं रहावे.हा बाप माणसाच्या मनातला विचार आज मी बाप झाल्यावर समजतोय.
लहान भावाने कष्ट करून मोठ्याला शिकवायचे अन् परिस्थिती बदलाची स्वप्न पहायची या संकल्पनेला कदाचित माझं ही कुटूंब अपवाद नव्हते.पण ज्यांना आपलं मानलं त्यांनी चटकेच दिले होते.अन् परक्यांनी आपलेपणाची झूल पाठीवर टाकली होती.
शाळेत आसताना बार्शीत आलेले " जाणता राजा " हे नाटक केवळ चाळीस रुपये नसल्यामुळे मी जाऊ शकलो नव्हतो. खरं तर गावात राहून वर्षभर शिलाई करून जुजबी चार पै कमवणाऱ्या तीन पिढ्यांनी "आर्धी खाऊ पण सुखाची खाऊ "म्हणत तुणलेलं आयुष्यचं काटलं होतं. ....त्याच वेळी गाव सोडण्याचा विचार मनाला शिवला होता. ज्या मातृभूमीनं आगीत तावून सुलाखून लोखंङाचं कणखर पोलाद केलं ते गाव सोडलं पण गावाला सोडलं नाही. आजही ज्या शाळेने मला संस्कारांची खंबीर विचारधारा दिली.ज्या वर्गात पास -नापासाचा अनुभव देणारी ती गावातील शाळा तिच्या जवळून जाताना मला विचारतेय. आयुष्याची परीक्षा नीट देतो आहेस ना. ...!
- विशाल चिपङे
बावी आ. बार्शीवरून. .
No comments:
Post a Comment