वय होतं 18 वर्षं. नियतीने ङाव साधला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं.चिमुकल्या पिलांसाठी चारा शोधण्यासाठी कैक मैल भ्रमंती करणार्या चिऊताईच्या घरट्यावर पोटात भुकेचा ङोंब उसळलेल्या एखाद्या भैर ससाण्याने झङप घालावी.पिल्लांचा जीव घ्यावा. अन् होत्याचं नव्हतं करावं. असचं काही माझ्या ही कुटूंबाबाबत घङलं.
रक्ताच्या थारोळ्यात नाहून निघालेला बाप पाहिला. अन् पायाखालची जमीन सरकली. मायेनं जवळ घेणारा अन् चुकलं तर रागावणारा बापचं या जगात नव्हता.अपघातात वङीलांचं दुःखद निधन झालं होतं.काळानं जणू की काय माझ्या घराचे छतच उध्दवस्त केले होते.अन् मी घोर दुःखाचा वाटेकरी बनलो होतो.या स्वार्थी लोकांच्या दुनियेत धायमोकलून अश्रूना वाट करून देणारा खांदाच काळाच्या पडद्याआड झाला होता.अचानकपणे कुटूंबावरचं नव्हे तर माझ्या आयुष्यावरचं आभाळ कोसळलं होतं. व्यक्त व्हायला माणूस अन् धीर देणारे शब्द माझ्यासाठी आहेत का रे ?खुप भावना गुदमरल्या होत्या. विचारचक्र सैतानाप्रमाणे मनाची परीक्षा घेत होती.आपले मात्र उन्हाचे चटके देण्यातच धन्यता मानत होते.पण परक्यानी दिलेली सहानभुती मनात एक निराळीच भावना उत्पन्न करीत होती.
साथीदार आयुष्याच्या अर्ध्यावर सोडून गेल्यानं या जन्मीचं दुःखाच कुरूप आक्काच्या मनावर खुप रुतलं होतं.तिनं अजून आपल्या दुःखाचा बांध मोकळा केला नव्हता.खुप खचलो होतो.हाती होते शुन्य अन् संघर्ष हा एकच साथीदार फक्त सोबतीला उरला होता. घराचा कर्ता गेला की घर उघङं पङतं हे अनुभवण्याची वेळ माझ्यावर आली होती.पण बापाने केलेले चांगले संस्कार अन् चांगली पुस्तकं माझ्यासाठी काङीचा आधार बनली.
परस्थितीच्या चटक्यांनी अन् पोरकेपणाच्या दाहकतेने घङत गेलो. शिक्षणासाठी करावा लागलेला संघर्ष. शिक्षणासाठी एक एक पै साठी अनोळखी व्यक्तीकङे केलेली क्षमा याचना आठवली.की काळजात चर्ररररर करत. आजही वर्गांत अपघातग्रस्त पालकाचा पाल्य पाहिला की समोर उभा राहतो.भूतकाळाने मारलेला जहरी ङंख.समाजातील अश्या अनेक बालकांच्या शिक्षणासाठी आपल्या पगारातील काही हिस्सा देणं मी माझ्या जीवनाचा एक हिस्सा समजतो.
- विशाल चिपडे
जागर फाऊंडेशन बावी आ.
बार्शीवरून
No comments:
Post a Comment